Showing posts with label हृदयस्पर्शी. Show all posts
Showing posts with label हृदयस्पर्शी. Show all posts

Sunday, August 24, 2025

निःशब्द संवाद

           आपल्या जीवनात काही असे क्षण येतात जे काहीही न बोलता खूप काही सांगून जातात. त्या क्षणात जे घडले त्याचा प्रत्यय लावणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. काही क्षण हे मनात कायम राहतात. आपल्याला खूप काही करावे वाटते परंतु काही कारणास्तव करता येत नाहीत. तशीच माझी एक आठवण एका जवळच्या व्यक्तीची.....

            निघण्याची वेळ झाली होती, मी तिची भेट घेतली आणि येते म्हणाली तितक्याच तिने घट्ट पकडलेला हात खूप काही सांगून गेला. तिला काहीतरी सांगायचं होतं पण सांगू शकले नाही परंतु मी ओळखले तिला काय म्हणायचे होते. पण घड्याळाचे काटे समोर सरकत होते आणि माझी प्रस्थान करण्याची वेळ झाली होती. प्रवास करते वेळी सुद्धा मी तोच विचार करत राहिले......

              असे काही क्षण न बोलता खूप काही सांगून जातात त्यासाठी मनाला ओळखणे गरजेचे असते. प्रत्येक वेळी  समोरच्या व्यक्तीबद्दलची काळजी ही बोलून न दाखवता वेळ येईल तेव्हा खंबीरपणे आधार देण्याची असते. सहज बोलून दाखवणे आणि प्रत्यक्षात करून दाखवणे यात फार फरक असतो आणि काही वेळेला मनात इच्छा असेल तरीही शांत रहावे लागते.

Saturday, August 16, 2025

Let's Travel

             

          Travelling is where person feels nature, meet new people. It is not only about the destination but the journey you enjoy. Travelling is new experience that has space in our hearts for the memories.It is a way to expand the thinking of our mind, heart and soul and It's not about how much distance is in our journey but cherishing seconds of that moment we enjoy.


At the end of the day what matters is you......





Thursday, July 27, 2023

पाऊसधारा

सूर्यास्ताची वेळ होती, सूर्य नजरेतून हळूवार पणे अंधाराची चाहूल लावून मावळला आणि विजेच्या लखलखीत प्रकाशाने आभाळ दाटून गेलं. बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली, एकीकडे गर्जना करत, प्रकाशित विजेचा कडाडणारा आवाज आणि दुसरीकडे लोखंडाच्या टिनावर पडलेल्या टपोऱ्या पावसाचे थेंब यांचे आवाज कानी पडत राहिले, तितक्यात विजेचा दिवा बंद झाला आणि मेणबत्तीची आठवण आली, छोट्याश्या एका ज्योतीने पूर्ण खोलीभर प्रकाश पसरवला. उजेड तर मिळाला पण पावसाचे काय, खिडकीवाटे बाहेर डोकावून पाहले तर समोरची इमारत दिसेनाशी झाली, नजरेस सर्व अस्पष्ट दिसू लागले.

खिडकी जवळ खुर्चीवर बसून थंड हवेचा आस्वाद घेण्यात माझे मन रमले होते, तितक्यात मनात विचार आला, इतका हा असा मुसळधार पाऊस दिवसा आला तर घराबाहेर पडणं सुद्धां अशक्य होईल, सर्वांचं काम ठप्प होईल पण कदाचित पावसाला आपण कधी धरणी वर जोरदार वर्षाव करावा हे ठाऊक असेल, पण आपल तर बर आहे राहायला जागा आहे पण ज्यांना राहायला जागा नाही ते या परिस्थितीला कशी मात देत असतील हे अवघडच आहे.

पूर्ण रात्र पावसाचे थैमान सुरू होते, मुसळधार पाऊस आणि विजा. अचानक पहाटे ५ ला जाग आली आणि बघते तर पाऊस सुरूच आणि विजा सुद्धा सुरू होत्या. वातावरणात उजेड पसरू लागला आणि ऊन सुद्धा निघालं. यावर्षीच्या पावसाळयात पहिल्यांदाच असा पावसाचा अनुभव घेतला.

काही गोष्टी अश्या असतात ज्या प्रत्येकवेळी कामी येणारच अस नाही पण जेव्हा त्याची गरज पडते ती आपल्यासोबत असणे हे आपल्यासाठी महत्त्वाचे असते जसे की मेणबत्ती. निसर्गाशी कधीच खेळ करू नये. हवा, पाणी, वीज आणि अग्नी याची ताकत असामान्य आहे. आधीचा दिवस कितीही कठोर, संघर्षमय गेला तरी येणारा दिवस नवीन संधी निर्माण करून आयुष्याचा आनंद देतो.

पाऊस पाहिला की तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा.

Sunday, June 18, 2023

पितृत्व

                      उरातून जन्म दिलेला नसला तरी ९ महीने बाळाला हृदयात जपणारे , त्याच बाळाला पहिल्यांदा हातात हृदयाशी मिठी मारताना डोळ्यातून आनंदाश्रू वाहणारे, आपल्या बाळाची पूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड करणारे, घरी काही कमी पडू नये यासाठी खंबीर राहणारे, काळजीपोटी संकटापासून घरच्या लोकाना दूर ठेवणारे, मूल कितीही मोठी झाली तरी काळजी करणारे, मुलांमुलीचे पूर्ण लाड पुरवणारे, स्वतःसाठी काही न घेता घरच्या व्यक्तींसाठी खरेदी करणारे, योग्य आणि अयोग्य यातील ओळख करून देणारे, शिक्षण पूर्ण व्हाव, खूप प्रगती करावी इच्छा बाळगणारे, मुलीला सासरी पाठवताना मनात यातना होत असतानाही चेहऱ्यावर दिसू न देणारे म्हणजे वडील. 



प्रत्येक पितृत्व बाळगण्याऱ्या व्यक्तीला  पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Wednesday, July 13, 2022

आनंदाचे क्षण

                                           आनंद या शब्दाच वर्णन करायच म्हटल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील बोलके शब्द निराळे असतील. प्रत्येक व्यक्तीची वेगळी भावना असते. पाऊस आला की मोर आपला पिसारा सृष्टीमध्ये पसरवत आनंद व्यक्त करतो. वाऱ्याची झुळूक आली की छोटस रोपट वाऱ्याच्या तालात डोलते. पेरलेल्या धान्याला पावसाच्या पाण्याने कोंब येतात आणि वाढ होते. प्राण्याना आनंद झाला की ते पण शेपूट हलवून किवा प्रेम दाखवून त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवतात. आणि माणसाला आनंद होतो तेव्हा सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगतो. नाचतो, गातो.
अस प्रत्येक जिवाची रीत वेगळी असली तरी आनंदाचे क्षण सर्वांसाठी सारखेच असतात.

Friday, June 03, 2022

प्रेम म्हणजे काय ?

               जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येक सजीवामध्ये असणारी ही प्रेमाची भावना, काही मनातल्या गोष्टी न बोलता  सांगून देते. प्रेम समजावायला कोणतीही वाख्या नाही. प्रेमाबद्दल कितीही शब्दाने व्यक्त केलं तरी  कमीच आहे. तर नेमक प्रेम काय असतं हे बघूया 

              जेव्हा २ व्यक्तिमध्ये नात असते, तेव्हा त्या नात्यामधील जिव्हाळा, विश्वास, आनंद, दुःख या सर्वांचा एकत्रितपणे विचार म्हणजे प्रेम. प्रत्येक आनंदात सहभागी असणार म्हणजे प्रेम, दुःखात आधार देणार प्रेम, उद्दिष्टापर्यंत पोहचवण्यासाठी ताकत देणार प्रेम, मायेचा जिव्हाळा देणार प्रेम, नेहमी विचारपूस करणार प्रेम................ अस हे प्रेम 

                 आपण घरी बागेत झाडे लावतो त्यात एखाद्या झाडाला फूल लागण्यासाठी खत पाणी देतो. जेव्हा ते फूल उगवते तेव्हा खूप आनंद होतो. त्या झाडाची वाढ होण्यासाठी केलेली काळजी पण एक प्रेमच आहे. पण तेच फूल आपल्याला आवडते म्हणून आपण त्या फुलाला तोडण आणि  फूल झाडाला खूप छान दिसते म्हणून झाडाला शोभून ठेवणे या २ वेगळ्या गोष्टी आहे. फूल झाडपासून वेगळ करण एक आवड झाली, पण तेच फूल झाडाला शोभून दिसण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रेम.

               जगाला प्रेमाचे महत्त्व समजवून सांगणारे एकमेव, सर्वांचे प्रिय म्हणजे श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या लीला बद्दल सर्वाना माहीतच आहे. राधाकृष्ण अस श्री कृष्ण आणि राधा यांचे एकत्रित  नाव आज सर्व भक्त घेतात.राधाकृष्ण एकमेकावर किती अपार प्रेम करायचे हे सर्वाना माहीत आहेत पण तरी त्यांच लग्न झाल नाही तर याच कारण खूपच सुंदरतेने सांगितलेले आहे. श्री कृष्ण आणि राधा यांच एकमेकावर प्रेम अनंत आहे. प्रेम म्हणजे एकच आत्मा आणि शरीर हे आत्मा वर कार्यरत असते. मनातून दोघेही एकच झालेले आहे. श्री कृष्णाने प्रेमा च महत्त्व सांगितलं आहे.  प्रेमात अहंकार क्रोध द्वेष, निष्काळजी या सर्वांची जागाच नाही आहे. प्रेम म्हणजे एक शुद्ध, पवित्र मनातील भावना. 

                  खर प्रेम मिळण म्हणजे एक नशीब आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करावे तितकीच आपली काळजी घ्यावी अस वाटत असते. पण जेव्हा नात्यात समजूतदारपणा, विश्वास, आपुलकी, काळजी असते तिथे खर प्रेम असते. 



Wednesday, March 02, 2022

मनाचा स्पर्श

 


  • आयुष्य खूप सुंदर आहेजेव्हा स्वतः जगता जगता दुसऱ्यासाठी जगतो.

 

  • न पाहता मनात रुजणारी गोष्ट म्हणजे खरी भावना.

 

  • निस्वार्थपणे कार्य करणे हीच खरी सेवा.

 

  • काही क्षणांना आशीर्वाद द्याल देव सुद्धा प्रेमाचा वर्षाव करीत असतो.

 

  • खरा आनंद पैशातून विकत घेता येत नाही त्यासाठी अंतर्मन निर्मळ असायला हवे.

 

  • एक रंगात दुसरा रंग एकत्र केला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग नक्कीच आकर्षित असेलच असं नाही ते त्या दोन रंगावर अवलंबून असते आणि जीवनाचं असच काही असते जेव्हा एक नवीन नात बनत.

 

  • हाताची पाच बोटे सारखी नसतात पण एकत्रित होऊन काम कस पार पडायचं माहिती आहेतसेच मैत्रीत एकमेकांना समजल्याशिवाय एकत्र काम करणे कठीण असते.

 

  • निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडून शिकवण येतेचदिवस संपला कि रात्र येतेच तेच दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होतेच तर नवीन दिवसाचा विचार मनात ठेवायचा.





३ रंग आयुष्याचे

           बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागतेकारण त्या बाळाला बोलता येत नाहीसांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईलाबाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो. 

                 बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतातत्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येयआपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.

                 म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असतेवृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाहीत्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........

ती

 कालपासून जरा अस्वस्थच वाटत होत. त्यामुळे वाटलं हे सुद्धा मी माझ्या शब्दात मांडले पाहिजे. तस तर या घटना सतत घडत आहे. मनाला चटका लावणारीमाणुसकीच्या नावाला काळ फासणारीकंठ दाटून टाकणारीआणि एक मुलगी म्हणून मनात धसकी भरणारीती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार त्यालाच समाजात बलात्कार असे म्हणतात. खूप संवेदनशील गोष्ट आहे. बँगलोर मधली घटना मी ऐकलीआणि हे ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. डोळ्यासमोर येतो तो त्या व्यक्तींनी किती सहन केले असेलकिती आक्रोश केला असेलत्या मायबापाला किती दुःख वाट्याला आलं असेल..........आणि हे सर्व थांबायला हवं आहे......

 

आपल्या देशात घडणाऱ्या या देशाला काळिमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे. काही या समोर येतात तर काही भीती पोटी लपवून ठेवतात. भारत कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञानअंतराळसाक्षरता अनेक सुविधांमध्ये प्राविण्य मिळवत प्रगती करत असला तरी जोपर्यंत या अश्या दुर्देवी घटना आपण थांबवू शकत नसेल तर त्या प्रगती ला काही अर्थ नाहीआज जर देशाच्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायला देश असमर्थ असेल तर हे देशाचं दुर्दैव्य आहे. आज एक मी पण मुलगी आहेआज या घटना ऐकून भीती पण वाटे आणि देशाच्या प्रणालीवर विश्वास बसत नाही. नेहमी ऐकण्यात येणाऱ्या गुन्ह्यापैकीं हा एक अत्याचार आहे. एखादी बातमी आली कि खूप मनावर प्रभाव पडतो. आपण सुरक्षित राहायला हवं. दिवस गेले कि आपण सामान्य बनतो आधीसारखेचआपल्याच जगात रमून जातोपण हे आपलं वागणं चुकीचं आहे.

 

समाजात याबाबदल बोलायला गेलं कि काही लोक स्त्रीला दोषी ठरवतात किंवा काही त्या नालायक लोकांना...सर्वांची वेगळे वेगळी बाजू असू शकते...पण सर्व प्रकरणात एकच पकडून आपण चालू नाही शकत.. चुकी हि कोणाचीही असू शकतेतपास केल्यावर गुन्हेगाराला पकडल्याच जाते. ज्यांच्या हातात उच्च शक्ती आहेते करतील काय करायचं ते पण गरज हि आहे स्व:रक्षणाची. शेवटी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःला ताकतीने मोठे करायचे आहे.

 

आजच्या काळात योग्य संगोपनाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनवते पण पुस्तके सोडून इतर गोष्टीविषयी ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळात स्वरक्षण म्हटलं की महिलांसाठी स्वरक्षणचे धडे शिकवले जातात परंतु त्याच्याआधीपण काही साध्या साध्या गोष्टी मदतीला ठरू शकतात. सुरवात हि आई वडिलांपासून होते. आज पालक आणि बालक यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याना या गोष्टीबद्दल जाणीव करून द्याची गरज आहे. मुलींना पण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहायला शिकवायला हवंआणि मुलांना सुद्धा मुलींचा आदर करायला शिकवायला हवा. असं संभाषण फार कमीच होत असेल. आज प्रत्येक घरात राजमाता  जिजाऊ असत्या तर शिवबा जन्माला आला असता आणि राणी लक्ष्मीबाई ची शूरता प्रत्येक मुलीत असती तर क्रूर लोकांना धडा शिकवलं असता पण आजचा काळ खूप भयंकर आहे त्यामुळे तुम्हीच ती व्यक्ती आहे जी स्वतः माणुसकी दाखवू शकेल आणि सामर्थ्य एकत्र करून शक्तीचा उपयोग कराल.

 

आपण कुठेही वावरत असताना आपल्या आजूबाजूला लोक असतातत्यामुळे लोक ओळखायला शिकणे हि स्वरक्षणाची पहिली पायरी आहे. त्यांनतर एक मर्दपणा असायला हवाजर काही वाईट घडत असेल तर त्याला विरोध करायची शक्ती असली पाहिजे. आज मार्केटला अनेक स्वरक्षणासाठी उपकरण किंवा साधन उपलब्ध आहेतती विकत घ्या आणि बाहेर जाताना नेहमी तुमच्याजवळ ठेवाकाही चुकीचं वाटलं की लगेच हिमतीने सामना करायला शिका. आज आपल्याला कोणी वाईट नजरेने बघायला नको त्यामुळे आपल्या परीने वागणूक ठेवायला हवी.


मैत्री

         मैत्रीचा उल्लेख हा अनेक शब्दात वाक्यात करू शकतो. पण माझ्या मते मैत्री हि दुधासारखी असावीदुधात पाणी टाकलं कि पाणी दुधाचं रूपे घेते पण दुधाला उष्णता दिली कि पाणी वाफेच्या रूपात दुधापासून वेगळं होते. म्हणजेच कितीपण कठोर क्षण आला तरी ती मैत्री कायम ठेवणारंतितक्याच विश्वासाने मन जिंकून घेणारं नातं म्हणजे मैत्री.

                    रंगात रंग मिसळवला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग आकर्षित असेलच असं नसतेतो नवीन तयार झालेला रंग हा त्या दोन रंगावर अवलंबून असतो. तसेच मैत्रीच्या नात्यात त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असते की हे मैत्रीचं नातं  किती काळ टिकणारविश्वास त्या मैत्रीचा मूलभूत पाय असतो.

                 जीवनात बरेच मित्र मैत्रीण भेटतात पण त्यातले काहीच शेवटपर्यंत सोबतीला असतात. कठीण प्रसंगी जो मदतीला येईल त्या नात्याचा मनापासून आदर करत असतो. जीवाला जीव लावणारेखोट्या हास्याच्या मगच दुःख ओळखणारेफक्त कामापुरते नाही तर बाकी वेळ पण आपली आठवण काढणारेयोग्य दिशा दाखवणारे असे जिवलगीचे मित्रमैत्रिणी  भेटायला भाग्यच लागते.

                तुमच्याकडे ते देवांनी दिलेलं अमूल्य नातं असेल तर नक्कीच जपून ठेवा....इतक्या मोठ्या जगात इतके लोक आहे पण आपली भेट त्याच व्यक्तीशी होणे आणि ते फार काळपर्यंत टिकणे हा एक देवाचाच आशीर्वाद आहे. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवूनच जातेती चांगलीही असू शकते किंवा वाईट पण.....एक जीवन जगायचं मूलमंत्र नक्कीच शिकवून देईल..... 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...