Wednesday, March 02, 2022

संगत

       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचापरिसराचा शारीरिकमानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना  ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता  येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. 

आदर्श व्यक्ती  कोण ?

                   आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती  तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेलआणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती  स्वतःलाच  शोधावी लागते. 

          आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही..............  मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते. 

                   जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतोतेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ?  या प्रश्नाच उत्तर मिळून जाते. 

                  आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.

रक्तदान - श्रेष्ठ दान

                           परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छितेजेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.

                सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतातत्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते. 

                   मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.

                 आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण  या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा  आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.

३ रंग आयुष्याचे

           बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागतेकारण त्या बाळाला बोलता येत नाहीसांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईलाबाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो. 

                 बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतातत्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येयआपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.

                 म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असतेवृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाहीत्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........

नैराश्य

                    प्रत्येक व्यक्तीला आपण का जगतो कशासाठी जगतो आपल्याला काय करायचे आहे आपल्या जीवनाच ध्येय काय आहे या सर्व प्रश्नाची उत्तर ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीच्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणींपुढे मात करून तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होणारच... का तर जी सर्वात मोठी ताकत आहे ती मनाची इच्छाशक्ती आहे. 

                जीवन हा जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास आहे. सुखदुःखकठीण प्रसंग अशी अनेक नागमोडी वळणे जीवनाचा मूलमंत्र देऊन जाईल. पण जेव्हा तीच इच्छाशक्ती मनातून लुप्त होते तेव्हा काय होते याबद्दल जाणून घेऊया...

             जीवनाचा तो एक भाग  ज्यामध्ये आपली इच्छाशक्ती हि दबून जातेएक न्यूनगंड( स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणे ) निर्माण होतोजीवनाचं ध्येय नसतेनवीन काही करण्याची इच्छा नसते,भूक लागत नाहीझोप येत नाहीताणतणाव असतेमानसिक त्रासापासून ग्रस्त असते त्यामुळे शारीरिक त्रास उदभवतात हि सर्व नैराश्याची लक्षण आहे.

               नैराश्याची कारण ही खूप आहेत. आपल्याला जस हवं असते तस न मिळाल्यामुळे नैराश्य येतेकोणत्याही क्षेत्रात अपयश  पदरी आल्यामुळे नैराश्य येतेएखादी गोष्ट मनाला लागली कि नैराश्य येतेआपल्यापेक्षा यशाची उंची गाठणाऱ्या लोकांना बघून नैराश्य येते.

            नैराश्य येणे साहजिकच आहे पण त्यातून बाहेर पडणे आपल्यासमोर एक आव्हान आहे. विचारांनी ग्रस्त असलेलं डोकं शांत करण्यासाठी स्वतःला व्यस्त करणे गरजेचे आहेएखादी छंद जोपासणे गरजेचं आहेआवडती गोष्ट केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईलपर्यटन स्थळाला भेट द्या त्यामुळे मनमेंदू हा दुसऱ्या वाटेने विचार करायला लागेलतुमच्या विश्वासातील व्यक्तीसोबत बोला,मनातल्या गोष्टी सांगापण विचार करूनखरंच त्या व्यक्तीला तुमची काळजी असेल तर तीच व्यक्ती सर्व ओळखून घेईलनवीन कला शिकण्याचा प्रयत्न करा आणि एक मनात ध्येय ठेवून नव्या वाटेला सुरुवात करा.... मनाची इच्छा शक्ती सर्वात मोठी शक्ती आहेध्येय साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते फक्त योग्य दिशेने चालावं लागत.....

जगाचा पोशिंदा

   प्रत्येक व्यक्ती लहानपणापासूनच मूलभूत गरजा शिकले त्या म्हणजे अन्नवस्त्रआणि निवारा. आणि बाकी जीवनाला सोईस्कर करण्यासाठी निर्मित करण्यात आलेले साधन आहेत. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काही देवासारखी माणसं आपल्या कष्टाचं सोन करतात. आणि त्याच पैकी एक जगाचा पोशिंदा - शेतकरी बद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.

             देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला कीमाझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा माणूस म्हणजे शेतकरीजो धान्यभाजीपालाकच्चा मालआपल्या जमिनीत राबराब राबूनदिवसरात्र कष्ट करून पिकवतो. त्याच शेतकऱ्याला अन्नदाता म्हणतात. जगातला एकच असा मानव आहे जो ताससुट्टी चे दिवस न बघता स्वतःसाठी नाही तर पूर्ण जगासाठी राबतो तो असतो शेतकरी.

              आज त्या शेतकऱ्यामुळे आज आपल्या घरात शिजवायला धान्य आहेखायला चविष्ट असे फळभाजीपाला आहे. कापडनिर्मिती सुद्धा त्या जमिनीमधून उगवण्याऱ्या कापसावर अवलंबून आहे. घाम गाळूनमेहनत करूनजीवाची पर्वा न करता त्या पिकाला आपल्याच जीवाचा भाग समजून उगवणाऱ्या पिकाला पैशाची किंमत जोडणे सहज होते पण विचार केला तर त्याची किंमत अमूल्य आहे.

           कधी निसर्ग खेळ करतोकधी सरकार खेळ करतेकधी महामारी खेळ करते पण त्यात भिरडण्याऱ्या त्या अन्नदाताचे काय 

           कर्ज घेऊन शेती करतात मेहनत घेऊन कष्ट करतात पण जेव्हा शेवटी हाताला काही लागत नाही किंवा कर्ज फेडू शकणार धन हाती येत नाही तेव्हा तो दाता आत्महत्येला बळी पडतो. त्या मागे त्याच कुटुंब अनाथ होतेआणि त्यामागचं दुःख हे सोसणे कठीण होऊन जाते.

            आज एक स्वतः कडून आपण जितकी मदत करू शकू तितकाच आपल्या हातात आहे. महागड्या ठिकाणी खूप वस्तू घेतो मात्र भाजीफळ घेताना भाव करतो. आज त्याच्यामुळे आपण आहो हे विसरायला नको. त्यांना त्यांचा अधिकारआदर हा मिळायला हवा.

           थोडा विचार करूयाआज जर शेतकरी संपावर गेले काय होईलशेती बंद होईलपीक उगवणार नाही ना भाजी उगवणारआणि आपल्या ताटात रोज अन्न असते ते पण मिळणार नाही.

          भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग याच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन २३ डिसेंबरला  साजरा केला जातो. वेळेआधीच काही गोष्टीचा आदर करायला शिकणे  महत्वाचे असते. त्यामुळे तो गरीब असेलही पण तो जगाचा पोशिंदा आहे आणि अन्न आपली गरज आहेहे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.

आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...