कधी कधी मनात विचार येतो, आजूबाजूला किती विचित्र गोष्टी घडत आहेत. नवरात्री सणाला स्त्रीरूपी असणाऱ्या देवीच पूजन केलं जाते. मनोभावे अर्चना केली जाते तो स्त्रीशक्तीचा मान सुद्धा आजची स्त्री ठेवू शकत नाही आहे.
२०१६ साली जियो कंपनी मार्फत मिळणारा मोफत डेटा आणि कोरोना काळात घरी राहून मोबाईलचा वाढलेला वापर त्यात भर घालणारं सोशल मीडिया. आधीची स्त्री ही स्वतःच्या शरीराला जपायची. डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू द्यायचा नाही मात्र आजकाल लोकांना दाखवायला ब्लाऊज घालून पदर पाडतात. काही मूर्ख लोक शरीर दाखवून पैसे कमवण्याच्या नादात बुडाले आहेत. आधी कपडे बदलण्यासाठी खोलीचा वापर करायचे मात्र आता कॅमेरा शिवाय पान हलत नाही. लाज- लज्जा सर्व सोडून ही कामे वेगळ्या वेगळ्या सोशल मीडिया वर चालू आहेत.
या गोष्टीमुळे किती नुकसान होत आहे हे कदाचित सरकारला दिसत नसावे. आपल्या सोशल मीडियावर अनेक लोक असे फोटो, व्हिडिओ बघते आहे हे माहिती असून ते स्वतःच्या फायद्याचे विचार करत बसले आहे.
देशात वाढणाऱ्या बलात्काराला हे ही तितकेच महत्त्वाचे कारण आहे. अडचणीत किंवा एकट्या दिसणाऱ्या मुलीवर अत्याचार होतो. आता म्हणणार माणसाने पण चांगलं वागलं तर अशा घटना थांबू शकतात. ज्या व्यक्तीने चांगल शिक्षण घेतलं आहे ज्यात संस्कार आहे तोच अस वाईट कृत्य करणार नाही परंतु मागासलेल्या क्षेत्रामध्ये किती तरी लोक अशिक्षित असतात आणि त्यांना मुलींचा, बाईंचा आदर कसा करावा हेच माहिती नसते.
सांगायचं म्हटलं तर माणूस हा वाईट नसतोच पण सभोवतालचे वातावरण, संस्कार यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिक दृष्टीने वाढ होत असते. प्रत्येक देशाला ताकद आणि कमकुवतपणा असतो. पण तोच कमकुवतपणा कसा दूर करता येईल याचा विचार कोणी करत नाहीच.