Wednesday, March 08, 2023

आत्मनिर्भर स्त्री

ती आहे म्हणून 
आपण आहो 
ती आहे म्हणून 
घरपण आहे 
ती आहे म्हणून 
विश्व आहे 
ती आहे म्हणून 
नात्यांमध्ये प्रेम  आहे 


                       ८ मार्च म्हणजे  जागतिक महिला दिन, हा दिवस फक्त आपल्या महाराष्ट्रापर्यंत किंवा  देशांपर्यंतच नाही तर संपूर्ण जगाचा महिला दिन आहे. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादि मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली होती आणि हे आंदोलन म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी  केलेला  पहिला लढा होता, आणि या लढ्याची पूर्ण मेहनत आज संपूर्ण जगाला  दिसते आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, तरी सुद्धा तिला प्रत्येक संकटावर मात करावी लागते, तिला सामोरे जावे लागते, अस म्हणतात स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, नक्कीच याच कारण एकच आहे, पुढची पिढी कशी घडवायची, कसे संस्कार हवे, कश्या चालीरीती हव्या हे सर्व एक स्त्रीवर अवलंबून असते. ती आहे त्यामुळे आज मी लिहीत आहे. ती आहे म्हणून तुम्ही वाचत आहात, बघत आहात. स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी, म्हणायला बोलायला खूप छोटा शब्द आहे स्त्री, महिला, WOMEN पण याच शब्दात कितीतरी ताकद आहे, बळ आहे कारण हीच स्त्री आपल्या मुलांमुलीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आपल्या जीवाचे रान करते, याचे उदाहरण कितीतरी आपण  देऊ शकतो.


ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळली 
तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला 
ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली 
तो जिजाऊचा  शिवबा झाला 
ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळली 
तो रमाचा भीम  झाला आणि सीतेचा राम झाला 
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली  
तो राधेचा श्याम झाला 


                                हे आहे स्त्रीचे महत्त्व आणि संस्कार.  प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा मोठा वाटा आहे हे सर्व म्हणतात . जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, एक जागरूकता आणणे हेच आहे. आता काही लोकांना वाटते की माणसांच्या समोर स्त्रीने जायला नको, पुरुषयांप्रमाणे सर्वच क्षेत्रात काम करण्याची गरज काय आहे या शंका सुद्धा अजूनही समाजात जीवंत आहेत. 

                             स्त्रीचे कार्य क्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, आताच स्त्री समोर गेली नाही तर हे आधीच्या पिढी न पिढी  स्त्री प्रगती करते आहे आणि सुरुवात करते म्हटल तर या स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ,  समाजात समाजकार्य करण्याऱ्या अहिल्याबाई होळकर,  शिक्षणाची दार उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले , भारताच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील,  वर्तमानात  राष्ट्रपतीचा कारभार पाहणाऱ्या  म्हणजे द्रौपदी मुर्मू आहे. पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि अनाथांची माय  सिंधुताई सपकाळ होत्या. 

                             अनेक महिलांनी  यशस्वी कामगिरी करून जगात ओळख निर्माण केलीच पण येणाऱ्या पिढीला नवीन ऊर्जा, प्रोत्साहन देण्यात तितकाच वाटा आहे.  हीच आहे नारी शक्ती. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आपली  ओळख निर्माण करत आहे. म्हणून मी म्हणते नारी हीच शोभा आहे घरची. 



एक यावा असा दिन ना राहो महिला 'दीन' रोज असावा महिला  दिन 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 





No comments:

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...