आपल्या जीवनात काही असे क्षण येतात जे काहीही न बोलता खूप काही सांगून जातात. त्या क्षणात जे घडले त्याचा प्रत्यय लावणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. काही क्षण हे मनात कायम राहतात. आपल्याला खूप काही करावे वाटते परंतु काही कारणास्तव करता येत नाहीत. तशीच माझी एक आठवण एका जवळच्या व्यक्तीची.....
निघण्याची वेळ झाली होती, मी तिची भेट घेतली आणि येते म्हणाली तितक्याच तिने घट्ट पकडलेला हात खूप काही सांगून गेला. तिला काहीतरी सांगायचं होतं पण सांगू शकले नाही परंतु मी ओळखले तिला काय म्हणायचे होते. पण घड्याळाचे काटे समोर सरकत होते आणि माझी प्रस्थान करण्याची वेळ झाली होती. प्रवास करते वेळी सुद्धा मी तोच विचार करत राहिले......
असे काही क्षण न बोलता खूप काही सांगून जातात त्यासाठी मनाला ओळखणे गरजेचे असते. प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीबद्दलची काळजी ही बोलून न दाखवता वेळ येईल तेव्हा खंबीरपणे आधार देण्याची असते. सहज बोलून दाखवणे आणि प्रत्यक्षात करून दाखवणे यात फार फरक असतो आणि काही वेळेला मनात इच्छा असेल तरीही शांत रहावे लागते.
No comments:
Post a Comment