हातात हात धरुनी गाठायची यशाची शिखरे
जीवनात भिरभिरू लागली रंगीबेरंगी पाखरे
मन नाचू लागले आनंदाने, तु आयुष्यात आल्याने
जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला देवाने
अंतर असल आपल्या दोघात तरीही एकत्र आहे मन
प्रेमळ शुभेच्छा एकमेकांना देऊन साजरे करूया सण
आशेची किरण मनात ठेवून स्वप्न पूर्ण करुया
येणाऱ्या नवीन पिढीला योग्य ती दिशा दाखवूया
सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणातून एकमेकांना सावरुया
एकमेकांना अशीच सोबती सात जन्म देऊयात
No comments:
Post a Comment