मैत्रीचा उल्लेख हा अनेक शब्दात वाक्यात करू शकतो. पण माझ्या मते मैत्री हि दुधासारखी असावी, दुधात पाणी टाकलं कि पाणी दुधाचं रूपे घेते पण दुधाला उष्णता दिली कि पाणी वाफेच्या रूपात दुधापासून वेगळं होते. म्हणजेच कितीपण कठोर क्षण आला तरी ती मैत्री कायम ठेवणारं, तितक्याच विश्वासाने मन जिंकून घेणारं नातं म्हणजे मैत्री.
रंगात रंग मिसळवला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग आकर्षित असेलच असं नसते, तो नवीन तयार झालेला रंग हा त्या दोन रंगावर अवलंबून असतो. तसेच मैत्रीच्या नात्यात त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असते की हे मैत्रीचं नातं किती काळ टिकणार, विश्वास त्या मैत्रीचा मूलभूत पाय असतो.
जीवनात बरेच मित्र मैत्रीण भेटतात पण त्यातले काहीच शेवटपर्यंत सोबतीला असतात. कठीण प्रसंगी जो मदतीला येईल त्या नात्याचा मनापासून आदर करत असतो. जीवाला जीव लावणारे, खोट्या हास्याच्या मगच दुःख ओळखणारे, फक्त कामापुरते नाही तर बाकी वेळ पण आपली आठवण काढणारे, योग्य दिशा दाखवणारे असे जिवलगीचे मित्रमैत्रिणी भेटायला भाग्यच लागते.
तुमच्याकडे ते देवांनी दिलेलं अमूल्य नातं असेल तर नक्कीच जपून ठेवा....इतक्या मोठ्या जगात इतके लोक आहे पण आपली भेट त्याच व्यक्तीशी होणे आणि ते फार काळपर्यंत टिकणे हा एक देवाचाच आशीर्वाद आहे. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवूनच जाते, ती चांगलीही असू शकते किंवा वाईट पण.....एक जीवन जगायचं मूलमंत्र नक्कीच शिकवून देईल.....
No comments:
Post a Comment