Sunday, August 14, 2022

हर घर तिरंगा



                                      भारतात  स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील  प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी  लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जय हिंद जय भारत 




हर घर तिरंगा 

Wednesday, July 13, 2022

आनंदाचे क्षण

                                           आनंद या शब्दाच वर्णन करायच म्हटल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील बोलके शब्द निराळे असतील. प्रत्येक व्यक्तीची वेगळी भावना असते. पाऊस आला की मोर आपला पिसारा सृष्टीमध्ये पसरवत आनंद व्यक्त करतो. वाऱ्याची झुळूक आली की छोटस रोपट वाऱ्याच्या तालात डोलते. पेरलेल्या धान्याला पावसाच्या पाण्याने कोंब येतात आणि वाढ होते. प्राण्याना आनंद झाला की ते पण शेपूट हलवून किवा प्रेम दाखवून त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवतात. आणि माणसाला आनंद होतो तेव्हा सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगतो. नाचतो, गातो.
अस प्रत्येक जिवाची रीत वेगळी असली तरी आनंदाचे क्षण सर्वांसाठी सारखेच असतात.

Saturday, June 25, 2022

नारी सशक्तीकरण

                                                                                                                                                                                                                                                                                                                        आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.

                  ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे महिलांची प्रगती.

                     आजच्या काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.

                       महिलांची जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.

मुलगी शिकली प्रगती झाली


 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...