लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Saturday, May 18, 2024
स्वभावाच्या लहरी
Saturday, May 11, 2024
का रे दुरावा
माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. माणूस बोलू शकतो एकु शकतो, बघू शकतो आणि विचार सुद्धा करू शकतो सोबत भावना व्यक्त करू शकतो हे सर्व तर प्राणी पण करू शकतात पण माणूस हा कोणत्याही क्षेत्रात बुध्दीने अग्रेसर असतो.
व्यक्तीच्या वागणुकीवर समाजाचा, सभोवतील वातावरणाचा खूप प्रमाणात प्रभाव होत असतो. आपण ज्या भविष्याचा विचार करतो तो खरा होतो, नाही होत यावर प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते पण जास्त प्रमाणात काहीतरी वेगळी परिस्थिती असते. आपण जसा विचार करतो तस काही घडत नसते, आपल्या मनासारखं होत नसल्याने आपल्याला त्या गोष्टीचं दुःख सुद्धा वाटते, डोळ्यात अश्रू दाटतात. पण त्या परिस्थितीला सामना करायला देवाने आपल्या मध्ये शक्ती दिली असते याच भान नसते. आपल्यासोबत २ गोष्टी प्रेमाने बोलले तरी आपल्याला छान वाटते.
भविष्यात आपलं जीवन अस असेल तस असेल असा विचार नक्कीच सर्वांनी केलाच असेल पण खरचं ते सर्व खर होत आहे का ?
आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो पण वास्तव नाही.
मनात गुंफलेल्या तारा सोडवाव्या कश्या
नात्यातला रुसवा, फुगवा सोडवावा कसा
काचेला तडा गेला की वापरता येत नाही
नात्याला तडा गेला की नात भरून निघत नाही
स्वतःच्या आधी ठेवलेली नाती परकी होतात
काळजी आणि प्रेमाची जागा क्लेश, मत्सर घेतात
नेहमीच्या भेटीची जागा अकस्मात होणारी भेट घेते
घट्ट नातं वाटणाऱ्या नात्यात पोकळ निर्माण होते
Sunday, May 05, 2024
शिष्टाचार
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....