घरात एक बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत अनेक नाती जन्माला येतात. नात म्हटल की मनात एक वेगळच स्मितहास्य येते. बघा ना आपल्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर शेजारी, मग मित्र, मैत्रिणी, शिक्षक असे कितीतरी नाती तयार होतात आणि प्रत्येक नात्याच एक वैशिष्ट्य असते.
जेव्हा एक नात तयार होत ते विश्वासावर अवलंबून असते. त्या नात्यातला समजूतदारपणा, खोडकरपणा, चिडचिड, भांडण, हास्य, अबोला अश्या अनेक भावना त्या नात्यावर परिणाम करतात. काही नाती रक्ताची असतात काही दूरची असली तरी इतकी जवळची होऊन जातात कळतपण नाही. आपण प्रत्येक नात्याला नाव दिले आहे, आणि त्या प्रत्येक नात्याची एक विशिष्ट ओळख असते.
नात म्हटल की त्यात एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावना, काही विषयावर चर्चा, मदतीला असणारा हात, योग्य निर्णय सुचवणारी बुद्धी असे सर्व येते. पण त्या नात्याचा तितकाच आदर असणे पण महत्त्वाचे आहे. जेव्हा त्या दोन व्यक्तिमध्ये एकमेकाबद्दल आदर असेल, प्रेम असेल, विश्वास असेल तरच ते नात योग्य वाटेने जाते, आणि जर ते नात कमजोर झाल तर त्यातले घटक आपोआप ऱ्हास पावतात.
सोप्प वाटे नात टिकवण पण जेव्हा वेळ येते तेव्हा हिंमत लागते. नात तोडायला एक कारण खूप असते, पण तेच नात जुळवून ठेवण्यास सर्व बाजूने विचार करून, समजुतीने रहावे लागते.
झाडाला जगवण्यासाठी जस पाणी, ऊन, ऑक्सिजन हे सर्व लागते तेव्हाच ते मोठ होते आणि एकदा त्याची वाढ झाली की त्याला जपण्याची गरज नसते, तसच एकदा नात्याचा विश्वास, समजूतदारपणा दृढ झाला की त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नात जपवून ठेवण्याची ओढ असते.
No comments:
Post a Comment