विविध रंगांची आकर्षित रंगोळीच महत्त्व निराळ आहे. घराच्या अंगणापासून ते प्रत्येक सणाच्या वेळी अंगणाला शोभा देणारी रांगोळी, वाढदिवसापासून ते लग्नपर्यंतच्या शुभ कार्य प्रसंगी काढली जाणारी रांगोळी, मनाला मोहून टाकते.
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, December 10, 2023
माझी रांगोळी - भाग १
Sunday, October 29, 2023
आईचा खजिना
Monday, October 02, 2023
आठवण येते तुझी
Saturday, September 23, 2023
एक वेगळा उपक्रम
| गणपतीचे मनमोहक चित्र |
Tuesday, September 19, 2023
इच्छा तिथे मार्ग
काही गोष्टींचा विचार आपल्या मनात संचारत असतो आणि ती गोष्ट करायची आपली खूप मनापासून इच्छा असते परंतु काही कारणास्तव ती होणार नाही किवा वेळ नाही यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझ्यासोबत होत अस कधी कधी. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तसच काही झाल आणि देवाच्या इच्छेने माझी इच्छा पूर्ण झालीच, देवाने कार्य माझ्या हातून केले असले तरीही करविता देवच आहे.
वर्षातून एकदा देव बाप्पा म्हणजेच आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात, सर्व भक्त उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करतात. गणपती उत्सव जवळ येताच मला पण विचार आला की आपण पण देव बाप्पाच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या मूर्तीचे पूजन करावे. पण आगमनाच्या काही दिवस आधी मला मूर्ती बनवणे शक्य झाले नाही. मनात इच्छा तर होतीच पण आता वेळेवर कस काय होणार म्हणून आपण नेहमीसारखी पूजा करावी पण देवाला वाटले असेल हिला प्रोत्साहन द्याव म्हणजे बरोबर ही करेल आणि तसच झाल मला ते मिळाल आणि लगेच मूर्ती बनवायला लागली. एकीकडे बाप्पाचे भजन कानी येत होते आणि एकीकडे हाताने मूर्तीला आकार द्याला सुरुवात केली. संध्याकाळचे २ तास कसे निघून गेले कळले नाही. इतक्या कमीवेळेत मूर्ती तयार करणे सोपे नव्हते परंतु मनात इच्छा होती श्री गणेश चतुर्थी ला स्वतः ने बनवलेल्या मूर्तीची पूजा करायचीच आणि हे सर्व घडून फक्त देवाच्या आशीर्वादाने😊.
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
सर्वाना श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 😊
Thursday, July 27, 2023
पाऊसधारा
Saturday, July 08, 2023
व्यक्त व्हायला शिका
जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.
समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे.
आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.
प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.
Tuesday, June 27, 2023
Sunday, June 25, 2023
प्रतिबिंब
आरसा हा आपल स्वतःच प्रतिबिंब दाखवतो आणि सावली ही आपली साथ कधीच सोडत नाही असं खूपदा एकलेल आहे, पण जर आरसा दोषपूर्ण निघाला तर आपल्याला जे प्रतिबिंब दिसते ते प्रत्यक्ष पेक्षा वेगळं असतं, म्हणजेच आरसा पण काहीवेळेस आपली साथ सोडतो.
सावली ही कायम आपल्यासोबत असते पण जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो तेव्हा उभ्या असलेल्या वस्तूची सावली दिसत नाही याचाच अर्थ एक वेळेस सावली पण आपली साथ सोडते मग आपण माणसांकडून तरी काय अपेक्षा ठेवावी. नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे एक अशी व्यक्ति असते जी कायम खंबीर आधार देतात, प्रत्येक वेळी गरजेच्या वेळी उपलब्ध असतात आणि अश्या व्यक्तीना जपलं पाहिजे, कायम आधार दिला पाहिजे.
Sunday, June 18, 2023
पितृत्व
मानवा डोळे उघड
मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्म. देवांवर विश्वास ठेवणारे म्हणजे आस्तिक आणि विश्वास न ठेवणारे म्हणजे नास्तिक. आपण देवाला प्रत्यक्षात पाहलेले नसले तरी त्याचं रूप आपल्याला माहीत आहे, मूर्तिमार्फत किवा फोटोमार्फत आणि काहींनी अनुभव पण घेतला असेल.
सर्वांना सुखी ठेव, ज्ञान दे, बुद्धी दे अशी प्रार्थना आपण देवाला करतो आणि देव आपल सर्व ऐकतो आणि आपल्याला साह्य करतो अशी ही आपली श्रद्धा असते. देवाबद्दलची मनातील श्रद्धेची भावना निर्मळ आणि पवित्र असते. देव आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, फक्त भक्तांनी पवित्र मनाने भक्ति करावी. आजच्या काळात काही प्रमाणात रूप बदललेल दिसते, धर्माच्या नावावर लोकांकडून पैसा काढला जातो, प्रत्येक मंदिरात दानपेटी असते, भक्त इच्छेप्रमाणे दानपेटीत पैसे दान करतो पण काही ठिकाणी श्रद्धेच्या नावावर लोकांकडून पैसा मागितला जातो आणि हे मला पूर्णपणे चुकीचे वाटते, जिथे पैसा आला तो व्यवसाय झाला असे मला वाटते.
आजही काही संस्था खूप छान प्रकारे कार्य करत आहे. सर्वांना सोईस्कर दर्शन व्हावे, महाप्रसाद मिळवा यासाठी खूप छान पद्धतीने नियोजन करत आहे आणि या संस्थाकडून हीच शिकवण घेणे उपयुक्त ठरेल. स्वतः मनापासून दान करणे आणि मागितलेले पैसे देणे यात खूप फरक असतो आणि देवकार्यात चुकीच्या मार्गाने पैसे येत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
Saturday, April 15, 2023
विश्व कला दिवस
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा छंद जोपासायला आवडतो. छंद म्हणजे एक आपली काहीतरी वेगळ करण्याची आवड, आपल्या फावल्या वेळेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं त्यातून मिळणारा आनंद आहे.
विश्व कला दिवस किंवा जागतिक कला दिन हा दरवर्षी १५ एप्रिल ला साजरा केल्या जातो. महान कलाकार लिओनार्डो दा विंची यांचा हा जन्मदिवस, २०१२ साली हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. या दिवसाची विशेषता म्हणजे कलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देणे, आजच्या काळात विविध कला क्षेत्रातील उपलब्धतेचा सन्मान करणे आहे. या २०२३ वर्षाची थीम ही Art is good for health ही आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य समतोलात असणं गरजेच आहे.
सध्याच्या काळात अनेक कला क्षेत्र आहेत. संगीत, चित्राला, वाद्यकला, नृत्यकला,मूर्तीकला, फोटोग्राफी या व अश्या अनेक कलांमध्ये अनेक कलाकार आपलं नाव जगात प्रसिद्ध करत आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी कला शिकणे महत्त्वाचे ठरते.
आपण समोरच्या व्यक्तीला ती कला उत्कृष्ट रीतीने सादर करताना पाहल्यास आपल्याला मोह येतो आणि यामध्ये आपल्यासमोर अनेक कला असतात पण विचार करतो नेमका आपण वेळ कसा काढावा, जेव्हा मनातून शिकण्याची आवड असते तेव्हा काहीतरी मार्गाने वेळ निघतोच. मला माझ्या कला जोपसायला आवडतात आणि त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला अंगी जोपसायला हवी. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल पाहायला मिळतो.
Sunday, April 02, 2023
महत्त्वाकांक्षा
भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.
#BeStrong #LiveInTheMoment
Sunday, March 19, 2023
Live in the moment
Sunday, March 12, 2023
प्रेम असं ही
सकाळी असाच मनात विचार आला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हसताना बघतो तेव्हा आपल्या गालावर हसू येत, ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणा असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर असतो. हाच विचार करता करता मला माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे रतन टाटा सर. आलं ना तुम्हाला पण गालावर हसू, सरांच व्यक्तिमत्त्व च इतका रुबाबदार आहे की फक्त भारतातील नाही तर पूर्ण जगातील व्यक्ती त्यांना खूप मानतात.आपण ना त्यांना कधी भेटलो ना त्यांच्याशी संवाद केला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रेमात पडलो. हे असे सुध्दा प्रेम असते.
म्हणूनच प्रेमाला समजायला एक व्याख्या तयार होऊ शकत नाही. ते अनेक प्रकारे विविध रूपाने आपल्यापुढे येत असते. अश्या थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळून आपल आयुष्य मार्गी लागण्यास मदत मिळते.
Wednesday, March 08, 2023
आत्मनिर्भर स्त्री
Thursday, March 02, 2023
मनातलं काही
तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशाची एक अनोखी ओळख आहे, आपला देश म्हणजे भारत, पूर्ण परिसर दणाणून टाकणारं घोषवाक्य भारत माता की जय असे आपण म्हणतो. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकविले जाते की भारत हा फक्त देश नसून आपली माता सुद्धा आहे, आणि आपला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र किवा साम्राज्य.
आपला देश /राज्य घडवण्यासाठी अनेक थोरपुरुषांना वीरमरण आले, अनेक क्रांतिकारी सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनदान दिल. आपला इतिहास खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला, देशाला गुलामगिरीतून मुक्त कसे करावे याचा विचार करून अमलात पण आणला. पण दुःख या गोष्टीच वाटते आज समाजातील काही पापी लोकांना या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. या जमिनीवर अनेक सजीव आहेत पण त्यातला मानवी रूपात जन्माला येण नशीब असते. पण हे सुद्धा लोकाना कळत नाही आहे. प्रत्येकाचा जन्म हा एक स्त्रीच्या उदरातून होतो आणि त्याच स्त्रीला वाईट बोलणे, वाईट नजर टाकणे हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडते आहे, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत घडते आहे, नेहमी स्त्रीला मातेसमान मानणारे आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अस घडताना चीड येते आणि वाईट सुद्धा वाटते.
आपण आपल काम करायच, उगाच गोष्टीत आपला वेळ घालवायचा नाही अशी पण मानसिकता असणारे लोक असतात. आपल्यावर असते आपल्याला कोणत्या मार्गाने जायच. परंतु वाईट गोष्टीला विरोध करणे हे ही महत्त्वाचे, काही गोष्टी फक्त दुर्लक्षित करून जमत नाही त्यावर उपाय पण शोधणे महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टीची सवय लावायला वेळ लागतो, तसेच चांगल्या गोष्टीपेक्षा माणूस वाईट गोष्टीना लवकर आहारी जातो.
एकीकडे कष्ट करून यशस्वी होणारी व्यक्ति आणि एक वाईट गोष्टीत चर्चेत असणारी व्यक्ति, यापैकी जास्त आकर्षण वाईट गोष्टीला मिळते हे तितकच सत्य आहे. भान राखा आपण काय करतोय आणि वाईट गोष्टीला समर्थन चुकूनही करू नका.
Monday, January 02, 2023
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....


















