कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।
हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल...............घडल आहे का अस काही तुमच्या आयुष्यात.........इतका काय दडल आहे या वाक्यात की हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला ?
चला तर बघूया
आपण म्हणतो आपल्या नशिबात जे असते तेच घडते पण काही गोष्टी आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून सत्यात उतरवू शकतो. आपले विचार हे आपल जीवन घडवण्यास कारणीभूत ठरतात. एखादी व्यक्ति सतत नकारात्मक विचार करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच गोष्टी घडतात पण तेच एखाद्या व्यक्तीने सकारात्मक विचार करून आपल स्वप्न पूर्ण होणारच अशी भावना मनात ठेवली की नक्कीच एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईलच.................पण हे कस काय होते ?
जेव्हा व्यक्ती विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा वातावरणात समावेश होते. जे व्यक्तीचे विचार असतील त्यावर सभोवतील वातावरण कार्य करते..........नकळत आपल्या हातून ते कार्य पार पडते................. ते सकारात्मक किवा नकारात्मक असू शकते.. ही सर्व व्यक्तिमधून येणाऱ्या उर्जेचा परिणाम असतो.
इच्छाशक्ती ही एक जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. या शक्तीचा वापर जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास केल्या जाऊ शकतो किवा मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.
त्यामुळेच त्या एका डायलॉगने सर्वांची मने जिंकून घेतली. सर्वाना नकारात्मक विचार येतातच मात्र ती आपल्या मनात घर करून राहायला नको............ कोणताही विचार करण्याआधी नक्कीच एकदा विचार करा की आपण जसा विचार करू तस आपल्या आयुष्यात होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जीवनाचा आस्वाद घ्यावा.
No comments:
Post a Comment