लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Friday, August 15, 2025
ती एक रात्र 🌌
Wednesday, August 14, 2024
खरचं देश स्वतंत्र झाला काय ?
Friday, January 26, 2024
Incredible India 🇮🇳
Sunday, June 18, 2023
मानवा डोळे उघड
मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्म. देवांवर विश्वास ठेवणारे म्हणजे आस्तिक आणि विश्वास न ठेवणारे म्हणजे नास्तिक. आपण देवाला प्रत्यक्षात पाहलेले नसले तरी त्याचं रूप आपल्याला माहीत आहे, मूर्तिमार्फत किवा फोटोमार्फत आणि काहींनी अनुभव पण घेतला असेल.
सर्वांना सुखी ठेव, ज्ञान दे, बुद्धी दे अशी प्रार्थना आपण देवाला करतो आणि देव आपल सर्व ऐकतो आणि आपल्याला साह्य करतो अशी ही आपली श्रद्धा असते. देवाबद्दलची मनातील श्रद्धेची भावना निर्मळ आणि पवित्र असते. देव आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, फक्त भक्तांनी पवित्र मनाने भक्ति करावी. आजच्या काळात काही प्रमाणात रूप बदललेल दिसते, धर्माच्या नावावर लोकांकडून पैसा काढला जातो, प्रत्येक मंदिरात दानपेटी असते, भक्त इच्छेप्रमाणे दानपेटीत पैसे दान करतो पण काही ठिकाणी श्रद्धेच्या नावावर लोकांकडून पैसा मागितला जातो आणि हे मला पूर्णपणे चुकीचे वाटते, जिथे पैसा आला तो व्यवसाय झाला असे मला वाटते.
आजही काही संस्था खूप छान प्रकारे कार्य करत आहे. सर्वांना सोईस्कर दर्शन व्हावे, महाप्रसाद मिळवा यासाठी खूप छान पद्धतीने नियोजन करत आहे आणि या संस्थाकडून हीच शिकवण घेणे उपयुक्त ठरेल. स्वतः मनापासून दान करणे आणि मागितलेले पैसे देणे यात खूप फरक असतो आणि देवकार्यात चुकीच्या मार्गाने पैसे येत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
Wednesday, March 02, 2022
अर्थ गणित
घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन , संपदा, शांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..
आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढला, लहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळद, मेहंदी, लग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.
जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचा, आणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचे, वाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करून, मैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...
आजच्या काळात माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल.
जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....
पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे.. या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..
म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....
पालक आणि बालक
आईवडील म्हणून जगताना आधी एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जगावं लागत, पण का असं ? तर मित्र आणि मैत्रीण म्हटलं कि आपल्याच वयाचे असतात, त्याच डोकं सारखंच चालत आणि विचार सारखेच चालतात. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन सांगत असेल तर फारच उत्तम आहे. पाल्याला एक वळण लावण्यास मदत होईल. चांगली कामगिरी असेल त शाबासकी देता येईल किंवा चुकीचं घडल्या वळण लावता यतेची. पण तेच लेकरू घाबरत असेल तर ते काय सांगणार, घरातच वाद, भांडण, ताणतणाव तर कोणत्या प्रकारे मनोवृद्धी होईल, किंवा काय शिकेल अजून घाबरेल ते, मी नाही सांगत भीती वाटे मला , असं मन होऊन जाईल आणि ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा प्रयत्न पण करणार नाही.
शिक्षण महत्त्वाचं आहेच, त्यात एका दबावाखाली येऊन अभ्यास करीत भरपूर मार्क्स मिळवणार, परंतु फक्त अभ्यासच करणे हा त्यावरचा पर्याय नाही आहे. अभ्यास सोडून पण इतर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मार्क्स वरून त्या विद्यार्थ्यांची किंमत लक्षात घेणे हे चुकीचं आहे. सर्वांच्या वेगळ्या उच्च, आवडीनिवडी असतात. मार्क्स भरपूर आले की, अपेक्षा पण वाढते आपलं नाव मोठं करेल म्हणून, करेल नक्कीच पण त्या अडखडलेल्या मनाचं काय ? जर कधी अपयश मिळालं तर .... चुकीचा विचार केला तर......
साधं उत्तर आहे, आपल्या पाल्याला एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जवळ घ्या, एक जीवन कस जगायचं, जगातील बाहेरचे लोक वाईट दृष्टिकोनाचे असू शकतात., या काही गोष्टींबाबदल सांगा. आणि एक खरं जीवन जगणारा व्यक्ती बनवा, हेच खूप मोलाचं आहे. लहानपणी तुम्ही हि शिकवण दिली तर तुमच्या म्हातारपणात तुम्हाला एकटं नाही सोडणार. फक्त गरज पुरविणे इतकच नसते हे प्रेम, शिक्षण घेतलं मोठ्या नोकरीवर असून आईवडिलांसाठी वेळ नसणाऱ्या लोंकाना किंमत नसते.
जग खूप मोठं आहे , जगायचं असेल तर वाघासारखा जगायला शिकवा आणि मरण हे किड्यामुंगीसारखे नको आहे. रस्त्यावर जाताना पण पाटी असते त्यावर लिहलं असते,'नजर हाती दुर्घटना घटी'. संगोपन हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे. म्हणतात ना 'जे पेराल तेच उगवेल' म्हणजेच तुम्ही जशी शिकवण द्याल वळण द्याल तशीच वागणूक ही तुमच्या पाल्यामध्ये असेल.
विचार करा आणि पटलं तर नक्कीच जीवनात या विचाराचे पालन करा.......
३३ कोटी देवतांची संकल्पना
देव हा एकच आहे. देवांनी भिन्न रूप धारण करून एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्म, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या देवांना पंचदेवता मानले जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत असे मानले जाते. महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे.
गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही देवतांची संख्या नाही. संस्कृतमध्ये ' कोटी ' या शब्दाचा अर्थ ' प्रकार ' आहे, म्हणून ३३ कोटी देवता नसून देवता या ३३ प्रकारच्या आहेत.
त्या ३३ देवता कोणत्या ते बघूया
सृष्टीचे व्यवस्थापन करणे हे या ३३ कोटी देवतांकडे असते असे मानले जाते. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू, ११ रुद्र, १२ आदित्य, १ इंद्र, १ प्रजापती यांचा समावेश आहे. प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे असल्यामुळे त्यांना कोटी असे म्हटले जाते.
- ८ वसू - आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास ( जल, तारे, चंद्र, पृथ्वी, वायू, अग्नी, सूर्य, आकाश )
- ११ रुद्र - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
- १२ आदित्य - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू
सूर्याला आदित्य पण म्हटले जाते. भारतीय दिनदर्शिका सूर्य आधारित बनवलेली असते. एक वर्षात १२ महिने असतात. त्याच १२ महिन्यांना आदित्य म्हणून संबोधले जाते.
- १ इंद्र
- १ प्रजापती
असे पूर्ण मिळून ३३ प्रकारचे देवता संपूर्ण सृष्टीला जीवनदान प्रदान करतात. ३३ देवतांचे देवता हे साक्षात देवांचे देव महादेव आहे.
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....