| होळी |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, December 01, 2024
Sunday, November 24, 2024
वय आणि समजूतदारपणा
समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते.
कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.
आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.
Sunday, November 17, 2024
असच काही
नात्यामधले वाद हे अमावस्याच्या रात्री सारखे असतात. अमावस्येला सगळीकडे काळोख अंधार असतो. रोज आसमंत प्रकाशित करणारा चंद्र दिसत नसतो. अमावस्या संपली की हळू हळू चंद्राचं नवीन रूप पाहायला मिळते. दररोज चंद्र कलेनी वाढत जातो आणि मन ओढून घेणारी पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेचा चंद्र बघून मनाला शांत वाटते. कवीच्या मनात घर करतो.
अश्याचप्रकारे मैत्रीमध्ये वाद झाले की मन उदास होते पण प्रेमापोटी वाद विसरून एकत्र येणे हे पौर्णिमेच्या रात्री सारखे असते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नात्यामध्ये एक वेगळं तेज निर्माण होते आणि रागावणाऱ्या चेहऱ्यावर आनंदाचे बोल असतात अशीच ही वळण त्या मैत्रीला पुन्हा घट्ट करून जातात.
Sunday, November 03, 2024
मैत्रीण कशी असावी....
एक तरी मैत्रीण अशी असावी
हाक मारताच ती जवळ असावी
महिन्यांनी भेटली तरी नात तेच असावं
प्रेम आणि जिव्हाळा मनापासून असावं
ना सोशल मीडियाचा रोग असावा
ना मैत्रीचा दिखावा असावा
कायम मैत्रीतील प्रेम असावं
मन भेटण्यासाठी आतुर असावं
Sunday, October 20, 2024
स्वप्न स्वप्नच राहिले
भविष्यातील आकांक्षा वर्तमानकाळात विचार करून ठेवून त्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी धडपड ही फक्त स्वप्नांसाठी असू शकते. स्वप्न म्हणजे काय ? गाढ झोपेत आपल दिसणार अस्तित्व की आपल्याभोवती दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, हे सर्व खर असल्याचा भास होणारं स्वप्न. दुसरं स्वप्न म्हणजे आपल्या भविष्यात आपल्याला काय हवं आहे हे सांगणारं.
झोपेत दिसणारी स्वप्ने ही आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या, कानांनी ऐकलेल्या किंवा रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टीवरचा भास असतो. पण डोळे उघडे ठेवत मनात साठवलेले स्वप्न ही भविष्याची तिजोरीच.
व्यक्ती जवळील असेल तरीही एकमेकांच्या दूर का जातात ? जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा दुरावा निर्माण होतो. मनाच्या विरुद्ध गोष्टी घडल्या की यातना होतात. मग भविष्यासाठी पाहलेली स्वप्न कमळाच्या फुलाप्रमाणे फुलायच्या ऐवजी गळून पडलेल्या पाकळ्यांसारखी झाली तर ? स्वप्नात तर कमळ अपेक्षित होत पण काय मिळालं कोमेजून पडलेल्या पाकळ्या. प्रत्येकाला कमळ मिळेलच असं नाही, कोमेजलेल्या पाकळ्या हातात जरी आल्या तरी त्यातून सुगंध देणाऱ्या अगरबत्ती बनवायची क्षमता असावी.
माझे ही काही स्वप्न ही स्वप्नच राहिले. वाटायचं भविष्यात आपण पाहलेली स्वप्न पूर्ण होणार पण तस काही झालं नाही. आता ते सर्व अशक्य वाटू लागले. स्वप्न पूर्ण न होण्याचं दुःख होतं पण त्याहून नवीन रमणीय स्वप्न पाहण्याची दिशा मिळाली.
आयुष्यात पाऊल थांबता कामा नये. पाऊल थांबलं म्हणजे प्रगती थांबली. एक एक पाऊल टाकत कधी आयुष्याचे धडे गिरवत यशापर्यंत पोहचणार हे कळणार पण नाही. आपल्या हातून काय निसटून गेलं यापेक्षा आता आपण काय हातात पकडू शकू याच प्रेरणेने जीवन जगणं महत्त्वाचं आहे
Subscribe to:
Posts (Atom)
आश्चर्यांनी भरलेले आयुष्य ✨
आयुष्य म्हणजे काय याचा खरा अर्थ हा मोठे झाल्यावर कळत असतो. मोठे होता होता लहानपण किती भारी होत याचा अनुभव येतो. उठायचं, शाळेल...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....