व्हायरस भारतात आला. सर्व शाळा महाविद्यालय १५ दिवस बंद ठेवण्याची सूचना मिळाली. सर्वानी आपल्या आपल्या घराकडे वाट धरली. झटपटीने हा कोरोना व्हायरस पूर्ण जगात पसरला आणि एक संघर्ष सुरु झाला. या व्हायरस ची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊन सुद्धा करण्यात आले. या लॉकडाऊन मध्ये गरीबाची रोजची कमाई गेली. खायला अन्न नाही, खिश्यात पैसे नाही, जीवन जगण्याला संघर्ष सुरु झाला, भीतीच वातावरण तयार झालं. घरावर छत असणारे आनंदात एकत्र राहत पण ज्यांच्याकडे राहायला घर नाही, नोकरी गेल्यामुळे हातात पैसे नाही, धंदा बुडल्यामुळे हातात पैसे नाही अश्या लोकांचं जीवन जगण कठीण झालं.
भारत हा लोकसंख्येमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या अंदाजे १३९ कोटी आहे. झपाट्याने कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागली. तज्ञ, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी हे सर्व जनतेच्या संरक्षणासाठी लढत आहेत, पण काही वाईट प्रवृत्तीचे लोक या संकटाचा दुरुपयोग करताना सुद्धा सापडले, अनेक घटना या प्रसार माध्यमाद्वारे बघायला मिळते आहेत. २०२० मध्ये सर्वात जास्त सप्टेंबर मध्ये रुग्ण आढळून आले त्यांनतर याची आकडेवारी कमी होऊ लागली, आणि लोकांची काळजी संपली, कमी आहे रुग्ण सर्व ठीक होईल असा समज सर्वांचा झाला. परंतु फेब्रुवारी २०२१ पासून आणखी रुग्ण वाढायला सुरुवात झाली, अनेक प्रश्न उद्भवू लागले, लस घेतली तरी या व्हायरस ला लोक बळी पडले.
आजच्या काळात सर्वात जास्त कठीण परिस्थिती आहे, ना हॉस्पिटल मध्ये बेड मिळेना,ना औषध मिळेना, ना राम्डेसिवीर इंजेकशन मिळेना......रुग्णाच्या नातेवाईकाची धडपड ना पोटात अन्न, ना हातात जीव वाचवायला साधन.... १ वर्ष उलटून गेल. हे वर्ष आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्टीने घातकच ठरले. इतकं जगात सुरु असताना आज पण लोकांना वाटे मला काही होणार नाही....मास्क न वापरणे, सानिटीझर न वापरणे, तब्येतीकडे दुर्लक्ष करणे अश्या काही कारणाने आपणच त्या रोगाला निमंत्रण देत अहो हे लक्षात घ्यायला पाहिजे.आज या सेवेत ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांना श्रद्धांजली, आणि आजपण जे हिम्मतीने कार्यरत आहेत त्यांचं कौतुक आहे.
ताज्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे लगेच आपल्याला कळून जाते. आपण या वर्षात काय काय शिकलो या प्रश्नच सर्व वेगळे वेगळे उत्तर देतील पण त्यातील काही सामान्य उत्तरे असतील. स्वतःची काळजी स्वतः घ्यावी, शरीर सुदृढ हवं. प्रतिकारशक्ती मजबूत हवी, व्यायाम आणि आहार हा शरीराची गरज आहे. परिस्थिती इतकी बेताची आहे की जवळपास प्रत्येक व्यक्तींनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला या महामारी मध्ये हरवलं असेल. त्यामुळे स्वतःसाठी, घरच्यांसाठी, लोकांसाठी मास्क वापरावे. सर्वाशी प्रेमाने वागा बोला. द्वेष, मत्सर, राग सर्व सोडून प्रेमानी आपल्या घराला सजवा..उद्या आपल्यासोबत कोण असेल कोण नाही हे आपल्याला नाही माहित.
कोरोना व्हायरस हे फक्त निमित्य आहे, पण आजच्या काळात गुन्हे, मारामारी, बलात्कार, द्वेष, मत्सर, राग, वाद, छळ असे अनेक निसर्गाविरोधात केलेल्या कृत्याची भरपाई आहे. "आता तरी सुधरा" हेच निसर्ग लोकांपर्यंत संदेश पोहचवत आहे. निसर्ग म्हणजेच देव , देवाच्या विरोधात होणार कार्य विनाशाकडे जाणारच....
सुरक्षित राहा.....स्वतःला जपा....शरीर सुदृढ नसेल तर संपत्ती, गाडी, बंगला याला अर्थ नाही.....
No comments:
Post a Comment