Saturday, April 15, 2023

विश्व कला दिवस

                 प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा छंद जोपासायला आवडतो. छंद म्हणजे एक आपली काहीतरी वेगळ करण्याची आवड, आपल्या फावल्या वेळेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं त्यातून मिळणारा  आनंद आहे. 

              विश्व कला दिवस किंवा जागतिक कला दिन हा दरवर्षी १५ एप्रिल ला साजरा केल्या जातो. महान कलाकार लिओनार्डो दा विंची यांचा हा जन्मदिवस, २०१२ साली हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. या दिवसाची विशेषता म्हणजे कलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देणे, आजच्या काळात विविध कला क्षेत्रातील उपलब्धतेचा सन्मान करणे आहे. या २०२३ वर्षाची थीम ही Art is good for health ही आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य समतोलात असणं गरजेच आहे. 

               सध्याच्या काळात अनेक कला क्षेत्र आहेत. संगीत, चित्राला, वाद्यकला, नृत्यकला,मूर्तीकला, फोटोग्राफी या व अश्या अनेक कलांमध्ये अनेक कलाकार आपलं नाव जगात प्रसिद्ध करत आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी कला शिकणे महत्त्वाचे ठरते. 

                 आपण समोरच्या व्यक्तीला  ती कला उत्कृष्ट रीतीने सादर करताना पाहल्यास आपल्याला मोह येतो आणि यामध्ये आपल्यासमोर अनेक कला असतात पण विचार करतो नेमका आपण वेळ कसा काढावा, जेव्हा मनातून शिकण्याची आवड असते तेव्हा काहीतरी मार्गाने वेळ निघतोच. मला माझ्या कला जोपसायला आवडतात आणि त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला अंगी जोपसायला हवी. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगला  बदल पाहायला मिळतो. 

Sunday, April 02, 2023

महत्त्वाकांक्षा

                      भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता  तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.


#BeStrong #LiveInTheMoment 

Sunday, March 19, 2023

Live in the moment

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार आहेत आणि प्रत्येकाकडे विचाराची जागा आहे म्हणजेच एक विशिष्ट वेळेला मन विचारात जातं. तशी एक जागा म्हणजे प्रवास. प्रवास करताना विविध गोष्टी आपल्याला दिसतात. 
एक माझा अनुभव सांगू इच्छिते.

काल ऑफिस वरून परतीच्या प्रवासात वेगळाच आनंद होता. ढगाळ वातावरण, लखलखीत प्रकाश करण्याऱ्या वीजा, रिमझिम पाऊस आणि प्रसन्न वातावरणात भर घालणारा मातीचा सुगंध. दिवसभराचा ताणतणाव, थकवा अगदी क्षणात दूर होऊन मन सुद्धा प्रसन्न झालं.

तारे आपल्याला आकाशात दिसतात, काळोख आकाशात स्वयंप्रकाशित अश्या चांदण्या आपल्याला जमिनीवर सुद्धा पाहायला मिळतात ते म्हणजे लाइट्स. खिडकीवाटे उंचीवरून पाहल्यास जमिनीवर चकाकी पाहायला मिळते ते एक तर स्ट्रीट लाइट्स असतात किंवा गाडीचे लाइट्स इ. परंतु असा नजारा दृष्टीस आल्यास मन तृप्त होते. 

आणि यात  G20 SUMMIT ची तयारी, अगदी सर्व भिंती, उड्डाणपूल अगदी रंगबिरंगी चित्रांनी सजलेले, वेगळ्या वेगळ्या विषयावरचं आकर्षक रांगोटी काम, मध्यक-ला विविध प्रकारचे वनस्पती लावलेले, नवीन रोषणाई, डिजिटल जाहिराती, आपली संस्कृती दाखवणारे पुतळे.

मन बेभान करणारी भजन, गाणी ऐकत जीवनाचे विचार करीत करीत प्रवास कधी संपला ते पण कळलं नाही. 


#Live in the moment


15/03/2023

Sunday, March 12, 2023

प्रेम असं ही

सकाळी असाच मनात विचार आला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हसताना बघतो तेव्हा आपल्या गालावर हसू येत, ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणा असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर असतो. हाच विचार करता करता मला माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे रतन टाटा सर. आलं ना तुम्हाला पण गालावर हसू, सरांच व्यक्तिमत्त्व च इतका रुबाबदार आहे की फक्त भारतातील नाही तर पूर्ण जगातील व्यक्ती त्यांना खूप मानतात.आपण ना त्यांना कधी भेटलो ना त्यांच्याशी संवाद केला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रेमात पडलो. हे असे सुध्दा प्रेम असते. 

म्हणूनच प्रेमाला समजायला एक व्याख्या तयार होऊ शकत नाही. ते अनेक प्रकारे विविध रूपाने आपल्यापुढे येत असते. अश्या थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळून आपल आयुष्य मार्गी लागण्यास मदत मिळते. 



Wednesday, March 08, 2023

आत्मनिर्भर स्त्री

ती आहे म्हणून 
आपण आहो 
ती आहे म्हणून 
घरपण आहे 
ती आहे म्हणून 
विश्व आहे 
ती आहे म्हणून 
नात्यांमध्ये प्रेम  आहे 


                       ८ मार्च म्हणजे  जागतिक महिला दिन, हा दिवस फक्त आपल्या महाराष्ट्रापर्यंत किंवा  देशांपर्यंतच नाही तर संपूर्ण जगाचा महिला दिन आहे. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादि मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली होती आणि हे आंदोलन म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी  केलेला  पहिला लढा होता, आणि या लढ्याची पूर्ण मेहनत आज संपूर्ण जगाला  दिसते आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, तरी सुद्धा तिला प्रत्येक संकटावर मात करावी लागते, तिला सामोरे जावे लागते, अस म्हणतात स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, नक्कीच याच कारण एकच आहे, पुढची पिढी कशी घडवायची, कसे संस्कार हवे, कश्या चालीरीती हव्या हे सर्व एक स्त्रीवर अवलंबून असते. ती आहे त्यामुळे आज मी लिहीत आहे. ती आहे म्हणून तुम्ही वाचत आहात, बघत आहात. स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी, म्हणायला बोलायला खूप छोटा शब्द आहे स्त्री, महिला, WOMEN पण याच शब्दात कितीतरी ताकद आहे, बळ आहे कारण हीच स्त्री आपल्या मुलांमुलीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आपल्या जीवाचे रान करते, याचे उदाहरण कितीतरी आपण  देऊ शकतो.


ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळली 
तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला 
ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली 
तो जिजाऊचा  शिवबा झाला 
ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळली 
तो रमाचा भीम  झाला आणि सीतेचा राम झाला 
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली  
तो राधेचा श्याम झाला 


                                हे आहे स्त्रीचे महत्त्व आणि संस्कार.  प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा मोठा वाटा आहे हे सर्व म्हणतात . जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, एक जागरूकता आणणे हेच आहे. आता काही लोकांना वाटते की माणसांच्या समोर स्त्रीने जायला नको, पुरुषयांप्रमाणे सर्वच क्षेत्रात काम करण्याची गरज काय आहे या शंका सुद्धा अजूनही समाजात जीवंत आहेत. 

                             स्त्रीचे कार्य क्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, आताच स्त्री समोर गेली नाही तर हे आधीच्या पिढी न पिढी  स्त्री प्रगती करते आहे आणि सुरुवात करते म्हटल तर या स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ,  समाजात समाजकार्य करण्याऱ्या अहिल्याबाई होळकर,  शिक्षणाची दार उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले , भारताच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील,  वर्तमानात  राष्ट्रपतीचा कारभार पाहणाऱ्या  म्हणजे द्रौपदी मुर्मू आहे. पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि अनाथांची माय  सिंधुताई सपकाळ होत्या. 

                             अनेक महिलांनी  यशस्वी कामगिरी करून जगात ओळख निर्माण केलीच पण येणाऱ्या पिढीला नवीन ऊर्जा, प्रोत्साहन देण्यात तितकाच वाटा आहे.  हीच आहे नारी शक्ती. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आपली  ओळख निर्माण करत आहे. म्हणून मी म्हणते नारी हीच शोभा आहे घरची. 



एक यावा असा दिन ना राहो महिला 'दीन' रोज असावा महिला  दिन 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 





आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨

               आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...