Sunday, February 20, 2022

संघर्ष

          संघर्ष हा असा शब्द आहे ज्यात माणूस आपली पूर्ण मेहनत त्या ध्येयाकडे पोहचण्यात लावते . तो संघर्ष करताना माणसाला दुखापत होते वेदना होतात पण शेवट हा एक महत्त्वाचा भाग असतो. एक लहान बाळ सुरुवातीला हालचाल करायला लागते त्यांनतर ते पलटायला शिकते .काही दिवसांनी रंगायला सुरुवात करते आणि मग आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकते.आता यात काय होते कि जेव्हा प्रत्येक एक पाऊल बाळाचं संघर्षच असतेम्हणजेच हात पाय चा नियंत्रण समजायला लागले कि एक संघर्ष चालू होतो त्याला अजून कायकाय करता येईल.आपले शरीराचे अंग कसे हलवता येईल याचा संघर्ष करता करता ते बाळ चालायला शिकते पण तेव्हा बाळाला आधार असतो. तो आधार देतो पण संघर्ष हा बाळालाच करावा लागतो.

       असच अगदी पूर्ण मानवी जीवनात अनुभवायला मिळते. प्रत्येक दिवसाला एक संघर्ष असतो  पण त्यात फक्त बसून राहायचं कि त्या गोष्टीला सामना करायचं हे त्या व्यक्तीवर असते. धडपडण्याऱ्या कार्यातच यशाचा आनंद असतो. जितकी जास्त मेहनत बुद्धी वापरली तिथेच त्याचे यशामध्ये रूपांतर होते. 

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...