बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागते, कारण त्या बाळाला बोलता येत नाही, सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईला, बाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो.
बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतात, त्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येय, आपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.
म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असते, वृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाही, त्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........
No comments:
Post a Comment