जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. प्रत्येक सजीवामध्ये असणारी ही प्रेमाची भावना, काही मनातल्या गोष्टी न बोलता सांगून देते. प्रेम समजावायला कोणतीही वाख्या नाही. प्रेमाबद्दल कितीही शब्दाने व्यक्त केलं तरी कमीच आहे. तर नेमक प्रेम काय असतं हे बघूया
जेव्हा २ व्यक्तिमध्ये नात असते, तेव्हा त्या नात्यामधील जिव्हाळा, विश्वास, आनंद, दुःख या सर्वांचा एकत्रितपणे विचार म्हणजे प्रेम. प्रत्येक आनंदात सहभागी असणार म्हणजे प्रेम, दुःखात आधार देणार प्रेम, उद्दिष्टापर्यंत पोहचवण्यासाठी ताकत देणार प्रेम, मायेचा जिव्हाळा देणार प्रेम, नेहमी विचारपूस करणार प्रेम................ अस हे प्रेम
आपण घरी बागेत झाडे लावतो त्यात एखाद्या झाडाला फूल लागण्यासाठी खत पाणी देतो. जेव्हा ते फूल उगवते तेव्हा खूप आनंद होतो. त्या झाडाची वाढ होण्यासाठी केलेली काळजी पण एक प्रेमच आहे. पण तेच फूल आपल्याला आवडते म्हणून आपण त्या फुलाला तोडण आणि फूल झाडाला खूप छान दिसते म्हणून झाडाला शोभून ठेवणे या २ वेगळ्या गोष्टी आहे. फूल झाडपासून वेगळ करण एक आवड झाली, पण तेच फूल झाडाला शोभून दिसण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे प्रेम.
जगाला प्रेमाचे महत्त्व समजवून सांगणारे एकमेव, सर्वांचे प्रिय म्हणजे श्री कृष्ण. श्री कृष्णाच्या लीला बद्दल सर्वाना माहीतच आहे. राधाकृष्ण अस श्री कृष्ण आणि राधा यांचे एकत्रित नाव आज सर्व भक्त घेतात.राधाकृष्ण एकमेकावर किती अपार प्रेम करायचे हे सर्वाना माहीत आहेत पण तरी त्यांच लग्न झाल नाही तर याच कारण खूपच सुंदरतेने सांगितलेले आहे. श्री कृष्ण आणि राधा यांच एकमेकावर प्रेम अनंत आहे. प्रेम म्हणजे एकच आत्मा आणि शरीर हे आत्मा वर कार्यरत असते. मनातून दोघेही एकच झालेले आहे. श्री कृष्णाने प्रेमा च महत्त्व सांगितलं आहे. प्रेमात अहंकार क्रोध द्वेष, निष्काळजी या सर्वांची जागाच नाही आहे. प्रेम म्हणजे एक शुद्ध, पवित्र मनातील भावना.
खर प्रेम मिळण म्हणजे एक नशीब आहे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करावे तितकीच आपली काळजी घ्यावी अस वाटत असते. पण जेव्हा नात्यात समजूतदारपणा, विश्वास, आपुलकी, काळजी असते तिथे खर प्रेम असते.

No comments:
Post a Comment