लहान असताना मोठ लवकर व्हावं अस वाटते आणि मोठ झाल्यावर वाटते अजून बालपणात जगावं. बालपणातील निरागसपणा, जबाबदारी मुक्त, मजेत असणार लहान मूल परत व्हावंसं वाटते. जसं जसं मोठं होत असतो तस अनेक गोष्टीचं वजन वाढत जाते. प्रत्येक गोष्ट मनासारखी करता यायची पण आता असा काळ आला आपण एखादी गोष्टी बरोबर करत आहो की नाही याची तपासणी करावी लागते.
लहान असताना आपला जीवनक्रम अगदी ताण मुक्त होता पण आता रोजच्या दिनचर्येत वापरत असणाऱ्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो, अंघोळीसाठी साठी साबण कोणता वापरावं, केस धुवायला कोणता शाम्पू चांगला असेल ज्यामुळे केसांची काळजी घेता येईल, तेल कोणतं वापरायचं, टूथपेस्ट कोणती वापरावी,
रोज पाणी किती प्यावे, कोणते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले आहे आणि कोणते घातक आहे, जेवताना जास्त पाणी पियू नये, फळ पण वेळेतच खावी इत्यादी.....
बापरे ! कितीही चिंता, काही नवीन वस्तू घ्यायचा विचार झाला तरी १० वेळा विचार करावा लागतो, आपल्यासाठी कोणती वस्तू योग्य असेल. समोरच्या दिवसाचं दिनक्रम आधल्या दिवशी करावं लागतं.
म्हणून वय जसं जसं मोठ होत तसं तसं विचार करण्याची क्षमता वाढत जाते आणि मेंदूमध्ये प्रश्नावली तयार होते. आणि यामुळे अती विचारांची समस्या उद्भवू लागते. हातात पैसा जसा येत जातो तश्या माणसाच्या गरजा वाढत जातात.
या धावत्या युगात साधं राहणीमान लोप पावत असल्याचे दिसून येते. जे आयुष्य आपण लहान असताना जगलो ते आयुष्य आताच्या पिढीला जगता येत नाहीच. आताच्या पिढीच काहीतरी नवीनच असतं. जितका कमी विचार तितके लवकर प्रश्न सुटतील आणि अतिविचारांची, बंधन असल्याची काळजी मिटेल.