Showing posts with label व्यक्तिमत्त्व. Show all posts
Showing posts with label व्यक्तिमत्त्व. Show all posts

Saturday, August 16, 2025

Let's Travel

             

          Travelling is where person feels nature, meet new people. It is not only about the destination but the journey you enjoy. Travelling is new experience that has space in our hearts for the memories.It is a way to expand the thinking of our mind, heart and soul and It's not about how much distance is in our journey but cherishing seconds of that moment we enjoy.


At the end of the day what matters is you......





Thursday, August 14, 2025

जीवन हे क्षणभंगुर

खुदकी खामिया देखते देखते, खुदको ना खो देना
सबकी मंजिले अलग अलग, किसीकी ईर्ष्या ना करना


               प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. कोणाला जन्मजात सर्व मिळत असते तर कोणाला ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. समोरच्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपल्याकडे नाही याची नाराजी प्रत्येक व्यक्तीला होतेच हा निसर्गाचा नियम आहे. कोणाला लवकर यश मिळते तर कोणाला उशिरा मिळते. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण स्वतःची तुलना ही समोरच्या व्यक्ती सोबत करतो. त्या भौतिक, मानसिक गरजाही असू शकतात. तुलना करता करता आपण स्वतःला कमी समजायला लागतो आणि समोरच्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या करू लागतो. 

          आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानून जीवन जगण्याला अर्थ आहे. आजच्या आधुनिक काळात पैसा, गाडी, बंगला, नाव, नोकरी या गोष्टींना माणुसकीपेक्षा मोठा दर्जा दिला जातो आहे. कितीही काळ गेले तरी ज्या व्यक्तीत माणुसकी आहे तोच देवाला प्रिय असतो. 

          आपल्या परिस्थितीची माणसाने नेहमी जाण ठेवावी आणि समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीची थट्टा करू नये. सर्व गोष्टी या आदराने घ्याव्या. त्यातच आपली खरी माणुसकी दिसून येते. आपण स्वतः स्वकष्टाने, मेहनतीने कस मोठं होऊ याचा विचार करू समोरचे पाऊल टाकावे.

Thursday, October 10, 2024

अनमोल रत्न

         काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाही आपल्या परिवारातील, आपल्या जवळील व्यक्ती हरपला असेच वाटू लागले. मी तर त्यांना भेटले पण नाही, फक्त त्यांचा फोटो बघितला पण इतका जवळच नात कस काय तयार झालं असावं, की माझ्या मनाला दुःख वाटू लागले.
 
         आज या बातमीने पूर्ण देश हळहळ व्यक्त करतो आहे. आज आपल्या देशातच नाहीतर संपूर्ण जगात टाटा एक ब्रँड म्हणून प्रसिध्द आहे. हा ब्रँड बनवण्यासाठी घेतलेले कष्ट अवर्णनिय आहे. घराघरात मिळणाऱ्या मिठापासून ते विमानाच्या प्रवासापर्यंत सर्व क्षेत्रात टाटा या ब्रँड ने डंका वाजवला आहे. एक उत्कृष्ट उद्योजक म्हणून टाटांच नाव आहे.

        खर सांगायचं तर माणूस कितीही मोठा झाला तरी माणुसकी कायम ठेवता आली पाहिजे आणि हेच कारण की रतन सर विषयी सर्वांना आदर वाटतो. स्वतः उद्योजक असेल तरीही आपल्याला समाजाला देणं लागते या निष्टेवर ते कार्य करत आले. आतापर्यंत केलेली देशसेवा, समाजसेवा, लोककल्याणासाठी दान धर्म ही सर्व देशाच्या प्रेमापोटी. 

          नक्कीच काहीतरी वेगळं होतं. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. साधं राहणीमान, दुसऱ्यांना नम्रतेने वागवणे या काही निवडक गोष्टी. आपले आदर्श हेच असावे. एक दिवस हा येणारच होता हे सर्वांना माहीत होते. पण हे असं व्हावं कोणाला वाटत नव्हते.

असे देवमाणूस पुन्हा होणे नाही.
भावपूर्ण आदरांजली 

Sunday, July 14, 2024

भेटला विठ्ठल माझा 🌸

                प्रत्येक धर्मात अनेक देव आहेत. त्या देवांची पूजा अर्चना केली जाते. भक्ताला देवाने दर्शन द्यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या संकटात देवाने आपल्याला मदत करावी असे प्रत्येकाला वाटत असते. देवाने स्वयंभू आपल्याला आशीर्वाद द्यावा अस वाटत असते. त्यासाठी फक्त भक्ती करून होत नाही, त्यासाठी आपले आचरण हे देवांच्या शिकवण प्रमाणे असायला हवे. अर्थात देव आहे आपल्या हृदयात असतो, आपण चुकीचं कार्य केल्यास देवाचं आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते.
            रोजच्या जीवनात अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला नियम पाळावे लागतात. दुपारच्या वेळेला ट्रॅफिक नसले तरीही १ मिनिटांसाठी सिग्नल वर थांबल्याने मागून येणारे वाहने सुद्धा थांबतात हा माझा स्वतः चा अनुभव आहे. प्रत्येकाची मानसिकता नसतेच, ते नियम न पाळता नियमांच उल्लंघन करतात. आपण आपल्या नियमांवर ठाम राहल्यास समोरच्या व्यक्तीला सुद्धा नियमांची कठोरता कळते. अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मदतीचा हात दिल्यास आपल्याला ही मदत मिळतेच. शुद्ध मन, विचार, आचरण असल्यास देव सतत आपल्या हृदयात विराजमान असतात.

           एकमेकांना मदत केल्यास माणुसकी टिकून राहते. देव कोणत्या रुपात येऊन तुम्हाला मदत करेल हे कळणार पण नाही. त्यामुळे चांगले कर्म करत राहिल्याने त्या कर्माचे गोड फळ मिळतेच.

Sunday, June 02, 2024

चालतं बोलतं जीवन

                सर्वांच्या जीवनात संघर्ष असतोच. आपल्या जीवनाची दुसऱ्याच्या जीवनाशी तुलना होऊ शकत नाही. सर्वांच्या जीवनात वेगळे प्राधान्य असते, स्वतःचे समस्या असतात आणि त्यावर स्वतःचे उपायपण असतात. सर्वांसाठी जीवन हे सारखे नसते. जीवनात घडून गेलेल्या गोष्टींमधून शिकवण घेऊन समोर पाऊलवाट करणे हे महत्त्वाचे ठरते. परिपक्वता ही वयामुळे येत नसते ती अनुभवातून येते. नक्की परिपक्वता म्हणजे काय ? जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवताली काय घडते आहे याबद्दल जागरूक असता, जेव्हा तुम्हाला माहित असते काय बरोबर आहे काय चूक आहे, जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष स्वतःकडे आणि स्वतःच्या कुटुंबाच्या चांगल्या साठी विचार करत असते.

              आतापर्यंत जीवनात अनेक अडचणी आल्या, चढ उतार आले. नेहमी अभ्यासात मग्न होऊन कायम टॉप करणारी मुलगी ते जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत , नवीन गोष्टी आत्मसात करणारी मी एक पूर्णपणे नाही पण स्वतंत्र स्त्री बनली आहे, आणि हा प्रवास घाटात असणाऱ्या वळणांप्रमाने होता.

                जीवन जगताना मिळालेली शिकवण मी ह्या ब्लॉगमध्ये लिहिते आहे. एक न एक दिवस सर्व ठीक होईल हे अनुभवातून शिकायला मिळाले. देवाचं सगळीकडे लक्ष असते, आपण काय क्रिया, प्रतिक्रिया करतो हे सर्व देवाला ठाऊक असते. आपण आज जरी एखाद्या गोष्टीवरून काळजी करत असू ती एक दिवस नक्कीच काळजी मिटेल. प्रत्येक वेळेस आपले निर्णय बरोबर असतीलच असे नाही कधी ते चुकतात पण तीच चूक आपल्या हातून घडली हे मान्य करणे आणि तीच चूक परत न करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.

             एक मुलगी म्हणून प्रत्येक क्षणाला स्वतःला सावध ठेवणे खूप गरजेचे आहे.  सार्वजनिक ठिकाणी वावरताना क्षुद्र लोक आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, वेळ काय झाली असे प्रकारचे प्रश्न विचारतात या गोष्टींना बळी न पडता तिथून काढता पाय घेऊन सावध राहण्यात जबाबदारी आहे. 

                प्रत्येक गोष्टीला होकार द्यालाच हवा अस काही नसते. नकार द्यायला पण शिकायला पाहिजे. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला नकार देताना विचार करावा लागतो पण आपण स्वतःला महत्त्व द्यायला पाहिजे आणि आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीला सरळ नकार देता आला पाहिजे. सर्वांच्या मदतीला आपण धावून जायचं पण आपल्या मदतीला कोणी नाही असं नको व्हायला.

              कधी कधी मनात विचार येतो ४ वर्षापूर्वी सोशल मीडिया न वापरण्याचा निर्णय हा सर्वात अचूक होता. सोशल मीडिया हे एक जाळं आहे. तरुण पिढीसाठी हे एक व्यसन होत चाललंय. तास न तास कसे चालले जातात याच भान राहत नाही. एखाद्या व्यक्तीची चांगली पोस्ट बघितल्यास आपलं जीवन अस का नाही ? किंवा मी त्या व्यक्तीसारखी का नाही ? हे विचार करून मनात मत्सर निर्माण होतो. हे सर्व थांबायला हवं. सर्वांना एक अमूल्य जीवन मिळालेलं आहे. आपल्या अमूल्य वेळेला या सोशल मीडियाच्या नादात वाया घालवता कामा नये.

          डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्हाला काय करावं वाटते मी पण केलं, माझं ह्रदय म्हणालं तू चित्र काढ मी काढलं नंतर परत कल्पना केली , माझं ह्रदय म्हणालं तुझ्या आयुष्यात तू रंगबेरंगी रंग भर, मी रंगकाम केलं. मी परत कल्पना केली, माझं ह्रदय म्हणालं तू एक वाद्य शिकायला पाहिजे आणि मी शिकायला सुरुवात केली. मी परत कल्पना केली माझं हृदय म्हणालं तू नाच, तू गाणं म्हण, तू स्वयंपाक कर, तू भरतकाम कर...... आणि मी माझ्या हृदयाचं ऐकत सर्वच केलं.

           मी हे सर्व केलं कारण मला करायचं होत, माझी आवड आहे, त्यातून मला खूप आनंद आणि समाधान मिळते. माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता २ वर्षात ६३ ब्लॉग्ज मार्फत वेगळे वेगळे विचार मांडण्यात आले. 
 
           देवा, इतक्या अडचणी का आहेत माझ्या जीवनात ? असा प्रश्न केल्यास उत्तर काय असेल ? देव म्हणतात तू जर रात्रीचा अंधार बघितला नाही तर तुला सूर्याचं महत्त्व कस कळेल तसच जीवनात अडचणी आल्या नाही तर तुझ्या जीवनातील सुखाच्या क्षणात आनंद कसा मिळणार. त्यामुळे प्रत्येकाला आपली सुख दुःख सांभाळून जीवन जगावे लागते.

        अर्थात कितीही बिकट परिस्तिथीला मात करण्यासाठी जिद्द, कसोटी असावी लागते, ताण तणाव न घेता आनंदाने जीवन जगण्यात काही वेगळीच मजा आहे.




Saturday, July 08, 2023

व्यक्त व्हायला शिका

                          जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.

                         समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे. 

                        आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.

प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.

Sunday, June 25, 2023

प्रतिबिंब

                आरसा हा आपल स्वतःच प्रतिबिंब  दाखवतो आणि सावली ही आपली साथ कधीच सोडत नाही असं खूपदा एकलेल आहे, पण जर आरसा दोषपूर्ण निघाला तर आपल्याला जे प्रतिबिंब दिसते ते प्रत्यक्ष पेक्षा वेगळं असतं, म्हणजेच आरसा पण काहीवेळेस आपली साथ सोडतो. 

               सावली ही कायम आपल्यासोबत असते पण जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो तेव्हा उभ्या असलेल्या वस्तूची सावली दिसत नाही याचाच अर्थ एक वेळेस सावली पण आपली साथ सोडते मग आपण माणसांकडून तरी काय अपेक्षा ठेवावी. नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे एक अशी व्यक्ति असते जी कायम खंबीर आधार देतात, प्रत्येक वेळी गरजेच्या वेळी उपलब्ध असतात आणि अश्या व्यक्तीना  जपलं पाहिजे, कायम आधार दिला पाहिजे. 

Sunday, April 02, 2023

महत्त्वाकांक्षा

                      भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता  तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.


#BeStrong #LiveInTheMoment 

Sunday, March 12, 2023

प्रेम असं ही

सकाळी असाच मनात विचार आला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हसताना बघतो तेव्हा आपल्या गालावर हसू येत, ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणा असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर असतो. हाच विचार करता करता मला माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे रतन टाटा सर. आलं ना तुम्हाला पण गालावर हसू, सरांच व्यक्तिमत्त्व च इतका रुबाबदार आहे की फक्त भारतातील नाही तर पूर्ण जगातील व्यक्ती त्यांना खूप मानतात.आपण ना त्यांना कधी भेटलो ना त्यांच्याशी संवाद केला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रेमात पडलो. हे असे सुध्दा प्रेम असते. 

म्हणूनच प्रेमाला समजायला एक व्याख्या तयार होऊ शकत नाही. ते अनेक प्रकारे विविध रूपाने आपल्यापुढे येत असते. अश्या थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळून आपल आयुष्य मार्गी लागण्यास मदत मिळते. 



Wednesday, March 08, 2023

आत्मनिर्भर स्त्री

ती आहे म्हणून 
आपण आहो 
ती आहे म्हणून 
घरपण आहे 
ती आहे म्हणून 
विश्व आहे 
ती आहे म्हणून 
नात्यांमध्ये प्रेम  आहे 


                       ८ मार्च म्हणजे  जागतिक महिला दिन, हा दिवस फक्त आपल्या महाराष्ट्रापर्यंत किंवा  देशांपर्यंतच नाही तर संपूर्ण जगाचा महिला दिन आहे. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादि मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली होती आणि हे आंदोलन म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी  केलेला  पहिला लढा होता, आणि या लढ्याची पूर्ण मेहनत आज संपूर्ण जगाला  दिसते आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, तरी सुद्धा तिला प्रत्येक संकटावर मात करावी लागते, तिला सामोरे जावे लागते, अस म्हणतात स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, नक्कीच याच कारण एकच आहे, पुढची पिढी कशी घडवायची, कसे संस्कार हवे, कश्या चालीरीती हव्या हे सर्व एक स्त्रीवर अवलंबून असते. ती आहे त्यामुळे आज मी लिहीत आहे. ती आहे म्हणून तुम्ही वाचत आहात, बघत आहात. स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी, म्हणायला बोलायला खूप छोटा शब्द आहे स्त्री, महिला, WOMEN पण याच शब्दात कितीतरी ताकद आहे, बळ आहे कारण हीच स्त्री आपल्या मुलांमुलीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आपल्या जीवाचे रान करते, याचे उदाहरण कितीतरी आपण  देऊ शकतो.


ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळली 
तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला 
ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली 
तो जिजाऊचा  शिवबा झाला 
ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळली 
तो रमाचा भीम  झाला आणि सीतेचा राम झाला 
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली  
तो राधेचा श्याम झाला 


                                हे आहे स्त्रीचे महत्त्व आणि संस्कार.  प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा मोठा वाटा आहे हे सर्व म्हणतात . जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, एक जागरूकता आणणे हेच आहे. आता काही लोकांना वाटते की माणसांच्या समोर स्त्रीने जायला नको, पुरुषयांप्रमाणे सर्वच क्षेत्रात काम करण्याची गरज काय आहे या शंका सुद्धा अजूनही समाजात जीवंत आहेत. 

                             स्त्रीचे कार्य क्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, आताच स्त्री समोर गेली नाही तर हे आधीच्या पिढी न पिढी  स्त्री प्रगती करते आहे आणि सुरुवात करते म्हटल तर या स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ,  समाजात समाजकार्य करण्याऱ्या अहिल्याबाई होळकर,  शिक्षणाची दार उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले , भारताच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील,  वर्तमानात  राष्ट्रपतीचा कारभार पाहणाऱ्या  म्हणजे द्रौपदी मुर्मू आहे. पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि अनाथांची माय  सिंधुताई सपकाळ होत्या. 

                             अनेक महिलांनी  यशस्वी कामगिरी करून जगात ओळख निर्माण केलीच पण येणाऱ्या पिढीला नवीन ऊर्जा, प्रोत्साहन देण्यात तितकाच वाटा आहे.  हीच आहे नारी शक्ती. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आपली  ओळख निर्माण करत आहे. म्हणून मी म्हणते नारी हीच शोभा आहे घरची. 



एक यावा असा दिन ना राहो महिला 'दीन' रोज असावा महिला  दिन 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 





Monday, August 29, 2022

दृष्टिकोन

                      जस जस आपण या जगात मोठ होतो तस अनेक गोष्टीची जाणीव होत असते जगात काय बरोबर चालू आहे काय चुकीच आहे कोणत्या गोष्टीला विरोध असावा आणि कोणत्या गोष्टीला पुढाकार करावा. जस नाण्याला २ बाजू आहेत तस प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे कायम जीवनभर  असणारच पण  त्याला सामोरे कसे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आज काही गोष्टीला जेव्हा मनाला स्पर्श करतात तेव्हा त्या मनाला लागतात आणि डोळे पाणवतात ते मग आनंदाचे असो किवा दुःखाचे.... 


काही गोष्टीला धरून या जगात जगाव लागत प्रत्येक दिवस नवीन अपेक्षा नवीन संकट घेऊन  येतो परंतु आपले विचार मनात पक्के ठेवून प्रत्येक दिवस जगणे महत्त्वाचे असते. 
जीवन जगताना आपली नजर महत्त्वाची आहे पाहण्याचा दृष्टिकोन जीवन बदलण्यास मदत करते.

Wednesday, March 02, 2022

संयम

                  माझ्यासोबतच अस का होते मला का अपयश मिळते कधी मी यशाची पायरी गाठेल ?  काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?

   असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुखदुःखताण-तणावरडणसकारात्मकतानकारात्मकता  ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणेकाम करणेजेवण करणेपरत झोपणे.......नाहीफक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचारआपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूककठीण प्रसंगी सावरायची क्षमतानिर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम. 

             बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयमआपण ऐकलं आहेसंयम ही यशाची किल्ली आहेआणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असतेत्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असतेहे महत्त्वाचे ठरते. 

                एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे. 

              खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........

स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.

संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....

स्वप्न जीवनाचे

                  जीवनात लहान लहान गोष्टीच आनंद अनुभवता येणारी व्यक्ती ही नक्कीच समाधान वृत्तीची असते. दररोज येणारे नवीन क्षणनवीन अनुभव या सर्वाना आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून त्यांचा स्वीकार करून आनंदात जगणं  सोप नाही पण ते अवघड सुद्धा नाही. 

आजकाल जगाच्या वाटेने चालणारी व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरत आहे. या गोष्टीच उदाहरण बघू

               रस्त्यावर अपंग (ज्या व्यक्तीला पाय नाहीतकिवा चालायला जमत नाही) व्यक्ती ही आपली चाके असलेली खुर्ची हाताच्या मदतीने चालवून गती निर्माण करतो. पण तेच जेव्हा त्याला पायांनी चालणारी व्यक्ति दिसतेतेव्हा त्याला पण वाटते की आपण पण स्वतःच्या पायावर चालू शकलो असतो तर किती बर झाल असतं. आता जो पाऊलवाटेने चालणारा व्यक्ती सायकल चालवण्याऱ्या व्यक्तीला बघतो तर त्याला पण विचार येतोआपल्याकडे पण सायकल असती तर खूप बर झाल असतं. समोर सायकल चालवणारा व्यक्तीला  गाडी चालवणाऱ्या  व्यक्तीकडे बघून वाटते माझ्याकडे पण गाडी असती किती छान असतं .............

         असे हे विचारांचे चक्र सुरूच असते. नक्कीच प्रत्येक व्यक्तीने समोरील स्वप्न बघावे पण ते स्वप्न सकारात्मक दिशेने न्यावे. काही नकारात्मक विचार करतात. माझ्या नशिबात हेच आहे का ?.. अस तस.. तुमच्या जवळ जे काही आहे त्याचा आदर केला की नक्कीच समोरच यश देवच आपल्या पदरी देतो.  आणि म्हणतात ना तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाच स्वप्न असेल म्हणून देवावर विश्वास ठेवून आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. 

                   तुमच्याकडे काय नाही याच्या विचारात जीवन घालवण्यापेक्षा आज तुमच्याकडे काय काय आहेहे विचार करून एक यादी बनवा मग नक्कीच कळेलआपण किती भाग्यवान आहो की देवाने आजपर्यंत आपल्याला किती काही दिलेल आहे. 

             जगताना आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जगातेव्हा वाटेल की खरच आपल्याकडे किती काही आहे. तेच आपण ज्यांच्याकडे जास्त साधन संपत्ति आहेअश्याकडे बघून जीवन जगणार तर एक वर्तमान गोष्टीतील समाधान हरवून बसाल.




 

 

ऋणानुबंध

 घरात एक बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत अनेक नाती जन्माला येतात. नात म्हटल की मनात एक वेगळच स्मितहास्य येते. बघा ना आपल्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर शेजारीमग मित्रमैत्रिणीशिक्षक असे कितीतरी नाती तयार होतात आणि प्रत्येक नात्याच एक वैशिष्ट्य असते. 

जेव्हा एक नात तयार होत ते विश्वासावर अवलंबून असते. त्या नात्यातला समजूतदारपणाखोडकरपणाचिडचिडभांडणहास्यअबोला अश्या अनेक भावना त्या नात्यावर परिणाम करतात. काही नाती रक्ताची असतात काही दूरची असली तरी इतकी जवळची होऊन जातात कळतपण नाही. आपण प्रत्येक नात्याला नाव दिले आहेआणि त्या प्रत्येक नात्याची  एक विशिष्ट ओळख असते. 

नात म्हटल की त्यात एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावनाकाही विषयावर चर्चामदतीला असणारा हातयोग्य निर्णय सुचवणारी बुद्धी असे सर्व येते. पण त्या नात्याचा तितकाच आदर असणे पण महत्त्वाचे आहे. जेव्हा त्या दोन व्यक्तिमध्ये एकमेकाबद्दल आदर असेलप्रेम असेलविश्वास असेल तरच ते नात योग्य वाटेने जातेआणि जर ते नात कमजोर झाल तर त्यातले घटक आपोआप ऱ्हास पावतात. 

सोप्प वाटे नात टिकवण पण जेव्हा वेळ येते तेव्हा हिंमत लागते. नात तोडायला एक कारण खूप असतेपण तेच नात जुळवून ठेवण्यास सर्व बाजूने विचार करूनसमजुतीने रहावे लागते.

झाडाला जगवण्यासाठी जस पाणीऊनऑक्सिजन हे सर्व लागते तेव्हाच ते मोठ होते आणि एकदा त्याची वाढ झाली की त्याला जपण्याची गरज नसतेतसच एकदा नात्याचा विश्वाससमजूतदारपणा दृढ झाला की त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नात जपवून ठेवण्याची ओढ असते.



   

इच्छाशक्ती

 कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। 

 

हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल...............घडल आहे का अस काही तुमच्या आयुष्यात.........इतका काय दडल आहे या वाक्यात की हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला ?

चला तर बघूया 

आपण म्हणतो आपल्या नशिबात जे असते तेच घडते पण काही गोष्टी आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून सत्यात उतरवू शकतो. आपले विचार हे आपल जीवन घडवण्यास कारणीभूत ठरतात. एखादी व्यक्ति सतत नकारात्मक विचार करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच गोष्टी घडतात पण तेच एखाद्या व्यक्तीने सकारात्मक विचार करून आपल स्वप्न पूर्ण होणारच अशी भावना मनात ठेवली की नक्कीच एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईलच.................पण हे कस काय होते ?

जेव्हा व्यक्ती विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा वातावरणात समावेश होते. जे व्यक्तीचे विचार असतील त्यावर सभोवतील वातावरण कार्य करते..........नकळत आपल्या हातून ते कार्य पार पडते................. ते सकारात्मक किवा नकारात्मक असू शकते.. ही सर्व व्यक्तिमधून येणाऱ्या उर्जेचा परिणाम असतो. 

इच्छाशक्ती ही  एक जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहेया शक्तीचा वापर जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास केल्या जाऊ शकतो किवा मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

त्यामुळेच त्या एका डायलॉगने सर्वांची मने जिंकून घेतली. सर्वाना नकारात्मक विचार येतातच मात्र ती आपल्या मनात घर करून राहायला नको............ कोणताही विचार करण्याआधी नक्कीच एकदा विचार करा की आपण जसा विचार करू तस आपल्या आयुष्यात होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जीवनाचा आस्वाद घ्यावा.

संगत

       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचापरिसराचा शारीरिकमानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना  ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता  येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. 

आदर्श व्यक्ती  कोण ?

                   आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती  तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेलआणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती  स्वतःलाच  शोधावी लागते. 

          आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही..............  मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते. 

                   जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतोतेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ?  या प्रश्नाच उत्तर मिळून जाते. 

                  आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.

नैराश्य

                    प्रत्येक व्यक्तीला आपण का जगतो कशासाठी जगतो आपल्याला काय करायचे आहे आपल्या जीवनाच ध्येय काय आहे या सर्व प्रश्नाची उत्तर ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीच्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणींपुढे मात करून तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होणारच... का तर जी सर्वात मोठी ताकत आहे ती मनाची इच्छाशक्ती आहे. 

                जीवन हा जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास आहे. सुखदुःखकठीण प्रसंग अशी अनेक नागमोडी वळणे जीवनाचा मूलमंत्र देऊन जाईल. पण जेव्हा तीच इच्छाशक्ती मनातून लुप्त होते तेव्हा काय होते याबद्दल जाणून घेऊया...

             जीवनाचा तो एक भाग  ज्यामध्ये आपली इच्छाशक्ती हि दबून जातेएक न्यूनगंड( स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणे ) निर्माण होतोजीवनाचं ध्येय नसतेनवीन काही करण्याची इच्छा नसते,भूक लागत नाहीझोप येत नाहीताणतणाव असतेमानसिक त्रासापासून ग्रस्त असते त्यामुळे शारीरिक त्रास उदभवतात हि सर्व नैराश्याची लक्षण आहे.

               नैराश्याची कारण ही खूप आहेत. आपल्याला जस हवं असते तस न मिळाल्यामुळे नैराश्य येतेकोणत्याही क्षेत्रात अपयश  पदरी आल्यामुळे नैराश्य येतेएखादी गोष्ट मनाला लागली कि नैराश्य येतेआपल्यापेक्षा यशाची उंची गाठणाऱ्या लोकांना बघून नैराश्य येते.

            नैराश्य येणे साहजिकच आहे पण त्यातून बाहेर पडणे आपल्यासमोर एक आव्हान आहे. विचारांनी ग्रस्त असलेलं डोकं शांत करण्यासाठी स्वतःला व्यस्त करणे गरजेचे आहेएखादी छंद जोपासणे गरजेचं आहेआवडती गोष्ट केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईलपर्यटन स्थळाला भेट द्या त्यामुळे मनमेंदू हा दुसऱ्या वाटेने विचार करायला लागेलतुमच्या विश्वासातील व्यक्तीसोबत बोला,मनातल्या गोष्टी सांगापण विचार करूनखरंच त्या व्यक्तीला तुमची काळजी असेल तर तीच व्यक्ती सर्व ओळखून घेईलनवीन कला शिकण्याचा प्रयत्न करा आणि एक मनात ध्येय ठेवून नव्या वाटेला सुरुवात करा.... मनाची इच्छा शक्ती सर्वात मोठी शक्ती आहेध्येय साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते फक्त योग्य दिशेने चालावं लागत.....

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...