जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
या गीताला आपल्या महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून राज्यसरकारने घोषित केले. आपल्या देशात २२ भाषा प्रचलित आहेत. त्यापैकी महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी.
आताच्या काळात इंग्रजीचं इतक वर्चस्व वाढलंय की लोकांना मराठी बोलताना मध्येच इंग्रजी शब्द बोलायची सवय झाली आहे. म्हणजे ना पूर्ण मराठी ना पूर्ण इंग्रजी. नक्कीच इंग्रजी ही काळाची गरज आहे पण आपली मातृभाषा टिकून राहणे हे आपलीच जबाबदारी. समोरच्या पिढीला मराठीचं महत्त्व कळाव यासाठी आपली मातृभाषेत बोलणे हे गरजेचे आहे.
एक दिवस मेट्रो ने प्रवास करते वेळी रांगेत उभ न राहता समोर समोर करणाऱ्या व्यक्तीला मी म्हणाले " आपको लाईन नही दिख रही क्या ? बीच में कैसे आ रहे हो ?
हे वाक्य विचार न करता तोंडून निघून गेले. पण लगेच विचार आला मी हिंदीत का बोलले, आपली भाषा मराठी आहे तर मराठीतच शब्द निघायला हवे होते. माझी हिंदी इतकी स्पष्ट नाही पण मराठी बोलताना गोडवा वाटतो.
नोकरी मुळे इंग्रजीचा पगडा वाढलाय आणि प्रत्येकाला मराठी कळत नाही त्यामुळे हिंदीचा वापर वाढलाय.. तरीही एखादी गोष्ट व्यक्त करायला आपली मातृभाषाच गोड वाटते. मराठी असल्याचा गर्व वाटतो आणि शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा आदर वाटतो.
प्रत्येकाला प्रत्येक भाषेचा आदर असावा. भाषेची सक्ती नको पण थोडीफार दुसरी भाषा ही शिकण्याची आवड असावी. भारतात अनेक ठिकाणी भाषेमुळे वाद होत असताना आपल्याला दिसतात पण ते वाद न करता समजूतदारपणे प्रश्न कसा सोडवावा याकडे बघितले पाहिजे. भाषेचा अनादर करणे म्हणजे त्या मातृभूमीचा अनादर करणे होय. शेवटी भारत हा सर्वांचा देश आहे.