जसं जसं वय वाढत जात तश्या जबाबदारी😌 वाढत जातात आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी होत जातात. बालपणीचे मित्र मैत्रिणी👭 दुरावले जातात आणि राहतात फक्त आठवणी♥️...
अशीच एक आठवण म्हणून बालपणीचे खेळ खाली दिले आहे, कधी एकत्र कुटुंबासोबत वेळ घालवत असणार किंवा भावंडांसोबत एकत्र वेळ मिळाला की खालील खेळ अगदी आनंदाने खेळता येतील.
कारण खेळण्याला वयाचं बंधन नसते♥️
बैठकी खेळ
- नाव गाव वस्तू प्राणी 📝
- चोर पोलिस चिठ्ठ्या (राजा 1000, दरोगा 700, पोलिस 500 शिपाई २०० आणि चोर 0 )✍️
- ४ चिठ्ठ्या ✍️
- कॅरम
- बुद्धिबळ ♟️
- पत्ते (घुस, सत्ती उतरवणे, बिंगो)🃏
- चवा अश्टा / छक्का बारा
- झंडी मुंडी
- लुडो
- साप सिढी🐍🪜
- सागर गोटे
- खाऊचे भांडे
- बाहुली (कापडाची)
- १ उडाला, २ उडाला, ३ म्हणे डावा उजवा, बोला बोला काय बोलू ? (रंगांची/ फुलांची नावे)
- चिमणी उड, कावळा उड 🐤🐦🕊️🦆🦅
- तितली उडी, उडके चली🦋
- आमचोरी चप्पा चोरी
- सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा
- खाऊची पार्टी
- डॉक्टर डॉक्टर
मैदानी खेळ
- लगोरी⚾
- लंगडी (७ डब्बे/ ६ डब्बे/ लंगडीचा डाव)
- टीप्पर
- संकल
- तळ्यात मळ्यात
- क्रिकेट 🏏
- बॅडमिंटन🏸
- धाबाधुबी
- लपाछपी
- पिंकी पिंकी व्हॉट कलर ❤️💚💙💛🧡🩷🩶🩵💜
- बर्फ का पाणी 🧊💧
- बीचका बंदर 🐒
- दोरीवरच्या उद्या➰
- डोळ्यावर पट्टी लावून डाव
- मामाच पत्र हरवल आम्हाला नाही सापडलं
- इडलिंबु
- संगीत खुर्ची 🪑
- चमचा लिंबू 🥄🍋
- पुतळा/ statue 🗽
आजच्या डिजिटल /मोबाईलचा📱 काळ बघता हे सर्व वरील खेळ विस्मरणात जातील आणि राहतील फक्त आठवणी,
आपल्या समोरच्या पिढीला या खेळाबद्दल माहिती करणे ही आपली जबाबदारी बघता पुन्हा एकदा बालपणाचा सर्वांनी आस्वाद🤩🤩 घ्यायलाच हवा.
खेळ वाचताच तुम्ही पण आठवणीत रमला की काय ?
चला तर मग समोरच्या पिढीच्या बालपणात या खेळाचे रंग उधळूया☺️☺️🥰.
जिंकणे किंवा हरणे यापेक्षा त्या क्षणातून मिळालेला आनंद महत्त्वाचा असतो.
1 comment:
Khup chan
Post a Comment