Wednesday, March 02, 2022

जगाचा पोशिंदा

   प्रत्येक व्यक्ती लहानपणापासूनच मूलभूत गरजा शिकले त्या म्हणजे अन्नवस्त्रआणि निवारा. आणि बाकी जीवनाला सोईस्कर करण्यासाठी निर्मित करण्यात आलेले साधन आहेत. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही देवासारखी माणसं आपल्या कष्टाचं सोन करतात. आणि त्याच पैकी एक जगाचा पोशिंदा - शेतकरी बद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.

             देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला कीमाझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा माणूस म्हणजे शेतकरीजो धान्यभाजीपालाकच्चा मालआपल्या जमिनीत राबराब राबूनदिवसरात्र कष्ट करून पिकवतो. त्याच शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतात. जगातला एकच असा मानव आहे जो ताससुट्टी चे दिवस न बघता स्वतःसाठी नाही तर पूर्ण जगासाठी राबतो तो असतो शेतकरी.

              आज त्या शेतकऱ्यामुळे आज आपल्या घरात शिजवायला धान्य आहेखायला चविष्ट असे फळभाजीपाला आहे. कापडनिर्मिती सुद्धा त्या जमिनीमधून उगवण्याऱ्या कापसावर अवलंबून आहे. घाम गाळूनमेहनत करूनजीवाची पर्वा न करता त्या पिकाला आपल्याच जीवाचा भाग समजून उगवणाऱ्या पिकाला पैशाची किंमत जोडणे सहज होते पण विचार केला तर त्याची किंमत अमूल्य आहे.

           कधी निसर्ग खेळ करतोकधी सरकार खेळ करतेकधी महामारी खेळ करते पण त्यात भिरडण्याऱ्या त्या अन्नदाताचे काय 

           कर्ज घेऊन शेती करतात मेहनत घेऊन कष्ट करतात पण जेव्हा शेवटी हाताला काही लागत नाही किंवा कर्ज फेडू शकणार धन हाती येत नाही तेव्हा तो दाता आत्महत्येला बळी पडतो. त्या मागे त्याच कुटुंब अनाथ होतेआणि त्यामागचं दुःख हे सोसणे कठीण होऊन जाते.

            आज एक स्वतः कडून आपण जितकी मदत करू शकू तितकाच आपल्या हातात आहे. महागड्या ठिकाणी खूप वस्तू घेतो मात्र भाजीफळ घेताना भाव करतो. आज त्याच्यामुळे आपण आहो हे विसरायला नको. त्यांना त्यांचा अधिकारआदर हा मिळायला हवा.

           थोडा विचार करूयाआज जर शेतकरी संपावर गेले काय होईलशेती बंद होईलपीक उगवणार नाही ना भाजी उगवणारआणि आपल्या ताटात रोज अन्न असते ते पण मिळणार नाही.

          भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग याच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन २३ डिसेंबरला  साजरा केला जातो. वेळेआधीच काही गोष्टीचा आदर करायला शिकणे  महत्वाचे असते. त्यामुळे तो गरीब असेलही पण तो जगाचा पोशिंदा आहे आणि अन्न आपली गरज आहेहे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.

No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...