![]() |
| आई आणि बाळाच्या प्रेमाच प्रतीक |
![]() |
| स्त्री सौंदर्य |
![]() |
| श्री गणेश |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
आरसा हा आपल स्वतःच प्रतिबिंब दाखवतो आणि सावली ही आपली साथ कधीच सोडत नाही असं खूपदा एकलेल आहे, पण जर आरसा दोषपूर्ण निघाला तर आपल्याला जे प्रतिबिंब दिसते ते प्रत्यक्ष पेक्षा वेगळं असतं, म्हणजेच आरसा पण काहीवेळेस आपली साथ सोडतो.
सावली ही कायम आपल्यासोबत असते पण जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो तेव्हा उभ्या असलेल्या वस्तूची सावली दिसत नाही याचाच अर्थ एक वेळेस सावली पण आपली साथ सोडते मग आपण माणसांकडून तरी काय अपेक्षा ठेवावी. नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे एक अशी व्यक्ति असते जी कायम खंबीर आधार देतात, प्रत्येक वेळी गरजेच्या वेळी उपलब्ध असतात आणि अश्या व्यक्तीना जपलं पाहिजे, कायम आधार दिला पाहिजे.
मानवाच्या जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्म. देवांवर विश्वास ठेवणारे म्हणजे आस्तिक आणि विश्वास न ठेवणारे म्हणजे नास्तिक. आपण देवाला प्रत्यक्षात पाहलेले नसले तरी त्याचं रूप आपल्याला माहीत आहे, मूर्तिमार्फत किवा फोटोमार्फत आणि काहींनी अनुभव पण घेतला असेल.
सर्वांना सुखी ठेव, ज्ञान दे, बुद्धी दे अशी प्रार्थना आपण देवाला करतो आणि देव आपल सर्व ऐकतो आणि आपल्याला साह्य करतो अशी ही आपली श्रद्धा असते. देवाबद्दलची मनातील श्रद्धेची भावना निर्मळ आणि पवित्र असते. देव आपल्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, फक्त भक्तांनी पवित्र मनाने भक्ति करावी. आजच्या काळात काही प्रमाणात रूप बदललेल दिसते, धर्माच्या नावावर लोकांकडून पैसा काढला जातो, प्रत्येक मंदिरात दानपेटी असते, भक्त इच्छेप्रमाणे दानपेटीत पैसे दान करतो पण काही ठिकाणी श्रद्धेच्या नावावर लोकांकडून पैसा मागितला जातो आणि हे मला पूर्णपणे चुकीचे वाटते, जिथे पैसा आला तो व्यवसाय झाला असे मला वाटते.
आजही काही संस्था खूप छान प्रकारे कार्य करत आहे. सर्वांना सोईस्कर दर्शन व्हावे, महाप्रसाद मिळवा यासाठी खूप छान पद्धतीने नियोजन करत आहे आणि या संस्थाकडून हीच शिकवण घेणे उपयुक्त ठरेल. स्वतः मनापासून दान करणे आणि मागितलेले पैसे देणे यात खूप फरक असतो आणि देवकार्यात चुकीच्या मार्गाने पैसे येत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...