Sunday, January 07, 2024

सोबती 🥰

हातात हात धरुनी गाठायची यशाची शिखरे 
जीवनात भिरभिरू लागली  रंगीबेरंगी पाखरे

मन नाचू लागले आनंदाने, तु आयुष्यात आल्याने
जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला देवाने

अंतर असल आपल्या दोघात तरीही एकत्र आहे मन
प्रेमळ शुभेच्छा एकमेकांना  देऊन साजरे करूया सण

आशेची किरण मनात ठेवून स्वप्न पूर्ण करुया 
येणाऱ्या नवीन पिढीला योग्य ती दिशा दाखवूया 

सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणातून एकमेकांना सावरुया
एकमेकांना अशीच सोबती सात जन्म देऊयात 

Sunday, December 10, 2023

माझी रांगोळी - भाग १

           विविध रंगांची आकर्षित रंगोळीच महत्त्व निराळ आहे. घराच्या अंगणापासून ते प्रत्येक सणाच्या वेळी अंगणाला शोभा देणारी रांगोळी, वाढदिवसापासून ते लग्नपर्यंतच्या शुभ कार्य प्रसंगी  काढली जाणारी रांगोळी, मनाला मोहून टाकते. 




स्वातंत्र्यदिन विशेष रांगोळी 


दसरा विशेष रांगोळी २०२१


दिवाळी विशेष रांगोळी 


दिवाळी विशेष रांगोळी 

Sunday, October 29, 2023

आईचा खजिना

             एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराची मेहनत समजू शकतो आणि त्या कलेचा आदर करतो. कारण त्या कलेमागे काय दडल आहे तो कलाकारच जाणून घेऊ शकतो. तसच माझ्या आईने बनवलेली कला इतकी जवळून कधी बघावी वाटली नाही पण या वेळेच्या सुट्टीमध्ये माझ्यात असणाऱ्या कलाकाराने ही अमूल्य कला ओळखली आणि म्हणून मला त्या गोष्टीची किंमत कळाली. कपाटाच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली आणि रोज बघण्यात येणारी वस्तू खजिना वाटू लागली. हे कसे केले असेल याची मनात उत्सुकता वाटू लागली. आई काही वर्षाआधी भरतकाम शिकली आणि त्यातून तिने अनेक टेबल क्लॉथ आणि बेडशीटवर भरतकाम केले त्याचे काही छायाचित्र मी खाली टाकले आहे सोबत कापडावर आणि काचेवर केलेले रंगीतचित्रे सुद्धा खाली दिले आहे. एक आठवण म्हणून माझ्या आईचा हा खजिना माझ्या ब्लॉगवर टाकते आहे.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...