झेंडा आमुचा या भारत भूमीचा
शान बाण आणि मान आमुचा
फडकत राहील वरी महान
गर्व आम्हास त्या तिरंगाचा
झुकून करतो आम्ही प्रणाम याला
करतो आम्ही प्रणाम...
लढले गांधी, टिळक, नेहरू,
लढले आमचे वीर जवान
सोबत आधार देत लढली आपली जनता
या भारत मायेला अर्पण केले त्यानी आपले प्राण
करतो आम्ही प्रणाम यांना करतो आम्ही प्रणाम .....
No comments:
Post a Comment