Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Tuesday, December 02, 2025

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली 
माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली

लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन
तारे बघण्यात माझे कमल नयन झाले मग्न 

असंख्य ताऱ्यांच्या जगात मी होती तीला शोधत  
ती स्वयंप्रकाशित चांदणी माझ्या पडली नजरेत

आजीबाईच्या खाटेचे ४ पाय आणि ३ चोर 
शोधण्यात मग्न झाले आणि दिसली उगवती चंद्रकोर 

चांदण्यांनी भरलेलं आकाश बघून कौतूक वाटले
चांदण्या मोजता मोजता थंडगार हवेत डोळे निजले 

Sunday, October 26, 2025

आली दिवाळी 🪔



मी रांगोळी काढत असताना तू अलगद क्षण कॅमेरा मध्ये टीपावे. माझं लक्ष जाताच मी हसून पोझ द्यावी

दिवाळीची खरेदी करून तू आणावी आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करावा

चक्कीवरून दळण तू आणून द्यावे आणि दिवाळीचा फराळ आपण बनवावा

तू घराला रोषणाई करावी आणि मी घराची लक्ष्मी घराला समृद्ध करावं

आपल्या संसाराच्या प्रकाशित दिव्याची वात मी तर त्या ज्योतीला प्रकाशमान ठेवणारं तेल तू असावं

तू छान रंग मला आणून द्यावे आणि मी दिव्याला सुंदर रंगकाम करावे

सूर्यास्त झाल्यावर दिव्यांच ताट घेऊन मी दाराबाहेर पाऊल टाकावं आणि तू ते दिवे सजवून ठेवावे

झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण दारी तू लावावे, लक्ष्मी आपल्या घरी नांदावी यासाठी प्रवेशद्वाराची पूजा मी करावी

गाय आणि वासरू तू शोधून आणावे, भुरशीची पूजा करून मी गायगोधन  करावे

नरक चतुर्दशीच्या पहाटे उठून उत्साहात तू असावं, सुगंध उटन बनवून तुला प्रेमाने मी लावावे

लाकडी पाटावर विराजमान तू व्हावे, दीपावली पाडव्याला मी तुला ओवाळावे

पूजेला तू पारंपरिक पोशाख घालावा, सौभाग्यलंकार ठहराव करून मी नऊवारी किंवा सहावारी घालावी

प्रत्येक पूजेला जोडीने देवाचा आशीर्वाद घेऊन आपला संसार सुखाचा असावा ही प्रार्थना करावी



Saturday, September 27, 2025

असा असावा साथीदार 💞

कसा असावा साथीदार तर तो असा असावा


आयुष्यात चॉकलेट देणारा नसेल तरी चालेल पण 
वेळ आल्यावर गोळ्या आणि औषध देणारा असावा

प्रेमाची कबुली देणारा नसेल तरी चालेल पण
 कृतीतून प्रेम व्यक्त करणारा असावा

आनंदाच्या क्षणी सोबत नसेल तरी चालेल पण
 दुःखात असताना साथ देणारा असावा

भेटवस्तू देणारा नसेल तरी चालेल पण
 डोळ्यातले अश्रू पुसून चेहऱ्यावर हास्य देणारा असावा

स्वप्न दाखवणारा नसेल तरी चालेल पण 
स्वप्न सत्यात उतरवायची धमक असणारा असावा

परीकथेतील राजकुमार नसेल तरी चालेल पण 
खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्व आदर्श असा असावा

परदेशी नेणारा नसेल तरी चालेल पण 
आवडत्या ठिकाणी फिरायला नेणारा असावा

स्वयंपाक नाही आला तरी चालेल पण 
सोबतीने जेवणाचा आस्वाद  घेणारा असावा

संपूर्ण आयुष्य सुखाचे नसेल तरी चालेल पण 
प्रत्येक क्षणाला साथ निभावणारा असावा

वारंवार कौतुक करणारा नसेल तरी चालेल पण
मनातून कौतुकाची थाप देणारा असावा

पैशाने श्रीमंत नसेल तरी चालेल पण 
मनाने, स्वभावाने आणि माणुसकीने श्रीमंत असावा

माफी मागणारा नसेल तरी चालेल पण
कायम सत्याच्या मार्गाने जाणारा असावा

गोड गोड बोलणारा नसेल तरी चालेल पण
चार चौघात बायकोचा सन्मान ठेवणारा असावा


कसा असावा साथीदार तर तो असा असावा.


Sunday, March 02, 2025

अश्रू

कधी कधी मनमोकळेपणाने रडावे
मनातल्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडावे

रडणं ही कमकुवत मनाची निशाणी नसून
भावनांना  फुटलेला पाझर असावा

नदीचं पाणी संथगतीने वाहते तसच
डोळ्यातलं पाणी हे टपोऱ्या पावसाचे थेंब जणू

मनाला दिलासा मिळाला तरीही
पाणावलेले डोळे खुप काही सांगतात

Sunday, November 03, 2024

मैत्रीण कशी असावी....

एक तरी मैत्रीण अशी असावी
हाक मारताच ती जवळ असावी

महिन्यांनी भेटली तरी नात तेच असावं
प्रेम आणि जिव्हाळा मनापासून असावं

ना सोशल मीडियाचा रोग असावा
ना मैत्रीचा दिखावा असावा

कायम मैत्रीतील प्रेम असावं 
मन भेटण्यासाठी आतुर असावं


Sunday, October 13, 2024

समुद्र 🌊

भरतीच्या प्रवाहाने पाय झाले ओलेचिंब
निळ्याशार पाण्यात पाहिले मी माझे प्रतिबिंब 

अलगद पायाखालून रेतीचे कण निसटून गेले
मोत्यांचे आणि शंख-शिंपल्यांचें ते माहेर घर झाले

अथांग अश्या समुद्राने पाहिले सूर्यास्ताचे रूप
क्षणात दिसले आकाशात डौलदार रंगांची झेप

वाहत येणाऱ्या लाटांनी कानाला दिली साद 
पाण्याच्या प्रवाहापुढे कशाची चालत नाही दाद 

सागराचं आणि शितल चंद्राचं नात हे वेगळं
 प्रेमाचा जिव्हाळा आणि भरती-ओहोटीचा खेळ

समुद्राचे रूप पाहून मन झाले बेभान
वर्षातून एकदा तरी भेट देता यावी किमान

 हृदयात साठून गेली विशाल समुद्राची दृष्टी 
किमया त्या देवांची ज्यांनी निर्माण केली हि सृष्टी



Saturday, May 11, 2024

का रे दुरावा

          माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणूस बोलू शकतो एकु शकतो, बघू शकतो आणि विचार सुद्धा करू शकतो सोबत भावना व्यक्त करू शकतो  हे सर्व तर प्राणी पण करू शकतात पण माणूस हा कोणत्याही क्षेत्रात बुध्दीने अग्रेसर असतो.

          व्यक्तीच्या वागणुकीवर समाजाचा, सभोवतील वातावरणाचा खूप प्रमाणात प्रभाव होत असतो. आपण ज्या भविष्याचा विचार करतो तो खरा होतो, नाही होत यावर प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते पण जास्त प्रमाणात काहीतरी वेगळी परिस्थिती असते. आपण जसा विचार करतो तस काही घडत नसते, आपल्या मनासारखं होत नसल्याने आपल्याला त्या गोष्टीचं दुःख सुद्धा वाटते, डोळ्यात अश्रू दाटतात. पण त्या परिस्थितीला सामना करायला देवाने आपल्या मध्ये शक्ती दिली असते याच भान नसते. आपल्यासोबत २ गोष्टी प्रेमाने बोलले तरी आपल्याला छान वाटते. 

      भविष्यात आपलं जीवन अस असेल तस असेल असा विचार नक्कीच सर्वांनी केलाच असेल पण खरचं ते सर्व खर होत आहे का ?

आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो पण वास्तव नाही. 


मनात गुंफलेल्या तारा सोडवाव्या कश्या

नात्यातला रुसवा, फुगवा सोडवावा कसा

काचेला तडा गेला की वापरता येत नाही 

नात्याला तडा गेला की नात भरून निघत नाही

स्वतःच्या आधी ठेवलेली नाती परकी होतात

काळजी आणि प्रेमाची जागा क्लेश, मत्सर घेतात

नेहमीच्या भेटीची जागा अकस्मात होणारी भेट घेते

घट्ट नातं वाटणाऱ्या नात्यात पोकळ  निर्माण होते




Sunday, January 07, 2024

सोबती 🥰

हातात हात धरुनी गाठायची यशाची शिखरे 
जीवनात भिरभिरू लागली  रंगीबेरंगी पाखरे

मन नाचू लागले आनंदाने, तु आयुष्यात आल्याने
जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला देवाने

अंतर असल आपल्या दोघात तरीही एकत्र आहे मन
प्रेमळ शुभेच्छा एकमेकांना  देऊन साजरे करूया सण

आशेची किरण मनात ठेवून स्वप्न पूर्ण करुया 
येणाऱ्या नवीन पिढीला योग्य ती दिशा दाखवूया 

सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणातून एकमेकांना सावरुया
एकमेकांना अशीच सोबती सात जन्म देऊयात 

Monday, October 02, 2023

आठवण येते तुझी

आठवण येते तुझी हो आठवण येते तुझी

डोळ्यासमोर उभा झाला की डोळे पाणावतात
भेटल्या भेटल्या गालाच्या चीमट्या घेत हसायचा 

काय हवं तुला म्हणून प्रेमाने विचारायचा
बाहेर जाऊन छान छान खाऊ आणायचा

तू काहीतरी वेगळं कर असच मला म्हणायचा
माझ्या भविष्यासाठी  तु स्वप्न बघायचा

नेहमी चेहऱ्यावर हसण्याच तेज असायचं
आता हे सर्व आठवण म्हणून जपायच

तू दूर गेल्याच्या संकटांतून सर्वांनी सावरायचं
आठवण येते तुझी हो आठवण येते तुझी

Sunday, November 27, 2022

माझे मन






फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले 

गुलाबी  रंगात  रंगून पुष्प वाऱ्याने डुले 

पावसाचे थेंब जणू वाटे फूल मोत्याने सजलेले 

फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले










Wednesday, March 02, 2022

भारत भूमी

 झेंडा आमुचा या भारत भूमीचा

शान बाण आणि मान आमुचा

फडकत राहील वरी महान

गर्व आम्हास त्या तिरंगाचा

झुकून करतो आम्ही प्रणाम याला

करतो आम्ही प्रणाम...

लढले  गांधीटिळकनेहरू,

लढले आमचे वीर जवान

सोबत आधार  देत लढली आपली जनता

या भारत मायेला अर्पण केले त्यानी आपले प्राण

करतो आम्ही प्रणाम यांना करतो आम्ही प्रणाम .....

फुलपाखरू आधारित मानवी जीवन

 अळीच्या जन्मात नकोशी होते मी

फुलपाखराच्या रूपात सजून होते मी 

फुलांचं आणि माझं नातं हे वेगळं 

रंगबिरंगी छटा माझ्या पंखावर उठलं 

हातात ना येई मी हवा मला सुगंधी द्रव्य

सर्व चाहते माझ्यावर करतात काव्य

संदेश देऊ इच्छिते सर्वाना सौंदर्यावर जाऊ नका  

बाह्यरंग सुंदर असेल तरी माझ्या शरीराला आहे खूप नाजूकपणा..

ताकत बघा मनातली माझी हाती कधी येणार नाही 

एवढ्या मोठ्या जगात मला माझा जीव गमवायचा नाही 

का तर........?

मला लढायचं आहे सामोरे जायचं आहे 

सर्वाना घेऊन मला चालायचं आहे





फुलपाखराचा जन्म छोट्या अंड्यापासून होतो. त्यातून जीव बाहेर येऊन अळी बनून आपली कात सोडते आणि त्याच रूपांतर एका कोशात होते आणि त्यातच एक मनमोहून टाकणार फुलपाखरू जन्माला येत. साधं छोटासा फुलपाखरू एक निसर्गाचं देणंत्यातून पण शिकवण मिळतेछोटा असो कि मोठं प्रत्येक जीवांमध्ये एक शिकवण लपली असते फक्त ती शोधून काढणे गरजेचं असते.

आज ते पाखरू आहे  सर्व मानवाला मोहून टाकते आकर्षित करते पण त्या आधीच त्या जीवाचं रूप कोणालाही मोहक वाटत नाही. अळी ही सर्वाना नकोशी वाटते मात्र जेव्हा तीच रूपांतर फुलपाखराच्या होते तेव्हा मात्र सर्वाना ते हवं असते,  माझ्या हातावर बसावंमी त्याला पकडावं असं प्रत्येकाला वाटते. याचप्रकारे हे फुलपाखरू मानवाला एक शिकवण देऊन जाते. बाह्यरंगपेक्षा अंतरंग महत्त्वाचे हे सर्वाना माहित असेलही तरीही चेहऱ्याच्या सौंदर्याला जग मान्यता देते. आर्थिक चैनीच्या वस्तूसौंदर्यश्रीमंतीआनंद या सर्वच एक आकर्षण वाटेसर्वाना सुख हवं असते पण दुःख नको असतेसुखात सर्वेच असतात पण दुखात कोण असते हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपले कोण हे माहिती पडते. 

हसत खेळत  फुलपाखराप्रमाणे बागडाजीव कोणत्यापण परिस्थितीमध्ये असेल तरी त्याचा स्वीकार करा. अळीला वाटले असेल आपलं आयुष्य संपलं परंतु तिचा एक नवा जन्म एक नवं रूप जगात येणार आहे हे माहिती नसते पण तो निसर्गाचा नियम आणि धन्य त्या देवाची किमया ज्यांनी या सृष्टीला घडवलं एक आकर्षितमनमोहकविविध जीवांची निर्मिती केली आणि त्या प्रत्येक जिवाकडून शिकवण घेता येईल.


चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...