Sunday, February 06, 2022

स्वातंत्र्य

    स्वातंत्र्य हा शब्द कानी आला की लगेच 15 ऑगस्ट  1947  रोजी आपला भारत स्वतंत्र झालाहेच वाक्य गुणगुणत असते. आपल्याला त्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि गर्वानी आपल्या देशाचा मान तिरंगा फडकवतो. पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे कायया प्रश्नाची अनेक उत्तर येतीलस्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनासारखं वागू शकू आपल्याला हवं ते करू शकूजिथे जायचं आहे तिथे जाऊ शकू पण खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी आज आपला बलाढ्य भारत बनवण्यास सहकार्य केलेत्रास सहन करून पण हार नाही मानली त्यांना मनात प्रेरणास्थान ठेवून आजच्या भारतात एक जबाबदार नागरिकएक चांगला व्यक्ती बनून राहणे हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मभूमीसाठीच कर्तव्य आहे. थोर व्यक्ती काही मूळ तत्त्वावर जीवन जगतात. थोर व्यक्ती वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाहीजीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आणि आवड या तत्त्वाची गरज असते.

    त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे एक विश्वासएक इच्छाएक आवड माणुसकी आणि एक कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. सर्व आपल्याच मनासारखं घडावं हे गृहीत धरणे बरोबर नाही पण त्यात सर्वांना घेऊन चालण्याला अर्थ आहेएक कार्य पण खूप काही शिकवून देते त्यामुळे याचा खरा अर्थ समजून जीवन जगण्यातच आनंद आहे.

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...