अळीच्या जन्मात नकोशी होते मी
फुलपाखराच्या रूपात सजून होते मी
फुलांचं आणि माझं नातं हे वेगळं
रंगबिरंगी छटा माझ्या पंखावर उठलं
हातात ना येई मी हवा मला सुगंधी द्रव्य
सर्व चाहते माझ्यावर करतात काव्य
संदेश देऊ इच्छिते सर्वाना सौंदर्यावर जाऊ नका
बाह्यरंग सुंदर असेल तरी माझ्या शरीराला आहे खूप नाजूकपणा..
ताकत बघा मनातली माझी हाती कधी येणार नाही
एवढ्या मोठ्या जगात मला माझा जीव गमवायचा नाही
का तर........?
मला लढायचं आहे सामोरे जायचं आहे
सर्वाना घेऊन मला चालायचं आहे
फुलपाखराचा जन्म छोट्या अंड्यापासून होतो. त्यातून जीव बाहेर येऊन अळी बनून आपली कात सोडते आणि त्याच रूपांतर एका कोशात होते , आणि त्यातच एक मनमोहून टाकणार फुलपाखरू जन्माला येत. साधं छोटासा फुलपाखरू एक निसर्गाचं देणं, त्यातून पण शिकवण मिळते, छोटा असो कि मोठं प्रत्येक जीवांमध्ये एक शिकवण लपली असते , फक्त ती शोधून काढणे गरजेचं असते.
आज ते पाखरू आहे सर्व मानवाला मोहून टाकते आकर्षित करते पण त्या आधीच त्या जीवाचं रूप कोणालाही मोहक वाटत नाही. अळी ही सर्वाना नकोशी वाटते मात्र जेव्हा तीच रूपांतर फुलपाखराच्या होते तेव्हा मात्र सर्वाना ते हवं असते, माझ्या हातावर बसावं, मी त्याला पकडावं असं प्रत्येकाला वाटते. याचप्रकारे हे फुलपाखरू मानवाला एक शिकवण देऊन जाते. बाह्यरंगपेक्षा अंतरंग महत्त्वाचे हे सर्वाना माहित असेलही तरीही चेहऱ्याच्या सौंदर्याला जग मान्यता देते. आर्थिक , चैनीच्या वस्तू, सौंदर्य, श्रीमंती, आनंद या सर्वच एक आकर्षण वाटे, सर्वाना सुख हवं असते पण दुःख नको असते, सुखात सर्वेच असतात पण दुखात कोण असते हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपले कोण हे माहिती पडते.
हसत खेळत फुलपाखराप्रमाणे बागडा, जीव कोणत्यापण परिस्थितीमध्ये असेल तरी त्याचा स्वीकार करा. अळीला वाटले असेल आपलं आयुष्य संपलं परंतु तिचा एक नवा जन्म एक नवं रूप जगात येणार आहे हे माहिती नसते पण तो निसर्गाचा नियम आणि धन्य त्या देवाची किमया ज्यांनी या सृष्टीला घडवलं एक आकर्षित, मनमोहक, विविध जीवांची निर्मिती केली आणि त्या प्रत्येक जिवाकडून शिकवण घेता येईल.
No comments:
Post a Comment