देव हा एकच आहे. देवांनी भिन्न रूप धारण करून एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्म, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या देवांना पंचदेवता मानले जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत असे मानले जाते. महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे.
गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही देवतांची संख्या नाही. संस्कृतमध्ये ' कोटी ' या शब्दाचा अर्थ ' प्रकार ' आहे, म्हणून ३३ कोटी देवता नसून देवता या ३३ प्रकारच्या आहेत.
त्या ३३ देवता कोणत्या ते बघूया
सृष्टीचे व्यवस्थापन करणे हे या ३३ कोटी देवतांकडे असते असे मानले जाते. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र, १ प्रजापती यांचा समावेश आहे. प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे असल्यामुळे त्यांना कोटी असे म्हटले जाते.
- ८ वसू - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास ( जल, तारे, चंद्र, पृथ्वी, वायू, अग्नी, सूर्य, आकाश )
- ११ रुद्र - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
- १२ आदित्य - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू
सूर्याला आदित्य पण म्हटले जाते. भारतीय दिनदर्शिका सूर्य आधारित बनवलेली असते. एक वर्षात १२ महिने असतात. त्याच १२ महिन्यांना आदित्य म्हणून संबोधले जाते.
- १ इंद्र
- १ प्रजापती
असे पूर्ण मिळून ३३ प्रकारचे देवता संपूर्ण सृष्टीला जीवनदान प्रदान करतात. ३३ देवतांचे देवता हे साक्षात देवांचे देव महादेव आहे.
No comments:
Post a Comment