Wednesday, March 02, 2022

ऋणानुबंध

 घरात एक बाळ जन्माला येते तेव्हा त्या बाळासोबत अनेक नाती जन्माला येतात. नात म्हटल की मनात एक वेगळच स्मितहास्य येते. बघा ना आपल्या कुटुंबातील सदस्य त्यानंतर शेजारीमग मित्रमैत्रिणीशिक्षक असे कितीतरी नाती तयार होतात आणि प्रत्येक नात्याच एक वैशिष्ट्य असते. 

जेव्हा एक नात तयार होत ते विश्वासावर अवलंबून असते. त्या नात्यातला समजूतदारपणाखोडकरपणाचिडचिडभांडणहास्यअबोला अश्या अनेक भावना त्या नात्यावर परिणाम करतात. काही नाती रक्ताची असतात काही दूरची असली तरी इतकी जवळची होऊन जातात कळतपण नाही. आपण प्रत्येक नात्याला नाव दिले आहेआणि त्या प्रत्येक नात्याची  एक विशिष्ट ओळख असते. 

नात म्हटल की त्यात एकमेकांसोबत व्यक्त केलेल्या भावनाकाही विषयावर चर्चामदतीला असणारा हातयोग्य निर्णय सुचवणारी बुद्धी असे सर्व येते. पण त्या नात्याचा तितकाच आदर असणे पण महत्त्वाचे आहे. जेव्हा त्या दोन व्यक्तिमध्ये एकमेकाबद्दल आदर असेलप्रेम असेलविश्वास असेल तरच ते नात योग्य वाटेने जातेआणि जर ते नात कमजोर झाल तर त्यातले घटक आपोआप ऱ्हास पावतात. 

सोप्प वाटे नात टिकवण पण जेव्हा वेळ येते तेव्हा हिंमत लागते. नात तोडायला एक कारण खूप असतेपण तेच नात जुळवून ठेवण्यास सर्व बाजूने विचार करूनसमजुतीने रहावे लागते.

झाडाला जगवण्यासाठी जस पाणीऊनऑक्सिजन हे सर्व लागते तेव्हाच ते मोठ होते आणि एकदा त्याची वाढ झाली की त्याला जपण्याची गरज नसतेतसच एकदा नात्याचा विश्वाससमजूतदारपणा दृढ झाला की त्या नात्यात असणाऱ्या व्यक्तीमध्ये ते नात जपवून ठेवण्याची ओढ असते.



   

इच्छाशक्ती

 कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है। 

 

हा डायलॉग नक्कीच ऐकला असेल...............घडल आहे का अस काही तुमच्या आयुष्यात.........इतका काय दडल आहे या वाक्यात की हा डायलॉग इतका लोकप्रिय झाला ?

चला तर बघूया 

आपण म्हणतो आपल्या नशिबात जे असते तेच घडते पण काही गोष्टी आपण आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून सत्यात उतरवू शकतो. आपले विचार हे आपल जीवन घडवण्यास कारणीभूत ठरतात. एखादी व्यक्ति सतत नकारात्मक विचार करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनात पण त्याच गोष्टी घडतात पण तेच एखाद्या व्यक्तीने सकारात्मक विचार करून आपल स्वप्न पूर्ण होणारच अशी भावना मनात ठेवली की नक्कीच एक दिवस ते स्वप्न पूर्ण होईलच.................पण हे कस काय होते ?

जेव्हा व्यक्ती विचार करतो तेव्हा त्या व्यक्तीची ऊर्जा वातावरणात समावेश होते. जे व्यक्तीचे विचार असतील त्यावर सभोवतील वातावरण कार्य करते..........नकळत आपल्या हातून ते कार्य पार पडते................. ते सकारात्मक किवा नकारात्मक असू शकते.. ही सर्व व्यक्तिमधून येणाऱ्या उर्जेचा परिणाम असतो. 

इच्छाशक्ती ही  एक जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहेया शक्तीचा वापर जीवनातील मोठ्या संकटातून बाहेर पडण्यास केल्या जाऊ शकतो किवा मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

त्यामुळेच त्या एका डायलॉगने सर्वांची मने जिंकून घेतली. सर्वाना नकारात्मक विचार येतातच मात्र ती आपल्या मनात घर करून राहायला नको............ कोणताही विचार करण्याआधी नक्कीच एकदा विचार करा की आपण जसा विचार करू तस आपल्या आयुष्यात होऊ शकते त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जीवनाचा आस्वाद घ्यावा.

अर्थ गणित

                घरात येणाऱ्या संपत्तीला लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. प्रत्येक घरात लक्ष्मीचा वास असतो. लक्ष्मीला धन संपदाशांती आणि समृद्धी ची देवी समजल्या जाते. हातात  येणाऱ्या धनाचा उपयोग योग्य रीतीने करणे महत्त्वाचे असते. धन हातळण्याची कला ही धन कमवण्यापेक्षा महत्वाची ठरते. जीवन जगताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून समोर पाऊल टाकावे लागते. पण आजकाल बहुतांश घरात आर्थिक स्थिति मध्ये फार प्रमाणात बदल झालेले आहेत. आणि त्यामागची कारणं अनेक आहेत. ती एक एक बघूया..

                        आजच्या काळात घरातील प्रत्येक व्यक्तीकडे दूरध्वनी असतो....काळ बदलतोय तसा  अनावश्यक खर्च वाढतोय ..... मुलं-मुलींची शैक्षणिक खर्च वाढलालहान मुलामुलीना शिकवणीला पाठवण्याची सवय झाली आहे ... ....वाढदिवस आणि वेगळे समारंभात अनेक दिखावा खर्च..... हळदमेहंदीलग्न समारंभात अतिशय खर्च कशासाठी एक प्रतिष्ठा असावी..... लोक काय म्हणतील या विचारपाई कर्ज  घेतात आणि नंतर ते फेडण्याची वेळ येते............हॉटेल मध्ये जेवण करायला जाण्याची भर पडली......मित्र मंडळात पार्टी करण्याच एक वेगळच वेड लागल आहे. काही नवीन वस्तु घेतली तरी त्यासाठी पार्टी मागितली जाते....खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे वैद्यकीय खर्चात वाढ...... असे अनेक अनावश्यक खर्च टाळणे आजची गरज आहे. आपली गरज ही अन्नवस्त्र आणि निवारा आहे. लोकांसाठी आपला अनावश्यक खर्च करण्याची गरज नाही आहे.

                जुन्या काळात घरात एकच दूरध्वनी असायचाआणि आता घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा दूरध्वनी असतोच. त्यामुळे खर्चात  वाढ झाली आहे. आधी टी.व्ही. वर  मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या सर्व मिळून बघायचेवाहिनी संपली की लोक झोपायचे किवा गप्पा करत बसायचे. पूर्वी शालेय विद्यार्थी शाळा करूनमैदानावर खेडून लवकर झोपी जायचे पण आता शिक्षणाचा ताण वाढला आणि कोविड च्या काळात अभ्यासाची एक आवड कमी झाली..आणि मोबाइलच वेड लागल.....पूर्वी आजी-आजोबाना  चष्मे लागायचे आता लहान मुला-मुलीना चष्मे लागतात....विशेष पदार्थ सणाच्या दिवशीच केले जायचे पण आता खाण्यापिण्यात खूप बदल झाले आहे त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे...

 

           आजच्या काळात  माणूस स्वतःला काळाच्या प्रवाहात वाहू देत आहे. पण त्याच प्रवाहात आपण होडी वापरुन आपण आपल्या मार्गाने प्रवाहात गेलो तर ते उत्तम असेल. 

जीवनात आपण ठरवलेल्या प्रवाहात आनंद घेत जगायच....

पूर्वी जवळ काही नसताना आनंदात जगता येत होत. पण आता मार्गदर्शन घेतात की स्वतःला आनंदी कसे ठेवायचे..  या दोन ओळीच सर्व काही सांगून जातात..

म्हणून खरा आनंद आणि पैश्यांचा संबंध नसतो. आणि खरा आनंद विकत घेता येत नाही.. त्यासाठी मनाची श्रीमंती असणे गरजेच असते....

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...