माझ्यासोबतच अस का होते ? मला का अपयश मिळते ? कधी मी यशाची पायरी गाठेल ? काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?
असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुख, दुःख, ताण-तणाव, रडण, सकारात्मकता, नकारात्मकता ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणे, काम करणे, जेवण करणे, परत झोपणे.......नाही, फक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचार, आपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूक, कठीण प्रसंगी सावरायची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम.
बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयम. आपण ऐकलं आहे, संयम ही यशाची किल्ली आहे, आणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असते, त्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असते, हे महत्त्वाचे ठरते.
एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे.
खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........
स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.
संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....