प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार आहेत आणि प्रत्येकाकडे विचाराची जागा आहे म्हणजेच एक विशिष्ट वेळेला मन विचारात जातं. तशी एक जागा म्हणजे प्रवास. प्रवास करताना विविध गोष्टी आपल्याला दिसतात.
एक माझा अनुभव सांगू इच्छिते.
काल ऑफिस वरून परतीच्या प्रवासात वेगळाच आनंद होता. ढगाळ वातावरण, लखलखीत प्रकाश करण्याऱ्या वीजा, रिमझिम पाऊस आणि प्रसन्न वातावरणात भर घालणारा मातीचा सुगंध. दिवसभराचा ताणतणाव, थकवा अगदी क्षणात दूर होऊन मन सुद्धा प्रसन्न झालं.
तारे आपल्याला आकाशात दिसतात, काळोख आकाशात स्वयंप्रकाशित अश्या चांदण्या आपल्याला जमिनीवर सुद्धा पाहायला मिळतात ते म्हणजे लाइट्स. खिडकीवाटे उंचीवरून पाहल्यास जमिनीवर चकाकी पाहायला मिळते ते एक तर स्ट्रीट लाइट्स असतात किंवा गाडीचे लाइट्स इ. परंतु असा नजारा दृष्टीस आल्यास मन तृप्त होते.
आणि यात G20 SUMMIT ची तयारी, अगदी सर्व भिंती, उड्डाणपूल अगदी रंगबिरंगी चित्रांनी सजलेले, वेगळ्या वेगळ्या विषयावरचं आकर्षक रांगोटी काम, मध्यक-ला विविध प्रकारचे वनस्पती लावलेले, नवीन रोषणाई, डिजिटल जाहिराती, आपली संस्कृती दाखवणारे पुतळे.
मन बेभान करणारी भजन, गाणी ऐकत जीवनाचे विचार करीत करीत प्रवास कधी संपला ते पण कळलं नाही.
#Live in the moment
15/03/2023
No comments:
Post a Comment