| गणपतीचे मनमोहक चित्र |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Saturday, September 23, 2023
एक वेगळा उपक्रम
Sunday, April 02, 2023
महत्त्वाकांक्षा
भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.
#BeStrong #LiveInTheMoment
Thursday, March 02, 2023
मनातलं काही
तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशाची एक अनोखी ओळख आहे, आपला देश म्हणजे भारत, पूर्ण परिसर दणाणून टाकणारं घोषवाक्य भारत माता की जय असे आपण म्हणतो. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकविले जाते की भारत हा फक्त देश नसून आपली माता सुद्धा आहे, आणि आपला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र किवा साम्राज्य.
आपला देश /राज्य घडवण्यासाठी अनेक थोरपुरुषांना वीरमरण आले, अनेक क्रांतिकारी सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनदान दिल. आपला इतिहास खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला, देशाला गुलामगिरीतून मुक्त कसे करावे याचा विचार करून अमलात पण आणला. पण दुःख या गोष्टीच वाटते आज समाजातील काही पापी लोकांना या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. या जमिनीवर अनेक सजीव आहेत पण त्यातला मानवी रूपात जन्माला येण नशीब असते. पण हे सुद्धा लोकाना कळत नाही आहे. प्रत्येकाचा जन्म हा एक स्त्रीच्या उदरातून होतो आणि त्याच स्त्रीला वाईट बोलणे, वाईट नजर टाकणे हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडते आहे, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत घडते आहे, नेहमी स्त्रीला मातेसमान मानणारे आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अस घडताना चीड येते आणि वाईट सुद्धा वाटते.
आपण आपल काम करायच, उगाच गोष्टीत आपला वेळ घालवायचा नाही अशी पण मानसिकता असणारे लोक असतात. आपल्यावर असते आपल्याला कोणत्या मार्गाने जायच. परंतु वाईट गोष्टीला विरोध करणे हे ही महत्त्वाचे, काही गोष्टी फक्त दुर्लक्षित करून जमत नाही त्यावर उपाय पण शोधणे महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टीची सवय लावायला वेळ लागतो, तसेच चांगल्या गोष्टीपेक्षा माणूस वाईट गोष्टीना लवकर आहारी जातो.
एकीकडे कष्ट करून यशस्वी होणारी व्यक्ति आणि एक वाईट गोष्टीत चर्चेत असणारी व्यक्ति, यापैकी जास्त आकर्षण वाईट गोष्टीला मिळते हे तितकच सत्य आहे. भान राखा आपण काय करतोय आणि वाईट गोष्टीला समर्थन चुकूनही करू नका.
Sunday, August 14, 2022
हर घर तिरंगा
Saturday, June 25, 2022
नारी सशक्तीकरण
आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा
हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात
महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण
मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे
महिलांची प्रगती.
आजच्या
काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण
आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक
घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने
स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत
असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे
अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.
महिलांची
जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात
काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण
घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.
मुलगी
शिकली प्रगती झाली
Wednesday, March 02, 2022
रक्तदान - श्रेष्ठ दान
परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छिते, जेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.
सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतात, त्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते.
मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.
आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.
Sunday, February 06, 2022
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य हा शब्द कानी आला की लगेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला, हेच वाक्य गुणगुणत असते. आपल्याला त्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि गर्वानी आपल्या देशाचा मान तिरंगा फडकवतो. पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे काय? या प्रश्नाची अनेक उत्तर येतील, स्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनासारखं वागू शकू आपल्याला हवं ते करू शकू, जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकू पण खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी आज आपला बलाढ्य भारत बनवण्यास सहकार्य केले, त्रास सहन करून पण हार नाही मानली त्यांना मनात प्रेरणास्थान ठेवून आजच्या भारतात एक जबाबदार नागरिक, एक चांगला व्यक्ती बनून राहणे हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मभूमीसाठीच कर्तव्य आहे. थोर व्यक्ती काही मूळ तत्त्वावर जीवन जगतात. थोर व्यक्ती वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाही, जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आणि आवड या तत्त्वाची गरज असते.
त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे एक विश्वास, एक इच्छा, एक आवड , माणुसकी आणि एक कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. सर्व आपल्याच मनासारखं घडावं हे गृहीत धरणे बरोबर नाही पण त्यात सर्वांना घेऊन चालण्याला अर्थ आहे, एक कार्य पण खूप काही शिकवून देते त्यामुळे याचा खरा अर्थ समजून जीवन जगण्यातच आनंद आहे.
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....

