भारतात स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय हिंद जय भारत
हर घर तिरंगा

No comments:
Post a Comment