ठरलं काय ? अरे पण काय ठरलं ? ३१ डिसेंबर विशेष योजना काय आहे ? डिसेंबर महिना सरतेवेळी सर्वांच्या चर्चेचा विषय असतो. लहान मुली मुलांना फार कौतुक, वर्षाचा शेवटचा दिवस पण मोठ्यांच्या मनात एकच विचार असतो अरे बापरे ! हे वर्ष किती लवकर संपलं. किती लवकर लवकर दिवस गेले. घड्याळ ही आपल्याच वेगाने चालत असली तरीही आता वेळ खूप कमी आहे अस आपल्याला भासत असते. सर्व आपल्या कामात मग्न असतात आणि त्यामुळे वेळेचे भान नसते.
प्रत्येकाच्या मनात नवीन वर्षाबदलच्या नवीन आकांक्षा निर्माण होतात. जरी हे वर्ष कष्ट करण्यात गेलं असेल तरी नवीन वर्षी नवीन यश हातात येऊ देत हिच इच्छा बाळगत नवीन वर्षाच स्वागत करत असतात. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शिकायला मिळतं, आपल्याकडून झालेल्या चुका सुधारून नवीन आयुष्य घडवायला मिळतं.