वेदना या कोणत्याही प्रकारात मोडल्या जाऊ शकतात. शरीराला झालेल्या दुखापतीमुळे होणारी वेदना, मनाच्या विरुद्ध गोष्टीमुळे मनाला होणारी वेदना आणि आपल एक काम पूर्ण होत असलेल्यांची एक उल्हासदायी वेदना, आता हे वेदना उल्हासदायी खरच असू शकते का ?
उल्हास म्हणजे आनंद आणि उल्हासदायी वेदना म्हणजे वेदना होऊन सुद्धा मिळणारा आनंद. एखादी गोष्ट पूर्ण करण्याकरिता मेंदूचा किंवा शरीराचा वापर होतो. एखादी गोष्ट मनात ठरवून ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती सोडायची नाही अश्याप्रकरच्या खूप गोष्टी असतात, त्यापैकी एक माझी आवड म्हणजे चित्रकला.
हातात घेतलेली चित्रकला पूर्ण होत पर्यंत माझ मन शांत नसते. हातात पेन्सिल घेण्यापासून ते शेवटचं रंगकाम करून पाण्यात ठेवलेला ब्रश, इतक्या काळात वेळेचं भान नसते, भूक लागली हे सुद्धा कळत नाही, बाकी काम राहील बाजूला पण चित्र पूर्ण होत पर्यंत मी त्या चित्रात गुंतले असते.
एक चित्र काढायला, रंगवायला साधारण ३ ते ४ तास लागतातच. हा वेळ कसा निघून जातो कळत सुद्धा नाही आणि त्यात सतत बसून काम करणे, त्यामुळे पाठ दुखू लागते, बारीक काम असेल तर हात सुद्धा दुखून येतो. एकदाच चित्र पूर्ण झालं की शरीराला आराम दिल्यावर मिळणार समाधान खूप वेगळ असते.
शरीरात वेदना झाल्या असतील तरीही त्यापेक्षा चित्र पूर्ण झाल्याचा आनंद जास्त असतो त्यामुळेच याला उल्हासदायी वेदना म्हणतात. एखादी गोष्टीची मनापासून आवड असल्यास ती पूर्ण होत पर्यंत सतत प्रयत्न केल्यास मिळणाऱ्या फळाची चव गोडच लागते. ती कला असो वा गिर्यारोहण असो किंवा आपले छंद.......
No comments:
Post a Comment