Wednesday, March 02, 2022

ती

 कालपासून जरा अस्वस्थच वाटत होत. त्यामुळे वाटलं हे सुद्धा मी माझ्या शब्दात मांडले पाहिजे. तस तर या घटना सतत घडत आहे. मनाला चटका लावणारीमाणुसकीच्या नावाला काळ फासणारीकंठ दाटून टाकणारीआणि एक मुलगी म्हणून मनात धसकी भरणारीती म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार त्यालाच समाजात बलात्कार असे म्हणतात. खूप संवेदनशील गोष्ट आहे. बँगलोर मधली घटना मी ऐकलीआणि हे ऐकून मन खूप अस्वस्थ झालं. डोळ्यासमोर येतो तो त्या व्यक्तींनी किती सहन केले असेलकिती आक्रोश केला असेलत्या मायबापाला किती दुःख वाट्याला आलं असेल..........आणि हे सर्व थांबायला हवं आहे......

 

आपल्या देशात घडणाऱ्या या देशाला काळिमा फासणाऱ्या घटना रोज घडत आहे. काही या समोर येतात तर काही भीती पोटी लपवून ठेवतात. भारत कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञानअंतराळसाक्षरता अनेक सुविधांमध्ये प्राविण्य मिळवत प्रगती करत असला तरी जोपर्यंत या अश्या दुर्देवी घटना आपण थांबवू शकत नसेल तर त्या प्रगती ला काही अर्थ नाहीआज जर देशाच्या मुलीला या अत्याचारापासून वाचवायला देश असमर्थ असेल तर हे देशाचं दुर्दैव्य आहे. आज एक मी पण मुलगी आहेआज या घटना ऐकून भीती पण वाटे आणि देशाच्या प्रणालीवर विश्वास बसत नाही. नेहमी ऐकण्यात येणाऱ्या गुन्ह्यापैकीं हा एक अत्याचार आहे. एखादी बातमी आली कि खूप मनावर प्रभाव पडतो. आपण सुरक्षित राहायला हवं. दिवस गेले कि आपण सामान्य बनतो आधीसारखेचआपल्याच जगात रमून जातोपण हे आपलं वागणं चुकीचं आहे.

 

समाजात याबाबदल बोलायला गेलं कि काही लोक स्त्रीला दोषी ठरवतात किंवा काही त्या नालायक लोकांना...सर्वांची वेगळे वेगळी बाजू असू शकते...पण सर्व प्रकरणात एकच पकडून आपण चालू नाही शकत.. चुकी हि कोणाचीही असू शकतेतपास केल्यावर गुन्हेगाराला पकडल्याच जाते. ज्यांच्या हातात उच्च शक्ती आहेते करतील काय करायचं ते पण गरज हि आहे स्व:रक्षणाची. शेवटी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी स्वतःला ताकतीने मोठे करायचे आहे.

 

आजच्या काळात योग्य संगोपनाची गरज आहे. शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीला साक्षर बनवते पण पुस्तके सोडून इतर गोष्टीविषयी ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळात स्वरक्षण म्हटलं की महिलांसाठी स्वरक्षणचे धडे शिकवले जातात परंतु त्याच्याआधीपण काही साध्या साध्या गोष्टी मदतीला ठरू शकतात. सुरवात हि आई वडिलांपासून होते. आज पालक आणि बालक यामध्ये पारदर्शकता राहिलेली नाही. आज प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पाल्याना या गोष्टीबद्दल जाणीव करून द्याची गरज आहे. मुलींना पण आपल्या पद्धतीने सुरक्षित राहायला शिकवायला हवंआणि मुलांना सुद्धा मुलींचा आदर करायला शिकवायला हवा. असं संभाषण फार कमीच होत असेल. आज प्रत्येक घरात राजमाता  जिजाऊ असत्या तर शिवबा जन्माला आला असता आणि राणी लक्ष्मीबाई ची शूरता प्रत्येक मुलीत असती तर क्रूर लोकांना धडा शिकवलं असता पण आजचा काळ खूप भयंकर आहे त्यामुळे तुम्हीच ती व्यक्ती आहे जी स्वतः माणुसकी दाखवू शकेल आणि सामर्थ्य एकत्र करून शक्तीचा उपयोग कराल.

 

आपण कुठेही वावरत असताना आपल्या आजूबाजूला लोक असतातत्यामुळे लोक ओळखायला शिकणे हि स्वरक्षणाची पहिली पायरी आहे. त्यांनतर एक मर्दपणा असायला हवाजर काही वाईट घडत असेल तर त्याला विरोध करायची शक्ती असली पाहिजे. आज मार्केटला अनेक स्वरक्षणासाठी उपकरण किंवा साधन उपलब्ध आहेतती विकत घ्या आणि बाहेर जाताना नेहमी तुमच्याजवळ ठेवाकाही चुकीचं वाटलं की लगेच हिमतीने सामना करायला शिका. आज आपल्याला कोणी वाईट नजरेने बघायला नको त्यामुळे आपल्या परीने वागणूक ठेवायला हवी.


मैत्री

         मैत्रीचा उल्लेख हा अनेक शब्दात वाक्यात करू शकतो. पण माझ्या मते मैत्री हि दुधासारखी असावीदुधात पाणी टाकलं कि पाणी दुधाचं रूपे घेते पण दुधाला उष्णता दिली कि पाणी वाफेच्या रूपात दुधापासून वेगळं होते. म्हणजेच कितीपण कठोर क्षण आला तरी ती मैत्री कायम ठेवणारंतितक्याच विश्वासाने मन जिंकून घेणारं नातं म्हणजे मैत्री.

                    रंगात रंग मिसळवला कि नवीन रंग तयार होतो पण तो रंग आकर्षित असेलच असं नसतेतो नवीन तयार झालेला रंग हा त्या दोन रंगावर अवलंबून असतो. तसेच मैत्रीच्या नात्यात त्या दोन व्यक्तीवर अवलंबून असते की हे मैत्रीचं नातं  किती काळ टिकणारविश्वास त्या मैत्रीचा मूलभूत पाय असतो.

                 जीवनात बरेच मित्र मैत्रीण भेटतात पण त्यातले काहीच शेवटपर्यंत सोबतीला असतात. कठीण प्रसंगी जो मदतीला येईल त्या नात्याचा मनापासून आदर करत असतो. जीवाला जीव लावणारेखोट्या हास्याच्या मगच दुःख ओळखणारेफक्त कामापुरते नाही तर बाकी वेळ पण आपली आठवण काढणारेयोग्य दिशा दाखवणारे असे जिवलगीचे मित्रमैत्रिणी  भेटायला भाग्यच लागते.

                तुमच्याकडे ते देवांनी दिलेलं अमूल्य नातं असेल तर नक्कीच जपून ठेवा....इतक्या मोठ्या जगात इतके लोक आहे पण आपली भेट त्याच व्यक्तीशी होणे आणि ते फार काळपर्यंत टिकणे हा एक देवाचाच आशीर्वाद आहे. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवूनच जातेती चांगलीही असू शकते किंवा वाईट पण.....एक जीवन जगायचं मूलमंत्र नक्कीच शिकवून देईल..... 

पालक आणि बालक

                        आईवडील म्हणून जगताना आधी एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जगावं लागतपण का असं तर मित्र आणि मैत्रीण म्हटलं कि आपल्याच वयाचे असतातत्याच डोकं सारखंच चालत आणि विचार सारखेच चालतात. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे येऊन सांगत असेल तर फारच उत्तम आहे. पाल्याला एक वळण लावण्यास मदत होईल. चांगली कामगिरी असेल त शाबासकी देता येईल किंवा चुकीचं घडल्या वळण लावता यतेची. पण तेच लेकरू घाबरत असेल तर ते काय सांगणारघरातच वादभांडणताणतणाव तर कोणत्या प्रकारे मनोवृद्धी होईलकिंवा काय शिकेल अजून घाबरेल तेमी नाही सांगत भीती वाटे मला असं मन होऊन जाईल आणि ते आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघायचा प्रयत्न पण करणार नाही.

                    शिक्षण महत्त्वाचं आहेचत्यात एका दबावाखाली येऊन अभ्यास करीत भरपूर मार्क्स मिळवणारपरंतु फक्त अभ्यासच करणे हा त्यावरचा पर्याय नाही आहे. अभ्यास सोडून पण इतर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. त्यामुळे मार्क्स वरून त्या विद्यार्थ्यांची किंमत लक्षात घेणे हे चुकीचं आहे. सर्वांच्या वेगळ्या उच्चआवडीनिवडी असतात. मार्क्स भरपूर आले कीअपेक्षा पण वाढते आपलं नाव मोठं करेल म्हणूनकरेल नक्कीच पण त्या अडखडलेल्या मनाचं काय जर कधी अपयश मिळालं तर .... चुकीचा विचार केला तर......

             साधं उत्तर आहेआपल्या पाल्याला एक मित्र आणि मैत्रीण म्हणून जवळ घ्याएक जीवन कस जगायचंजगातील बाहेरचे लोक वाईट दृष्टिकोनाचे असू शकतात.या काही गोष्टींबाबदल सांगा. आणि एक खरं जीवन जगणारा व्यक्ती बनवाहेच खूप मोलाचं आहे. लहानपणी तुम्ही हि शिकवण दिली तर तुमच्या म्हातारपणात तुम्हाला एकटं नाही सोडणार. फक्त गरज पुरविणे इतकच नसते हे प्रेमशिक्षण घेतलं मोठ्या नोकरीवर असून आईवडिलांसाठी  वेळ नसणाऱ्या लोंकाना किंमत नसते. 

             जग खूप मोठं आहे जगायचं असेल तर वाघासारखा जगायला शिकवा आणि मरण हे किड्यामुंगीसारखे नको आहे. रस्त्यावर जाताना पण पाटी असते  त्यावर लिहलं असते,'नजर हाती दुर्घटना घटी'. संगोपन हा प्रत्येकाच्या जीवनाचा खूप मोठा भाग आहे. म्हणतात ना 'जे पेराल तेच उगवेलम्हणजेच तुम्ही जशी शिकवण द्याल वळण द्याल तशीच वागणूक ही तुमच्या पाल्यामध्ये असेल.

 विचार करा आणि पटलं तर नक्कीच जीवनात या विचाराचे पालन करा.......

३३ कोटी देवतांची संकल्पना

 देव हा एकच आहे. देवांनी भिन्न रूप धारण करून एक वेगळं जग निर्माण केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत ब्रह्मविष्णूशिवशक्ती आणि गणपती या देवांना पंचदेवता मानले जातात. ब्रह्मदेवांनी संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि श्रीविष्णू हे सृष्टीचे पालनहार आहेत असे मानले जाते. महादेव शिवशंकर हे सृष्टिच्या लय तत्त्वाचे स्वामी मानले जातात. शक्ती हे देवीचे स्वरुप मानले गेले आहे. गणपती हे मूळ स्वरुप मानले गेले आहे.

गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते. ३३ कोटी देवता ही संकल्पना आहे. ३३ कोटी ही देवतांची संख्या नाही. संस्कृतमध्ये कोटी ' या शब्दाचा अर्थ प्रकार ' आहेम्हणून ३३ कोटी देवता नसून देवता या ३३ प्रकारच्या आहेत.

त्या ३३ देवता कोणत्या ते बघूया

सृष्टीचे व्यवस्थापन करणे हे या ३३ कोटी देवतांकडे असते असे मानले जाते. या ३३ कोटी देवतांमध्ये ८ वसू११ रुद्र१२ आदित्य१ इंद्र१ प्रजापती यांचा समावेश आहे. प्रत्येक देवतांचे कार्य हे वेगळे असल्यामुळे त्यांना कोटी असे म्हटले जाते.

  • ८ वसू   -  आपधृवसोमधरअनिलअनलप्रत्यूष आणि प्रभास                                                                               ( जलतारेचंद्रपृथ्वीवायूअग्नीसूर्यआकाश )
  • ११ रुद्र  -  मनुमन्युमहतशिवऋतुध्वजमहीनसउम्रतेरसकालवामदेवभव आणि धृत-ध्वज.                           
  • १२ आदित्य   - अंशुमानअर्यमनइंद्रत्वष्टाधानूपर्जन्यपूषनभगमित्रवरूणवैवस्वत व विष्णू      

                        सूर्याला आदित्य पण म्हटले जाते. भारतीय दिनदर्शिका सूर्य आधारित बनवलेली असते. एक वर्षात १२ महिने असतात. त्याच १२ महिन्यांना आदित्य म्हणून संबोधले जाते.                                                                                                                                                

  • १ इंद्र 
  • १ प्रजापती 

असे पूर्ण मिळून ३३ प्रकारचे देवता संपूर्ण सृष्टीला जीवनदान प्रदान करतात. ३३ देवतांचे देवता हे साक्षात देवांचे देव महादेव आहे. 

मातृत्व

                   आई म्हणजे 'आत्मा आणि ईश्वरया दोघांचा संगम आहे. जी स्त्री आपल्या अपत्याला जन्म देते तिला मातृत्व प्राप्त होते. ती स्त्री प्रेमाचा सागर बनून आपल्या बाळाला आपल्या जगात सामावून घेते. नऊ महिने वेदना सहन करून बाळाला या विश्वात आणते. आणि या जगात जगताना कसे जगायचे हे शिकवते. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन आधार देते. बाळ चुकत असेल तरी आईला रागवायचा हक्क आहे की ते लेकरू सरळ मार्गाने जाऊन यशाच्या चांगल्या मार्गानी स्वतःच्या पायावर उभं राहील.

 

               त्याच स्त्रीला मायमाउलीआईमाँ हे  वेगळे वेगळे शब्द वापरून हाक देऊन बोलवतात. म्हणतात ना प्रत्येकाची काळजी घ्यायला देवांनी आईला पाठवले. तीच सर्व सांभाळून घेतेआधार देतेकाय हवं काय नको सर्व बघतेएखादीवेळ रागावली आणि मार दिला तरी तो तिचा हक्क आहे. आई ही दिव्याची ज्योत आहे जी पूर्ण अंधकार नष्ट करून जग प्रकाशमान करते. आई आणि वडील हेच असे दोन व्यक्ती आहे जे तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी तुमची साथ देईल. आणि हेच दोघे प्रत्येक व्यक्तीचे पहिले शिक्षक आहे.

 

               सर्वाना आपल्या बासरीच्या सुरात मोहित करणाऱ्या कृष्णाला देवकी आणि वासुदेव या दोघांनी जन्म दिला पण पालनपोषण यशोदा आणि नंद महाराज यांनी केलं. जितक्या प्रेमानी देवकी आणि वासुदेव यांनी नऊ महिने कृष्णाचं कंसापासुन संरक्षण केलंतितक्याच प्रेमानी यशोदा आणि नंद महाराज यांनी स्वतःच्या अपत्यासारखंच  बाळकृष्णाचं संगोपन केलंत्यामुळे ते बाळ प्रेमानी मनानी स्वीकारलं की आपोआप मातृत्व येते. ती व्यक्ती ताईदादाबाबा,आजीआजोबामावशी कोणीपण असू शकते. ज्या व्यक्ती आपल्या प्रेमानीआनंदानी त्या बाळाचं संगोपन करत असेल ती एक आईच आहे. फक्त जन्म देणारीच आई नसते तर पालनपोषण करणारी सुद्धा व्यक्ती आई होऊ शकते. निस्वार्थ संगोपनाची भावना ठेवून आईची माया ती व्यक्ती देऊ शकते.

 

             हृदयात जपून ठेवणाऱ्यासंकटात धावून येणाऱ्याप्रेमाच्या अखंड सागरात सामावून घेणाऱ्यागुलाबाच्या फुलाच्या झाडासारखे जपणाऱ्यानिस्वार्थपणे काळजी घेणाऱ्यारागवेल तरी नाराज चेहरा न बघू शकणाऱ्या..... आणि प्रत्येक समस्येवर उपाय असणाऱ्यात्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेल्या मातृत्वाला वंदन.......

 

                        प्रत्येक मातृत्व बाळगण्याऱ्या व्यक्तीला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा............


 

 

विठुमाऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ति विठ्ठलाचीविठ्ठला मायबापा




आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...