आज लोक म्हणतात माझं मोठं घर आहे,त्यासमोर बगीचा आहे,मोठी जागा आहे,पण त्यात राहणारे किती लोक आहेत याबद्दल कोणी बोलत नाही. चार भिंती आणि त्यावर असणारा छत म्हणजे एक वास्तू झाली.पण तिथे राहण्यारा लोकांमुळे त्या घराला घरपण येते हे सर्वीकडे आपण ऐकतो. खूप पैसे लावून घराला बांधतात एकदम नटून थाटून तयार करतात. नवीन महागडी वस्तू घेतात घर सजवायला पण खरंच हे सर्व महत्त्वाचं आहे का ?
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Friday, February 25, 2022
घर
चला तर बघू, घर म्हणजे नेमकं काय?
घर हा शब्द दोन अक्षरी असला तरी खूप काही लपलेलं आहे या शब्दात. नक्कीच घर हे असं ठिकाण जे आपलं असते, जिथे आपण वास्तव्य करतो. विटा सिमेंट चा वापर करून एक इमारत बनवली जाऊ शकते एक वास्तू बनवली जाऊ शकते पण घराला घरपण हे तिथे राहण्याऱ्या लोकांमुळे येते. त्यासाठी मूळ मजबूत असावी लागतात. त्यात मूळ म्हणजे घरात राहण्याऱ्या लोकावरचा विश्वास. विश्वास हि एक गोष्ट अशी आहे जी कोणत्याही नात्याला टिकवून ठेवते, त्यात दोन्ही व्यक्तीच्या भावना खूप महत्वाच्या ठरतात. समाधान, शांती, समजूतदारपणा, प्रेम, आपुलकी हेच मूळ तत्त्व आहे. घर याच गोष्टीवर खंबीर असते.
आज काहींकडे पैसे खूप असतो पण घरात समाधान नसते, सतत वाद झगडे होत असतात, याला काही अर्थ नाही ,नात्यात वाद होत असले कि आणखी ते घट्ट होते पण त्यात दोन्ही व्यक्तीचा समजूतदारपणा हवा तेव्हाच ते नातं टिकत. घरात जेव्हा समाधान असते तेव्हाच शांती पण नांदते.त्यामुळे घर हे फक्त तिथे राहणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते.घर छोटं असेल तरी चालेल पण हि मूळ तत्व मनात ठेवून जगण्याला नक्कीच वेगळी वाट मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....
No comments:
Post a Comment