Showing posts with label कला विशेष. Show all posts
Showing posts with label कला विशेष. Show all posts

Sunday, December 01, 2024

Sunday, September 29, 2024

मी एक कलाकार

          रोजच्या जीवनात मला अनेक प्रश्न पडायचे त्यातला एक म्हणजे मी कोण आहे ? विचारांची पातळी उच्च असल्यास हा प्रश्न कठीणच वाटेल. मी कोण आहे ? माझी ओळख काय आहे ? माझ्यात अस काही वेगळं आहे का ? आजच्या धावत्या युगात मी स्पर्धा करू शकेल का ? असे अनेक प्रश्न सतावत राहायचे. एक दिवस ठरवल आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं. 

         प्रत्येक व्यक्ती विशेष असतोच पण विशेष व्हायला मेहनत लागते, मेंदूचा वापर करावा लागतो. मी म्हणू शकते मी एक कलाकार आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट व्हावं लागेलच अस काही नाही. आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे. 

        मी ओळखली माझी कला. ती कला करताना माझं मन रमत. मला उत्साही वाटतं. ती कला पूर्ण होत पर्यंत समाधान वाटत नाही. अश्या विविध कला जोपासणे आजच्या काळाची गरज आहे. शाळेत शिकत असताना या गोष्टीचं महत्त्व कळायचं नाही पण याच गोष्टी आपल्याला किती आनंद देऊ शकतात, आपले मानसिक आरोग्य चांगले राखू शकते हे कळले.

          आजच्या काळात सोशल मीडिया मुळे कितीतरी प्रकारच्या कला जगासमोर आल्या आहेत. कधी विचार केला नव्हता त्या सुद्धा कला बघता येत आहे, शिकता येत आहेत. जग फार मोठे आहे, नवीन जगासोबत नवीन गोष्टी शिकणे तितकेच गरजेचे आहे.

         भरतकाम, ग्रिटींग कार्ड, मेहेंदी, चित्रकला, रांगोळी, सजावट, संगीत, स्वयंपाक, रंगकाम, शिलाई काम, नृत्य, गायन, लिखाण, वाचन अश्या अनेक प्रकारचे छंद बाळगायला हवे. छंद म्हणजे फावल्या वेळेत करता येणाऱ्या कृती. याच छंदातून अनेक लोक व्यवसायाकडे वळतात. पण सर्वप्रथम प्राधान्य शिक्षण आणि नोकरीला द्याला पाहिजे. 

         आपण विचार केलेली भविष्यातील परिस्थिती तशीच असेल अस होत नाही. काळानुसार निर्णय बदलावे लागतात. एकच म्हणायचं आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहा. 


Sunday, June 16, 2024

सुखदायक वेदना ❤️

              वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?

          उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.

             हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.

            एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.

            शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......

Friday, February 16, 2024

अन्न हे पूर्णब्रह्म

            आपल्या जीवनातल्या अतिआवश्यक गरजापैकी एक म्हणजे अन्न. कुणी जगण्यासाठी खातात तर कुणी खाण्यासाठी जगतात. जशी अंगावरची जबाबदारी वाढते तसेच आपल्या आवडी निवडी बदलतात, न आवडणाऱ्या गोष्टीत पण मन रमायला लागतं. आईला नेहमी म्हणायची तू स्वयंपाक कर मी बाकी काम करते. स्वयंपाक करणे मला फारस आवडायचं नाही🙅. नेहमीच्या जेवणात असणारे पदार्थ बनवायला मी शिकले, पण एक जबाबदारी म्हणून करायचे, आई जसे जसे सांगेल तसे करायची😊.

             कामावर लागल्यापासून स्वतःलाच सर्व करावं लागतं. एक चविष्ट😋 पदार्थ खाल्ल्याने सुद्धा मनाला तृप्ती☺️मिळते हे अनुभवले. जीवाला सुखाच पोटभर अन्न खाऊ घालणं म्हणजे पुण्यचं हे समजले. सांबार 🌱आणि कढीपत्ता🌿 च महत्त्व अन्यसाधारण वाटू लागले. सर्व जिन्नस मिळून किती चविष्ट पदार्थ होतो हे कळले.
         नेहमीच्या स्वयंपाक व्यतिरिक्त वेज बिर्याणी, समोसे, केक🎂, मुंचुरियन, इडली, डोसे, ढोकळा, श्रीखंड, शिरा, लाडू, भजे, बाफले, पावभाजी, साबुदाणा वडा, सांबार वडा, गुलाब जामुन, रसगुल्ला,  तांदळाची खीर, बासुंदी, साबुदाणा खीर, मोदक, चिवडा, ज्वारीच्या पीठाचे आंबील, इ. पदार्थ बनविण्यात तरबेज झाली.
नवीन पाककृती बघणे आणि करून बघण्याची आवडच निर्माण झाली. आणि नेहमी ती चविष्ट होईलच असं नाही मी बनवलेलं काही पदार्थ फसले सुद्धा आहे 🥲😅.

          तव्यावर पोळी टाकताना हाताला लागणारे चटके, मिरचीची फोडणी देताना टूनुक चेहऱ्यावर उडणारा मिरचीचा दाणा💥, पावशीने भाजी कापताना बोटाला पडलेले चिरे किंवा टम्म फुगणाऱ्या पोळीतून निघालेल्या वाफेने  हाताला झालेली आग या सर्व स्वयंपाक कला शिकत असताना झालेल्या आठवणीतील जखमा. जखम झाली म्हणून स्वयंपाक बनवणे थांबले नाही 🫶.

          एकच सांगायचं स्वयंपाक करणे ही एक कलाच आहे. काहींना सारखच साहित्य दिले आणि एकच पदार्थ बनवायला सांगितला तरीही चव ही निराळीच असेल. स्वयंपाकात पण जादू🪄 असू शकते याचा विचार पण केला नव्हता. शिकत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा जमायला लागतात 🤩.

Sunday, December 10, 2023

माझी रांगोळी - भाग १

           विविध रंगांची आकर्षित रंगोळीच महत्त्व निराळ आहे. घराच्या अंगणापासून ते प्रत्येक सणाच्या वेळी अंगणाला शोभा देणारी रांगोळी, वाढदिवसापासून ते लग्नपर्यंतच्या शुभ कार्य प्रसंगी  काढली जाणारी रांगोळी, मनाला मोहून टाकते. 




स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी 


दसरा विशेष रांगोळी २०२१


दिवाळी विशेष रांगोळी 


दिवाळी विशेष रांगोळी 

Sunday, October 29, 2023

आईचा खजिना

             एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराची मेहनत समजू शकतो आणि त्या कलेचा आदर करतो. कारण त्या कलेमागे काय दडल आहे तो कलाकारच जाणून घेऊ शकतो. तसच माझ्या आईने बनवलेली कला इतकी जवळून कधी बघावी वाटली नाही पण या वेळेच्या सुट्टीमध्ये माझ्यात असणाऱ्या कलाकाराने ही अमूल्य कला ओळखली आणि म्हणून मला त्या गोष्टीची किंमत कळाली. कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली आणि रोज बघण्यात येणारी वस्तू खजिना वाटू लागली. हे कसे केले असेल याची मनात उत्सुकता वाटू लागली. आई काही वर्षाआधी भरतकाम शिकली आणि त्यातून तिने अनेक टेबल क्लॉथ आणि बेडशीटवर भरतकाम केले त्याचे काही छायाचित्र मी खाली टाकले आहे सोबत कापडावर आणि काचेवर केलेले रंगीतचित्रे सुद्धा खाली दिले आहे. एक आठवण म्हणून माझ्या आईचा हा खजिना माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.

Tuesday, June 27, 2023

माझी चित्रकला भाग ५

आई आणि बाळाच्या प्रेमाच प्रतीक 
स्त्री सौंदर्य 
श्री गणेश

Saturday, April 15, 2023

विश्व कला दिवस

                 प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा छंद जोपासायला आवडतो. छंद म्हणजे एक आपली काहीतरी वेगळ करण्याची आवड, आपल्या फावल्या वेळेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं त्यातून मिळणारा  आनंद आहे. 

              विश्व कला दिवस किंवा जागतिक कला दिन हा दरवर्षी १५ एप्रिल ला साजरा केल्या जातो. महान कलाकार लिओनार्डो दा विंची यांचा हा जन्मदिवस, २०१२ साली हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. या दिवसाची विशेषता म्हणजे कलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देणे, आजच्या काळात विविध कला क्षेत्रातील उपलब्धतेचा सन्मान करणे आहे. या २०२३ वर्षाची थीम ही Art is good for health ही आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य समतोलात असणं गरजेच आहे. 

               सध्याच्या काळात अनेक कला क्षेत्र आहेत. संगीत, चित्राला, वाद्यकला, नृत्यकला,मूर्तीकला, फोटोग्राफी या व अश्या अनेक कलांमध्ये अनेक कलाकार आपलं नाव जगात प्रसिद्ध करत आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी कला शिकणे महत्त्वाचे ठरते. 

                 आपण समोरच्या व्यक्तीला  ती कला उत्कृष्ट रीतीने सादर करताना पाहल्यास आपल्याला मोह येतो आणि यामध्ये आपल्यासमोर अनेक कला असतात पण विचार करतो नेमका आपण वेळ कसा काढावा, जेव्हा मनातून शिकण्याची आवड असते तेव्हा काहीतरी मार्गाने वेळ निघतोच. मला माझ्या कला जोपसायला आवडतात आणि त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला अंगी जोपसायला हवी. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगला  बदल पाहायला मिळतो. 

Monday, January 02, 2023

माझी चित्रकला - भाग ४

राधाकृष्ण
राधाकृष्ण 
 पिस्ता कव्हर हस्तकला मोर
  
विविध रंग वापरून काढलेली क्राफ्ट चित्रकला
फुलावर बसलेला सोनकिडा चित्रकला 
रंगाचा वापर करून रांगोळी च्या रुपात चित्रकला
स्वतःच्या मनाने काढलेली आर्ट चित्रकल
आपल्या भारतमातेचा तिरंगा आणि आपलें शक्तिशाली जवान
पानापासून काढलेली चित्रकला









Saturday, June 04, 2022

माझी चित्रकला - भाग ३


केदारनाथ धाम 
पक्षी
छत्रपती शिवाजी महाराज
गुढीपाडवा 
जय श्री राम 




चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...