Friday, February 25, 2022

घर

  आज लोक म्हणतात माझं मोठं घर आहे,त्यासमोर बगीचा आहे,मोठी जागा आहे,पण त्यात राहणारे किती लोक आहेत याबद्दल कोणी बोलत नाही. चार भिंती आणि त्यावर असणारा छत म्हणजे एक वास्तू  झाली.पण तिथे राहण्यारा लोकांमुळे त्या घराला घरपण येते हे सर्वीकडे आपण ऐकतो. खूप पैसे लावून घराला बांधतात एकदम  नटून थाटून तयार करतात. नवीन महागडी वस्तू घेतात घर सजवायला पण खरंच हे सर्व महत्त्वाचं आहे का ?

चला तर बघूघर म्हणजे नेमकं काय?
                      घर हा शब्द दोन अक्षरी असला तरी खूप काही लपलेलं आहे या शब्दात. नक्कीच घर हे असं ठिकाण जे आपलं असतेजिथे आपण वास्तव्य करतो. विटा सिमेंट चा वापर करून एक इमारत बनवली जाऊ शकते एक वास्तू बनवली जाऊ शकते पण घराला घरपण हे तिथे राहण्याऱ्या लोकांमुळे येते. त्यासाठी मूळ मजबूत असावी लागतात. त्यात मूळ म्हणजे घरात राहण्याऱ्या लोकावरचा विश्वासविश्वास हि एक गोष्ट अशी आहे जी कोणत्याही नात्याला टिकवून ठेवतेत्यात दोन्ही व्यक्तीच्या भावना खूप महत्वाच्या ठरतात. समाधानशांतीसमजूतदारपणाप्रेमआपुलकी हेच मूळ तत्त्व आहे. घर याच गोष्टीवर खंबीर असते.
                     आज काहींकडे पैसे खूप असतो पण घरात समाधान नसतेसतत वाद झगडे होत असतातयाला काही अर्थ नाही ,नात्यात वाद होत असले कि आणखी ते घट्ट होते पण त्यात दोन्ही व्यक्तीचा समजूतदारपणा हवा तेव्हाच ते नातं टिकत. घरात जेव्हा समाधान असते तेव्हाच शांती पण नांदते.त्यामुळे घर हे फक्त तिथे राहणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते.घर छोटं असेल तरी चालेल पण हि मूळ तत्व मनात ठेवून जगण्याला नक्कीच वेगळी वाट मिळेल.

Sunday, February 20, 2022

संघर्ष

          संघर्ष हा असा शब्द आहे ज्यात माणूस आपली पूर्ण मेहनत त्या ध्येयाकडे पोहचण्यात लावते . तो संघर्ष करताना माणसाला दुखापत होते वेदना होतात पण शेवट हा एक महत्त्वाचा भाग असतो. एक लहान बाळ सुरुवातीला हालचाल करायला लागते त्यांनतर ते पलटायला शिकते .काही दिवसांनी रंगायला सुरुवात करते आणि मग आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकते.आता यात काय होते कि जेव्हा प्रत्येक एक पाऊल बाळाचं संघर्षच असतेम्हणजेच हात पाय चा नियंत्रण समजायला लागले कि एक संघर्ष चालू होतो त्याला अजून कायकाय करता येईल.आपले शरीराचे अंग कसे हलवता येईल याचा संघर्ष करता करता ते बाळ चालायला शिकते पण तेव्हा बाळाला आधार असतो. तो आधार देतो पण संघर्ष हा बाळालाच करावा लागतो.

       असच अगदी पूर्ण मानवी जीवनात अनुभवायला मिळते. प्रत्येक दिवसाला एक संघर्ष असतो  पण त्यात फक्त बसून राहायचं कि त्या गोष्टीला सामना करायचं हे त्या व्यक्तीवर असते. धडपडण्याऱ्या कार्यातच यशाचा आनंद असतो. जितकी जास्त मेहनत बुद्धी वापरली तिथेच त्याचे यशामध्ये रूपांतर होते. 

Sunday, February 06, 2022

स्वातंत्र्य

    स्वातंत्र्य हा शब्द कानी आला की लगेच 15 ऑगस्ट  1947  रोजी आपला भारत स्वतंत्र झालाहेच वाक्य गुणगुणत असते. आपल्याला त्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालं आणि गर्वानी आपल्या देशाचा मान तिरंगा फडकवतो. पण नेमकं स्वातंत्र्य म्हणजे कायया प्रश्नाची अनेक उत्तर येतीलस्वातंत्र्य म्हणजे आपण आपल्या मनासारखं वागू शकू आपल्याला हवं ते करू शकूजिथे जायचं आहे तिथे जाऊ शकू पण खरं स्वातंत्र्य म्हणजे ज्या थोर व्यक्तींनी आज आपला बलाढ्य भारत बनवण्यास सहकार्य केलेत्रास सहन करून पण हार नाही मानली त्यांना मनात प्रेरणास्थान ठेवून आजच्या भारतात एक जबाबदार नागरिकएक चांगला व्यक्ती बनून राहणे हे प्रत्येक व्यक्तीच आपल्या जन्मभूमीसाठीच कर्तव्य आहे. थोर व्यक्ती काही मूळ तत्त्वावर जीवन जगतात. थोर व्यक्ती वेळ मिळत नाही अशी तक्रार करत नाहीजीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द चिकाटी आणि आवड या तत्त्वाची गरज असते.

    त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे एक विश्वासएक इच्छाएक आवड माणुसकी आणि एक कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. सर्व आपल्याच मनासारखं घडावं हे गृहीत धरणे बरोबर नाही पण त्यात सर्वांना घेऊन चालण्याला अर्थ आहेएक कार्य पण खूप काही शिकवून देते त्यामुळे याचा खरा अर्थ समजून जीवन जगण्यातच आनंद आहे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...