Wednesday, March 02, 2022

संगत

       प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सभोवतील वतावरणाचापरिसराचा शारीरिकमानसिक किंवा व्यक्तिमत्त्व विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीची वाढ होत असताना  ती व्यक्ती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवरून शिकत जातो आणि आत्मसात करत असतो. नवनवीन गोष्टी शिकत असताना त्या चांगल्या आहे की वाईट आहेत याच परीक्षण त्या व्यक्तीला करता  येईलच अस नाही. त्यासाठी आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज असते. 

आदर्श व्यक्ती  कोण ?

                   आदर्श व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती  तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेलआणि तुम्ही कुठे चुकत असाल तर ती चूक तुम्हाला सांगून त्यावर योग्य उपाय सांगेल. अशी ही आदर्श व्यक्ती  स्वतःलाच  शोधावी लागते. 

          आयुष्य जगताना खूप लोक भेटतात. काही मैत्रीच्या रूपात काही गुरूच्या रूपात किंवा अजून काही..............  मैत्रीच्या रूपात भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण असतात आणि या संगतीचा परिणाम स्वतःवर होतो. आपण त्या व्यक्तीकडून कोणते गुण घ्यावे हे स्वतःवर अवलंबून असते. 

                   जेव्हा व्यक्ती माणूस ओळखायला शिकतोतेव्हा त्या व्यक्तीचा एक नवीन प्रवास सुरू होतो. कारण तेव्हा एक स्वतःवरचा विश्वास कायम असतो आणि काय बरोबर काय चूक आहे याची जाणीव येते. आपल कोण ?  या प्रश्नाच उत्तर मिळून जाते. 

                  आयुष्यात संगत खूप महत्त्वाची असते. त्याच आधारे आपलं आयुष्य प्रकाशात किवा अंधारात जाऊ शकते. त्यामुळे प्रकाश की अंधार यापैकी कोणत्या मार्गाने जायच हे स्वतः ठरवून स्वतःच्या बळावर आयुष्यातील यशाची शिखरे गाठायची.

रक्तदान - श्रेष्ठ दान

                           परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीनिमित्त्य मला पहिल्यांदा रक्तदान करण्याचा अनुभव आला. तो अनुभव मी सर्वाना सांगू इच्छितेजेणेकरून तुम्ही सुद्धा या सेवेत आपलं योगदान द्याल.

                सर्वात प्रथम रक्तदान करण्यासाठी अनेकांना मनात भीती शंका असतातत्या प्रथम दूर करण्याची गरज आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असं म्हटल्या जाते. आपण दान केलेल्या रक्तामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. रक्तदाताचं वजन आणि हिमोग्लोबीन हे प्रमाणात असावं आणि शरीर निरोगी असावं लागते. आपल्या शरीरातील रक्त गेलं हे मनात ठेवण्यापेक्षा हेच एका जिवाच्या कामी येईल असं मनात ठेवून पुढाकार घ्याला हवा. शरीर सुदृढ असेल तर अशक्तपणा सुद्धा जाणवत नाही. पण विश्रांतीची गरज असते. काही तासात नैसर्गिक रक्त शरीरात तयार होते. 

                   मला सुरुवातीला मनात भीती होती कस काय होईल.... पण सर्व सुरळीतपणे प्रक्रिया पार पडली. पण एक गोष्ट होती ती म्हणजे मी गेली तेव्हा मुली नव्हत्या. पुरुषांचं प्रमाण हे जास्त होत. त्यामुळे मनात आलं कि आपली स्त्री शक्तींनी सुद्धा मनात भीती न बाळगता आनंदाने या सेवेचा आनंद घ्यावा.

                 आजच्या लिखाणाचा हेच उद्देश आहे कि हे माझे शब्द वाचताना तुम्हाला पण  या सेवेत येण्याचा मार्ग दिसावा  आणि जे आधीपासून या सेवेत आहेत त्यांचं कौतुक आहे.

३ रंग आयुष्याचे

           बालपण आणि म्हातारपण साम्य आहे अस म्हणतात. बाळ जन्माला येते आणि तो जीव सर्वांचा लाडका असतो. पण जेव्हा त्या बाळाची काळजी घ्याची असते तेव्हा कष्ट लागतेकारण त्या बाळाला बोलता येत नाहीसांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हाई आईलाबाबाला समजून घ्यावी लागते. बाळ रडते आहे तर काय करायला हवं हे हळू हळू शिकून घेतात. त्या बाळाला आधार हवा असतो. 

                 बाळ मोठं होत होत युवावर्गात प्रवेश करतो. त्या काळात अनेक मित्र मैत्रिणी मिळतातत्यापैकी जास्तीत जास्त हे काही वर्षासाठी मैत्री असणारे असतात पण काहीसोबत मैत्री ही कायम साथ देणारी असते. खूप काही नवीन शिकण्याचा काळ असतो. याच काळात आपलं ध्येयआपल्या आवडीनिवडी ठरवतो आणि एका भविष्याच्या वाटचालीने जगतो.

                 म्हातारपण एक कसोटीची परिस्थिती असतेवृद्ध व्यक्ती सहज बोलून दाखवत नाहीत्यांना अस वाटते याना त्रास नको त्यासाठी मौन असतात पण त्यांची ती गोष्ट माहित करायला समजून घ्यावं लागते. प्रत्येक गोष्टीत आधार द्यावा लागतो. चालायला आधार देण्यापासून ते जेवण भरवण्यापर्यंत सर्वच करावं लागते. जेव्हा व्यक्ती जवळची असते तेव्हा पूर्ण आपुलकीने सेवा केली जाते. आणि त्याच वेळेला आपण आयुष्यभर काय कमावलं याच फळ माहित पडते. रक्ताच्या नात्यांनी दिलेली साथ नाहीतर सोडलेली साथ..........

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...