प्रत्येक व्यक्तीला आपण का जगतो ? कशासाठी जगतो ? आपल्याला काय करायचे आहे ? आपल्या जीवनाच ध्येय काय आहे ? या सर्व प्रश्नाची उत्तर ज्या व्यक्तीकडे असतील त्या व्यक्तीच्या ध्येयामध्ये येणाऱ्या अडचणींपुढे मात करून तो व्यक्ती नक्कीच यशस्वी होणारच... का तर ? जी सर्वात मोठी ताकत आहे ती मनाची इच्छाशक्ती आहे.
जीवन हा जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास आहे. सुख, दुःख, कठीण प्रसंग अशी अनेक नागमोडी वळणे जीवनाचा मूलमंत्र देऊन जाईल. पण जेव्हा तीच इच्छाशक्ती मनातून लुप्त होते तेव्हा काय होते याबद्दल जाणून घेऊया...
जीवनाचा तो एक भाग ज्यामध्ये आपली इच्छाशक्ती हि दबून जाते, एक न्यूनगंड( स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजणे ) निर्माण होतो, जीवनाचं ध्येय नसते, नवीन काही करण्याची इच्छा नसते,भूक लागत नाही, झोप येत नाही, ताणतणाव असते, मानसिक त्रासापासून ग्रस्त असते त्यामुळे शारीरिक त्रास उदभवतात हि सर्व नैराश्याची लक्षण आहे.
नैराश्याची कारण ही खूप आहेत. आपल्याला जस हवं असते तस न मिळाल्यामुळे नैराश्य येते, कोणत्याही क्षेत्रात अपयश पदरी आल्यामुळे नैराश्य येते, एखादी गोष्ट मनाला लागली कि नैराश्य येते, आपल्यापेक्षा यशाची उंची गाठणाऱ्या लोकांना बघून नैराश्य येते.
नैराश्य येणे साहजिकच आहे पण त्यातून बाहेर पडणे आपल्यासमोर एक आव्हान आहे. विचारांनी ग्रस्त असलेलं डोकं शांत करण्यासाठी स्वतःला व्यस्त करणे गरजेचे आहे, एखादी छंद जोपासणे गरजेचं आहे, आवडती गोष्ट केल्यास मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, पर्यटन स्थळाला भेट द्या त्यामुळे मन, मेंदू हा दुसऱ्या वाटेने विचार करायला लागेल, तुमच्या विश्वासातील व्यक्तीसोबत बोला,मनातल्या गोष्टी सांगा, पण विचार करून, खरंच त्या व्यक्तीला तुमची काळजी असेल तर तीच व्यक्ती सर्व ओळखून घेईल, नवीन कला शिकण्याचा प्रयत्न करा आणि एक मनात ध्येय ठेवून नव्या वाटेला सुरुवात करा.... मनाची इच्छा शक्ती सर्वात मोठी शक्ती आहे, ध्येय साध्य करण्याची क्षमता प्रत्येकात असते फक्त योग्य दिशेने चालावं लागत.....