Tuesday, March 01, 2022

गृहिणी

                         तू नोकरी करत नाही का किती छान आहे धावपळ करायची गरज नाही तुला सर्व आनंदात चाललं असेल ना खूप रिकामा वेळ मिळत असेल कामाचा ताणतणाव नसेल एकदम आरामच काम आहे ,बाहेरच्या कामाचा त्रास नाही  या अश्या प्रश्नांना शब्दांना नक्कीच एक गृहिणी सामोरी गेली असणार. पण हे असे त्या एका स्त्रीला बोलणे विचारणे बरोबर आहे का ?

                     स्त्री शक्ती ही आजच्या युगात खूप उंच भरारी घेत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण करत जगत आहे. त्या प्रत्येक स्त्रीला मनापासून वंदन करते. स्त्रीचा प्रवास आईपत्नीसूनगृहिणीबहीणमुलगी अश्या वेगवेगळ्या रूपातून होत असतो. स्त्री एकच जरी असली तरी तिची भूमिका प्रत्येक वेळेला भिन्न असते. प्रत्येक नात्याला विशिष्ट असा आदर आहे. पण खरंच एक गृहिणी म्हणून असणाऱ्या स्त्रीला समाज कोणत्या नजरेनी बघतो. चूल आणि मूल हेच घरातील स्त्रीने सांभाळायचं आणि पुरुष हे बाहेरील काम बघतील अशी रीत होती. त्या स्त्रीला त्या बंधनात ठेवलेलं असायचं. पण जसा काळ बदलत गेला तसा लोकांची मानसिकता बदलत गेली. आज ज्या गृहिणीमुळे घर हे घर बनते तिलाच कमीपणा दाखवला जातो. नोकरी करत नाही पैसे कमवत नाही म्हणून तिला कमी लेखतात. आई काय काम करते असे विचारल्यावर काहीच करत नाही असे पण उत्तर दिले जातातही अशी वागणूक खरचं बरोबर आहे का मग आता गृहिणी म्हणजे नक्की काय ?

                    सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरात राबणारी ती स्त्री म्हणजे गृहिणीवेळेवर जेवण बनवून देणारी ती गृहिणीघरातल्या प्रत्येक व्यक्तीला काय हवं काय नको सर्व बघणारी गृहिणी,आपल्या कामापेक्षा घरातल्या व्यक्तीच्या कामाबद्दल काळजी करणारी गृहिणीघराला एकत्र ठेवण्यासाठी सतत राबणारी गृहिणीतब्येत ठीक नसेल वाटत तरी घरच्यांना सतत मदत करणारी गृहिणीकधीही अपेक्षा न ठेवून निस्वार्थपणे काम करणारी गृहिणी. आज या विचाराचा ऱ्हास होत चालला आहे.  गृहिणी म्हणजे एक देवीच रूप असतेघराला घरपण देणारी तीच गृहिणी असते. त्या लक्ष्मी मुळेच घराला शोभा येते. गृहिणी असणं म्हणजे एक प्रकारचं कामच आहेजे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला जमेलच असं नाही.

                      स्त्री शक्ती मध्ये खूप ताकत आहे. या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मनापासून तिचा आदर करायला हवा.तिला त्रास होणार नाही याची जबादारी ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी. त्याच आधाराने एक तीच मन खुलेल आणि तिला पण आपण गृहिणी असल्याचा अभिमान असेल.



नारिशक्ती



 

 

 


No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...