| श्री राधाकृष्ण |
| श्री विठ्ठल राखुमाई |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
माझ्यासोबतच अस का होते ? मला का अपयश मिळते ? कधी मी यशाची पायरी गाठेल ? काय सारख एक गेल की एक टेंशन येऊनच असते ?
असे प्रश्न मनात येण स्वाभाविकच आहे. मानवी जीवनात सुख, दुःख, ताण-तणाव, रडण, सकारात्मकता, नकारात्मकता ही सर्व असण सामान्य आहे. वाईट काळ हा चांगल्या काळात कस वागायच ते शिकवून जाते. जीवन जगताना म्हणजे फक्त सकाळी उठणे, काम करणे, जेवण करणे, परत झोपणे.......नाही, फक्त याच गोष्टी नाही तर जीवन जगताना म्हणजे आपले विचार, आपली दुसऱ्या व्यक्तीबद्दलची वागणूक, कठीण प्रसंगी सावरायची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इ. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयम.
बहुतेक व्यक्तीच मन हे चंचल असते आणि त्याच चंचलपणाच्या विरुद्ध असतो संयम. आपण ऐकलं आहे, संयम ही यशाची किल्ली आहे, आणि कुलूप म्हणजे आपल्या समोरील संधी. प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट वेळ असतो आणि तो वेळ आली की कार्य पूर्ण होते. पण तिथपर्यंत पोहचेपर्यंत अनेक अडथळे पार करावे लागते. त्यात खरी परीक्षा असते, त्या परिस्थितीत आपलं वर्तन कस असते, हे महत्त्वाचे ठरते.
एखाद्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी संयम आवश्यक आहेच पण सोबतीला मेहनतीची जोड लागतेच. संयम हा त्या संघर्षाचा एक घटक आहे. आपल्या मेहनतीच्या बळावर आणि देवाच्या आशीर्वादाने जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत संघर्ष करत राहणे योग्य आहे.
खचून न जाता संयम ठेवून मेहनत करून यशाच शिखर गाठण्याची प्रत्येक व्यक्तिमध्ये शक्ति असते. फक्त गरज असते ती शक्ति ओळखण्याची ..........
स्वप्न अनंत असावी पण ती पूर्ण करण्याची ताकत पण असावी.
संयम बाळगा......नक्कीच एक नवीन दिवस आयुष्यात यशाची भरभराट आणेल.....
जीवनात लहान लहान गोष्टीच आनंद अनुभवता येणारी व्यक्ती ही नक्कीच समाधान वृत्तीची असते. दररोज येणारे नवीन क्षण, नवीन अनुभव या सर्वाना आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनवून त्यांचा स्वीकार करून आनंदात जगणं सोप नाही पण ते अवघड सुद्धा नाही.
आजकाल जगाच्या वाटेने चालणारी व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरत आहे. या गोष्टीच उदाहरण बघू,
रस्त्यावर अपंग (ज्या व्यक्तीला पाय नाहीत, किवा चालायला जमत नाही) व्यक्ती ही आपली चाके असलेली खुर्ची हाताच्या मदतीने चालवून गती निर्माण करतो. पण तेच जेव्हा त्याला पायांनी चालणारी व्यक्ति दिसते, तेव्हा त्याला पण वाटते की आपण पण स्वतःच्या पायावर चालू शकलो असतो तर किती बर झाल असतं. आता जो पाऊलवाटेने चालणारा व्यक्ती सायकल चालवण्याऱ्या व्यक्तीला बघतो तर त्याला पण विचार येतो, आपल्याकडे पण सायकल असती तर खूप बर झाल असतं. समोर सायकल चालवणारा व्यक्तीला गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे बघून वाटते माझ्याकडे पण गाडी असती किती छान असतं .............
असे हे विचारांचे चक्र सुरूच असते. नक्कीच प्रत्येक व्यक्तीने समोरील स्वप्न बघावे पण ते स्वप्न सकारात्मक दिशेने न्यावे. काही नकारात्मक विचार करतात. माझ्या नशिबात हेच आहे का ?.. अस तस.. तुमच्या जवळ जे काही आहे त्याचा आदर केला की नक्कीच समोरच यश देवच आपल्या पदरी देतो. आणि म्हणतात ना तुमच्याकडे जे आहे ते कदाचित कोणाच स्वप्न असेल म्हणून देवावर विश्वास ठेवून आपल्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.
तुमच्याकडे काय नाही याच्या विचारात जीवन घालवण्यापेक्षा आज तुमच्याकडे काय काय आहे, हे विचार करून एक यादी बनवा मग नक्कीच कळेल, आपण किती भाग्यवान आहो की देवाने आजपर्यंत आपल्याला किती काही दिलेल आहे.
जगताना आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जगा, तेव्हा वाटेल की खरच आपल्याकडे किती काही आहे. तेच आपण ज्यांच्याकडे जास्त साधन संपत्ति आहे, अश्याकडे बघून जीवन जगणार तर एक वर्तमान गोष्टीतील समाधान हरवून बसाल.
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...