Sunday, November 27, 2022

माझे मन






फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले 

गुलाबी  रंगात  रंगून पुष्प वाऱ्याने डुले 

पावसाचे थेंब जणू वाटे फूल मोत्याने सजलेले 

फुले पाहून माझे मन आनंदाने बहरले










एक अनुभवलेला क्षण


            प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्या व्यक्तीला सर्व नकोस वाटे. मनातून हरल्यासारख वाटते. मोकळा श्वास घ्याला त्रास होतो, जीवनात पूर्ण काळोख दिसायला लागतो. तसंच काही माझ्या बाबतीत झाल. एक क्षण असा आला की मन कोमेजून गेल होत. कधी आपल्या कडून काही चुका होतात पण आपल्याला तेव्हा ते बरोबर वाटते. पण त्या गोष्टीची जाणीव नसते. वाईट संगतीचा परिणाम जीवनावर होतो आणि आपल्या जीवनात काही वाईट काही चांगले प्रसंग घडत असतात. एककाळ असा येतो की नवीन काहीतरी करायला मानसिकदृष्ट्या कमजोर होऊन असत. पण देवाला बहुतेक ते मान्य नव्हता. हिला एक आत्मविश्वास, जगण्याची नवीन उमेद द्याल हवी, म्हणून देवाने मला एक भेट दिली.

         देवानी दिलेल्या भेटीमुळे माझ पूर्ण जीवन बदलल, माझा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोण बदलला. एक कळीच फुलात रूपांतर होते तस माझ एक मला नवीन आयुष्य मिळाल. जीवनाला एक आकार मिळाला. नवीन नवीन गोष्टी करण्याला उत्साह वाढला. एक मनातला स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढत गेला. जगाला पाहण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळाला. स्वतःबद्दल आनंद वाटू लागला. एक जीवनात बदल झाला. जगाची ओळख पटली. आज जगताना व्यक्ति आपली मूळतत्त्व विसरत आहे. माझा पण तसच काही झाल, पण त्या गोष्टीची जाणीव होऊन आज मी ठामपणे आपल्या मूळतत्त्व घेऊन या जगत एक आपला वेगळ जग निर्माण करत देवानी दिलेल्या या अमूल्य अश्या  भेटीने सामोरे जायच प्रयत्न करत आहे.

          अंड्यातून जीव निर्माण होतो. जर अंड्याला बाहेरून दबाव दिला तर ते फुटते आणि  त्यातल्या जिवाची हत्या होते पण तेच जेव्हा तो अंड्यातला जीव स्वतची शक्ती वापरुन कवचवर दबाव देतो तेव्हा त्यातून नवीन जिवाची निर्मिती होते. याच काही विचार मानवाच्या जीवनात लागू होतात. जेव्हा आपण आपला एक वेगळ जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली आंतरिक शक्ती मजबूत असावी लागते तेव्हाच आपण नवीन जगाशी सामना करण्यात सफल ठरतो पण तेच बाहेरून दबाव आला की मानवाच अस्तित्व संपते. नवीन आशेची किरण घेऊन जगात पाऊल ठेवायची ताकत प्रत्येकात असते आणि प्रत्येक स्वप्न साकार करण्याची हिम्मत पण असते मात्र त्या शक्तीची जाणीव असणे महत्त्वाचे असते. ती जाणीव मला एक मजबूत, खोडकर, स्वच्छ मन असणाऱ्या व्यक्तीने करून दिली. म्हणतात ना आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ति आपल्याला काहीतरी शिकवत असते. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात येण्याच्या मागे काहीतरी गुपित असत. नाहीतर इतक्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या जगात त्याच व्यक्तीशी भेट होणे हे नवलच आहे.

 

          प्रत्येक व्यक्तीत एक आंतरिक आणि बाह्य सुंदरता असते. बाह्य सुंदरतेकडे लक्ष देता देता मातील आंतरिक सुंदरतेला बहुतेकजण विसरतात आणि स्व: पण विसरतात. आपल्या मनाला काय आवडते. काय केल्यावर मनाला आनंद मिळतो. आनंद म्हणजे खरा आनंद आजकालच्या काळातील आनंद नाही की सोशल मेडियावर 4 लोक आपली सुस्ती करत आहे. वाहवा करत आहे तो आनंद नाही. खरा आनंद म्हणजे कोणताही मोह बाळगता स्वखुशीने केलेल एक कार्य आणि त्यातून ओठावर उमटणार हसू, हेच महत्त्वाच आहे. प्रत्येकच दिवस आनंदाचे नसतात कधी दुख कधी सुख त्यामुळे प्रत्येक दिवसाचा प्रतेकला सामान्य करावाच लागणार आहे.

           मी माझ्या कला ना विसरून बसली होती. माझ्यातला आत्मविश्वास कमजोर झाला होता आणि माझ्यात पण काहीतरी वेगळ आहे हे मी विसरून दुखच डोंगर घेऊन बसली होती पण त्या एक व्यक्तीने माझ्या मनातल ओळखून मला प्रोत्साहन दिल. आणि प्रत्येक क्षणाला साथ दिली. आणि आज मी एक्स्पर्ट आहे अस म्हणत नाही पण मी जे करते त्यातून मला आनंद मिळतो जस लिखाण, चित्रकला, रंगोली, मेहंदी, काही नवनवीन वस्तु बनवणे या सर्व गोष्टीतून आनंद मिळतो. 4  लोकानी स्तुति करावी अस पण माझ्या मनात नसते पण काही दिवसानी तेच मी स्वता पाहले की एक वेगळाच समाधान असते. वाहह छान अस स्वतःलाच शाबासकी देत असते. एक छोटासा मार्ग जरी बदलला तरी ते आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणू शकते. त्यामुळे अस म्हणतात ना ह्रदय काय सांगते ते ऐका.

            आदर्श व्यक्ति ही प्रत्येकाच्या जीवनात असावी. जी व्यक्ति तुम्हाला काय चूक काय बरोबर हे समजावून सांगते. तुमच्या चुका झाल्या तरी योग्य मार्ग सांगत असेल, बरोबर असेल तर त्या गोष्टीत हिम्मत देते असेल, नेहमी तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव करून देत असेल तीच व्यक्ति तुमच्यासाठी आदर्श. जेव्हा त्या आदर्श व्यक्तीची साथ लाभते तेव्हा माणूस कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकते. तसच मला वेळोवेळी आधार मिळाला, प्रोत्साहन मिळालं म्हणून आज इतके शब्द मी लिहू शकत आहे. मला स्वतःवर गर्व वाटतो आज देवानी मला अश्या व्यक्तीची भेट घडवून दिली. वर्णन करावा तितका कमी आहे,चांगले गुण सांगाव तितका कमी आहे. आणि शिकण्यासारख इतका आहे की आयुष्यभर पुरेल.





Monday, August 29, 2022

दृष्टिकोन

                      जस जस आपण या जगात मोठ होतो तस अनेक गोष्टीची जाणीव होत असते जगात काय बरोबर चालू आहे काय चुकीच आहे कोणत्या गोष्टीला विरोध असावा आणि कोणत्या गोष्टीला पुढाकार करावा. जस नाण्याला २ बाजू आहेत तस प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे कायम जीवनभर  असणारच पण  त्याला सामोरे कसे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आज काही गोष्टीला जेव्हा मनाला स्पर्श करतात तेव्हा त्या मनाला लागतात आणि डोळे पाणवतात ते मग आनंदाचे असो किवा दुःखाचे.... 


काही गोष्टीला धरून या जगात जगाव लागत प्रत्येक दिवस नवीन अपेक्षा नवीन संकट घेऊन  येतो परंतु आपले विचार मनात पक्के ठेवून प्रत्येक दिवस जगणे महत्त्वाचे असते. 
जीवन जगताना आपली नजर महत्त्वाची आहे पाहण्याचा दृष्टिकोन जीवन बदलण्यास मदत करते.

Sunday, August 14, 2022

हर घर तिरंगा



                                      भारतात  स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील  प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी  लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जय हिंद जय भारत 




हर घर तिरंगा 

Wednesday, July 13, 2022

आनंदाचे क्षण

                                           आनंद या शब्दाच वर्णन करायच म्हटल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील बोलके शब्द निराळे असतील. प्रत्येक व्यक्तीची वेगळी भावना असते. पाऊस आला की मोर आपला पिसारा सृष्टीमध्ये पसरवत आनंद व्यक्त करतो. वाऱ्याची झुळूक आली की छोटस रोपट वाऱ्याच्या तालात डोलते. पेरलेल्या धान्याला पावसाच्या पाण्याने कोंब येतात आणि वाढ होते. प्राण्याना आनंद झाला की ते पण शेपूट हलवून किवा प्रेम दाखवून त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवतात. आणि माणसाला आनंद होतो तेव्हा सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगतो. नाचतो, गातो.
अस प्रत्येक जिवाची रीत वेगळी असली तरी आनंदाचे क्षण सर्वांसाठी सारखेच असतात.

Saturday, June 25, 2022

नारी सशक्तीकरण

                                                                                                                                                                                                                                                                                                                        आपला समाज हा पुरूषप्रधान समजल्या जातो. काही वर्ष आधी अस ठरलेल होत की पुरुष घर चालवण्यासाठी नोकरी किंवा धंदा करतील आणि स्त्रीयांनी घर काम सांभाळायच. इच्छा असेल तरी मुलीना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. नोकरी करण्यास विरोध केला जायचा. हे आताच्या परिस्थितीत सुद्धा घडत आहे. तरी या सर्वाना सामना करून महिलाशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात उत्तमरीत्या कार्यरत आहे.

                  ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले या भारताच्या सुपुत्रिमूळे आज प्रत्येक जन्म घेणाऱ्या मुलीला शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. जीवन जगण्याचा एक मूलभूत पाया म्हणजे शिक्षण आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपली जबाबदारी पार पाडत आहे. काही महिला देशाच नाव उज्ज्वल करत आहे. हे शिक्षण मुलीना मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारक यांनी अपार कष्ट केले. आणि त्याचच फळ म्हणजे महिलांची प्रगती.

                     आजच्या काळात प्रत्येक मुलीला, स्त्रीला स्वतःच्या पायावर उभ राहण्याची गरज आहे. कधी अडचण आली तरी स्वतः त्या गोष्टीचा सामना करण्याची ताकत प्रत्येक स्त्री मध्ये हवी. आज अनेक घटना घडतात त्यासाठी प्रत्येक महिलेने सावधान राहणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणे गरजेचे आहे. स्वावलंबी म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर समाजात घडत असणाऱ्या नवीन गोष्टी माहीत करून शिकून घेणे, पैसचे व्यवहार,काही नियम व कायदा, असे अनेक गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे.

                       महिलांची जबाबदारी आहे मूल आणि चूल सांभाळण्याची परंतु त्यासोबतच जगाच्या सोबत चालण्यासाठी जगात काय घडते आहे हे माहीत असण महत्त्वाच आहे. अस म्हणतात घरातली स्त्री शिकली की ती पूर्ण घराला शिकवते तसच काळानुसार महत्त्वपूर्ण गोष्टी माहीत असण काळाची गरज आहे.

मुलगी शिकली प्रगती झाली


 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...