Wednesday, March 02, 2022

कोरोना विरुद्ध लढाई

  व्हायरस भारतात आला. सर्व शाळा महाविद्यालय १५ दिवस बंद ठेवण्याची सूचना मिळाली. सर्वानी आपल्या  आपल्या घराकडे वाट धरली. झटपटीने हा कोरोना व्हायरस पूर्ण जगात पसरला आणि एक संघर्ष सुरु झाला. या व्हायरस ची साखळी तुटावी यासाठी लॉकडाऊन सुद्धा करण्यात आले. या लॉकडाऊन मध्ये गरीबाची रोजची कमाई  गेली. खायला अन्न नाहीखिश्यात पैसे नाहीजीवन जगण्याला संघर्ष सुरु झालाभीतीच वातावरण तयार झालं. घरावर छत असणारे आनंदात एकत्र राहत पण ज्यांच्याकडे राहायला घर नाहीनोकरी गेल्यामुळे हातात पैसे नाहीधंदा बुडल्यामुळे हातात पैसे नाही अश्या लोकांचं जीवन जगण कठीण झालं. 

भारत हा लोकसंख्येमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारताची लोकसंख्या अंदाजे १३९ कोटी आहे.  झपाट्याने कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या वाढू लागली. तज्ञडॉक्टर्सनर्सेसपोलीससफाई कर्मचारी हे सर्व जनतेच्या संरक्षणासाठी लढत आहेतपण काही वाईट प्रवृत्तीचे लोक या संकटाचा दुरुपयोग करताना सुद्धा सापडलेअनेक घटना या प्रसार माध्यमाद्वारे बघायला मिळते आहेत. २०२० मध्ये सर्वात जास्त सप्टेंबर मध्ये रुग्ण आढळून आले त्यांनतर याची आकडेवारी कमी होऊ लागलीआणि लोकांची काळजी संपलीकमी आहे रुग्ण सर्व ठीक होईल असा समज सर्वांचा झाला. परंतु फेब्रुवारी २०२१ पासून आणखी रुग्ण वाढायला सुरुवात झालीअनेक प्रश्न उद्भवू लागलेलस घेतली तरी या व्हायरस ला लोक बळी पडले.

आजच्या काळात सर्वात जास्त कठीण परिस्थिती आहेना हॉस्पिटल मध्ये बेड मिळेना,ना औषध मिळेनाना राम्डेसिवीर इंजेकशन मिळेना......रुग्णाच्या नातेवाईकाची धडपड ना पोटात अन्नना हातात जीव वाचवायला साधन.... १ वर्ष उलटून गेल. हे वर्ष आर्थिकमानसिकशारीरिक दृष्टीने घातकच ठरले. इतकं जगात सुरु असताना आज पण लोकांना वाटे मला काही होणार नाही....मास्क न वापरणेसानिटीझर न वापरणेतब्येतीकडे दुर्लक्ष करणे अश्या काही कारणाने आपणच त्या रोगाला निमंत्रण देत अहो हे लक्षात घ्यायला पाहिजे.आज या सेवेत ज्या व्यक्तींचा जीव गेला त्यांना श्रद्धांजलीआणि आजपण जे हिम्मतीने कार्यरत आहेत त्यांचं कौतुक आहे.

ताज्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे  लगेच आपल्याला कळून जाते. आपण या वर्षात काय काय शिकलो या प्रश्नच सर्व वेगळे वेगळे उत्तर देतील पण त्यातील काही सामान्य उत्तरे असतील. स्वतःची काळजी स्वतः घ्यावीशरीर सुदृढ हवं. प्रतिकारशक्ती मजबूत हवीव्यायाम आणि आहार हा शरीराची गरज आहेपरिस्थिती इतकी बेताची आहे की जवळपास प्रत्येक व्यक्तींनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला या महामारी मध्ये हरवलं असेल. त्यामुळे स्वतःसाठीघरच्यांसाठीलोकांसाठी मास्क वापरावे. सर्वाशी प्रेमाने वागा बोला. द्वेषमत्सरराग सर्व सोडून प्रेमानी आपल्या घराला सजवा..उद्या आपल्यासोबत कोण असेल कोण नाही हे आपल्याला नाही माहित.

 

कोरोना व्हायरस हे फक्त निमित्य आहेपण आजच्या काळात गुन्हेमारामारीबलात्कारद्वेषमत्सररागवादछळ असे अनेक निसर्गाविरोधात केलेल्या कृत्याची भरपाई आहे. "आता तरी सुधरा" हेच निसर्ग लोकांपर्यंत संदेश पोहचवत आहे. निसर्ग म्हणजेच देव देवाच्या विरोधात होणार कार्य विनाशाकडे जाणारच....

सुरक्षित राहा.....स्वतःला जपा....शरीर सुदृढ नसेल तर संपत्तीगाडीबंगला याला अर्थ नाही.....


भारत भूमी

 झेंडा आमुचा या भारत भूमीचा

शान बाण आणि मान आमुचा

फडकत राहील वरी महान

गर्व आम्हास त्या तिरंगाचा

झुकून करतो आम्ही प्रणाम याला

करतो आम्ही प्रणाम...

लढले  गांधीटिळकनेहरू,

लढले आमचे वीर जवान

सोबत आधार  देत लढली आपली जनता

या भारत मायेला अर्पण केले त्यानी आपले प्राण

करतो आम्ही प्रणाम यांना करतो आम्ही प्रणाम .....

फुलपाखरू आधारित मानवी जीवन

 अळीच्या जन्मात नकोशी होते मी

फुलपाखराच्या रूपात सजून होते मी 

फुलांचं आणि माझं नातं हे वेगळं 

रंगबिरंगी छटा माझ्या पंखावर उठलं 

हातात ना येई मी हवा मला सुगंधी द्रव्य

सर्व चाहते माझ्यावर करतात काव्य

संदेश देऊ इच्छिते सर्वाना सौंदर्यावर जाऊ नका  

बाह्यरंग सुंदर असेल तरी माझ्या शरीराला आहे खूप नाजूकपणा..

ताकत बघा मनातली माझी हाती कधी येणार नाही 

एवढ्या मोठ्या जगात मला माझा जीव गमवायचा नाही 

का तर........?

मला लढायचं आहे सामोरे जायचं आहे 

सर्वाना घेऊन मला चालायचं आहे





फुलपाखराचा जन्म छोट्या अंड्यापासून होतो. त्यातून जीव बाहेर येऊन अळी बनून आपली कात सोडते आणि त्याच रूपांतर एका कोशात होते आणि त्यातच एक मनमोहून टाकणार फुलपाखरू जन्माला येत. साधं छोटासा फुलपाखरू एक निसर्गाचं देणंत्यातून पण शिकवण मिळतेछोटा असो कि मोठं प्रत्येक जीवांमध्ये एक शिकवण लपली असते फक्त ती शोधून काढणे गरजेचं असते.

आज ते पाखरू आहे  सर्व मानवाला मोहून टाकते आकर्षित करते पण त्या आधीच त्या जीवाचं रूप कोणालाही मोहक वाटत नाही. अळी ही सर्वाना नकोशी वाटते मात्र जेव्हा तीच रूपांतर फुलपाखराच्या होते तेव्हा मात्र सर्वाना ते हवं असते,  माझ्या हातावर बसावंमी त्याला पकडावं असं प्रत्येकाला वाटते. याचप्रकारे हे फुलपाखरू मानवाला एक शिकवण देऊन जाते. बाह्यरंगपेक्षा अंतरंग महत्त्वाचे हे सर्वाना माहित असेलही तरीही चेहऱ्याच्या सौंदर्याला जग मान्यता देते. आर्थिक चैनीच्या वस्तूसौंदर्यश्रीमंतीआनंद या सर्वच एक आकर्षण वाटेसर्वाना सुख हवं असते पण दुःख नको असतेसुखात सर्वेच असतात पण दुखात कोण असते हे महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपले कोण हे माहिती पडते. 

हसत खेळत  फुलपाखराप्रमाणे बागडाजीव कोणत्यापण परिस्थितीमध्ये असेल तरी त्याचा स्वीकार करा. अळीला वाटले असेल आपलं आयुष्य संपलं परंतु तिचा एक नवा जन्म एक नवं रूप जगात येणार आहे हे माहिती नसते पण तो निसर्गाचा नियम आणि धन्य त्या देवाची किमया ज्यांनी या सृष्टीला घडवलं एक आकर्षितमनमोहकविविध जीवांची निर्मिती केली आणि त्या प्रत्येक जिवाकडून शिकवण घेता येईल.


Tuesday, March 01, 2022

एक बोलका निसर्ग

  

एक बोलका निसर्ग

मानव आणि निसर्गाचं नातं नेमकं काय असावंयाचा विचार करताना झाडांशी निजलो आपणझाडांत पुन्हा उगवाया’ या कवी ग्रेस यांच्या ओळी स्मरल्यावाचून राहत नाहीत. मानवाचं अस्तित्व खऱ्या अर्थानं निसर्गाचं देणं आहे. आपण व्यक्त होतोचालतो-बोलतोहसतो-रडतो. निसर्गही हे सगळं करतच असतो. फक्त त्याचं मन वाचता यायला हवं. निसर्गपुत्र असण्यातला अभिमान बाळगलातर हे मैत्र आणखी दृढ होईल.

 

आता बोलका निसर्ग म्हणजे म्हणजे नेमक काय  ते एक एक उदाहरणात बघू,

 

 

  • नैराश्य विसरून आजचा सूर्योदय बघायला मिळत असेल तर यातच स्वतःला नशीबवान समजा. आजचा एक नवीन दिवस  जीवन जगण्याची एक नवीन संधी देत आहेत्या संधीचे सोने करायची हीच वेळ आहे. दररोज सूर्योदय होतो आणि वातावरण प्रसन्न करून देतोदररोज प्रकाशाचे किरण पसरवत असला तरी तेज कमी होत नाही.





  • रोपटं लहान असते तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते.त्या रोपट्याला पाणी द्या खत द्या माती टाका,तेव्हाच ते रोपटं परिपूर्ण उगवते आणि रोपट्याचा अवयवयाची वाढ होते. मूळपानफुलफळ इत्यादींची भरभराट होते. सर्वाना मोहून टाकणारा अवयव म्हणजे फुलत्या फुलाची निर्मिती व्हायला विशिष्ट काळ लागतो.तसेच जीवन जगताना आपल्या जीवनाची मूळ मजबूत असावी लागताततेव्हाच या जगात आपले विचार पोहचवू  शकणार.




  • निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मन वेधून घेणारी असते. सकाळी निळा रंग खुलून उठणारंसायंकाळी पिवळाकेशरी,लाल या रंगांची छटा दाखवणारंआणि रात्री काळोखामध्ये तेजस्वी आणि शांत चंद्र आणि चांदण्याचा प्रकाश देणारं असं आकाश  प्रत्येक दिवसाला वेगळ्या वेगळ्या रंग छटा आपल्या वातावरणात पसरवून मन मोहून टाकते. एका रचनेत कापसारखे दिसणारे ढग बघताच मन खुलून उठेल ही अशी निसर्गाची किमया.






  • एखाद्या ध्येयापर्यंत पोहचताना सर्व दार बंद होत असताना दिसले की नक्कीच त्या कठीण परिस्थिती नंतर प्रकाशाचा तेज येईलवेळ लागेल पण नक्कीच तो तेज प्रकाश जीवन बदलवेल. हीच शिकवण सूर्य देतो. नियमितपणे सकाळी सूर्योदय होऊन आपले किरण पृथ्वीवर प्रकाशित करून संपूर्ण पृथ्वीला जीवनदान देतो पण सायंकाळ झाली की सूर्यास्त होतो. अतिशय आकर्षित रंग आकाशात विलीन करून मावळतोते बघून मनाला ताजेतवाने करून टाकते.





गृहिणी

                         तू नोकरी करत नाही का किती छान आहे धावपळ करायची गरज नाही तुला सर्व आनंदात चाललं असेल ना खूप रिकामा वेळ मिळत असेल कामाचा ताणतणाव नसेल एकदम आरामच काम आहे ,बाहेरच्या कामाचा त्रास नाही  या अश्या प्रश्नांना शब्दांना नक्कीच एक गृहिणी सामोरी गेली असणार. पण हे असे त्या एका स्त्रीला बोलणे विचारणे बरोबर आहे का ?

                     स्त्री शक्ती ही आजच्या युगात खूप उंच भरारी घेत आहे. प्रत्येक क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण करत जगत आहे. त्या प्रत्येक स्त्रीला मनापासून वंदन करते. स्त्रीचा प्रवास आईपत्नीसूनगृहिणीबहीणमुलगी अश्या वेगवेगळ्या रूपातून होत असतो. स्त्री एकच जरी असली तरी तिची भूमिका प्रत्येक वेळेला भिन्न असते. प्रत्येक नात्याला विशिष्ट असा आदर आहे. पण खरंच एक गृहिणी म्हणून असणाऱ्या स्त्रीला समाज कोणत्या नजरेनी बघतो. चूल आणि मूल हेच घरातील स्त्रीने सांभाळायचं आणि पुरुष हे बाहेरील काम बघतील अशी रीत होती. त्या स्त्रीला त्या बंधनात ठेवलेलं असायचं. पण जसा काळ बदलत गेला तसा लोकांची मानसिकता बदलत गेली. आज ज्या गृहिणीमुळे घर हे घर बनते तिलाच कमीपणा दाखवला जातो. नोकरी करत नाही पैसे कमवत नाही म्हणून तिला कमी लेखतात. आई काय काम करते असे विचारल्यावर काहीच करत नाही असे पण उत्तर दिले जातातही अशी वागणूक खरचं बरोबर आहे का मग आता गृहिणी म्हणजे नक्की काय ?

                    सकाळपासून ते रात्रीपर्यंत घरात राबणारी ती स्त्री म्हणजे गृहिणीवेळेवर जेवण बनवून देणारी ती गृहिणीघरातल्या प्रत्येक व्यक्तीला काय हवं काय नको सर्व बघणारी गृहिणी,आपल्या कामापेक्षा घरातल्या व्यक्तीच्या कामाबद्दल काळजी करणारी गृहिणीघराला एकत्र ठेवण्यासाठी सतत राबणारी गृहिणीतब्येत ठीक नसेल वाटत तरी घरच्यांना सतत मदत करणारी गृहिणीकधीही अपेक्षा न ठेवून निस्वार्थपणे काम करणारी गृहिणी. आज या विचाराचा ऱ्हास होत चालला आहे.  गृहिणी म्हणजे एक देवीच रूप असतेघराला घरपण देणारी तीच गृहिणी असते. त्या लक्ष्मी मुळेच घराला शोभा येते. गृहिणी असणं म्हणजे एक प्रकारचं कामच आहेजे आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला जमेलच असं नाही.

                      स्त्री शक्ती मध्ये खूप ताकत आहे. या जगात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने मनापासून तिचा आदर करायला हवा.तिला त्रास होणार नाही याची जबादारी ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीने घ्यायला हवी. त्याच आधाराने एक तीच मन खुलेल आणि तिला पण आपण गृहिणी असल्याचा अभिमान असेल.



नारिशक्ती



 

 

 


आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...