Saturday, July 08, 2023

व्यक्त व्हायला शिका

                          जेव्हापासून मी माझे ब्लॉग लिहिणे सुरू केले तेव्हापासून एखादी मनात विचार आला किवा एखाद्या गोष्टीची मनात कायम चर्चा सुरू असली की माझा हात लॅपटॉपकडे जातो आणि त्यात ब्लॉगवर पटापट शब्द लिहायला लागते. माझ्या मते लिखाण हे आपले विचार मांडण्याचे प्रखर माध्यम आहे, असही होऊ शकते आपण जो विचार करत आहोत तोच विचार दूसरा व्यक्ती सुद्धा करू शकतोच.

                         समाधानी असणे हा जीवनाचा मी मूलमंत्र मानते. पण प्रत्येकच प्रसंगाला आपण समाधानी राहुच अस होत नाही. आपण कधी हसतो, कधी रडतो, कधी रूसतो, कधी रागात असतो तसेच कधी कधी मन समाधानी नसते. आणि यात काही वेगळ नाहीच हे साहजिक आहे. 

                        आपल्याला माहीत आहे आपल्या आयुष्यात सर्व छान चाललंय तरीही आपण कुठेतरी कमी पडतो आहो याचा विचार सुद्धा येतो, अजून काय करायला हवे, आपण स्वावलंबी झालो आहोत, महिन्याच्या शेवटी कामाचा मोबदला मिळतो, कामा व्यतिरिक्त आपण स्वतःच्या आवडी निवडी जपत आहोत, गरजेच्या वस्तु मिळत आहेत, सर्व काही असून पण कुठे तरी कमीपणा भासतो. जसा वाघ शिकार मिळवण्यासाठी धडपडत असतो तसा जीवनाकडे एका स्पर्धेप्रमाणे पाहल्यास आपल अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आवश्यक असते.

प्रत्येकाच जीवन सारख नसलं तरीही त्यात मात्र साम्य असतेच.. कोणाला लवकर यश पदरी येत कोणाला उशिरा, कोणाला लवकर प्रगल्भता लाभते कोणाला उशिरा त्यामुळे कोणी समोर नसते कोणी मागे नसते सर्व आपल्या वेळेप्रमाणे आपल जीवन जगत असतात.

Tuesday, June 27, 2023

माझी चित्रकला भाग ५

आई आणि बाळाच्या प्रेमाच प्रतीक 
स्त्री सौंदर्य 
श्री गणेश

Sunday, June 25, 2023

प्रतिबिंब

                आरसा हा आपल स्वतःच प्रतिबिंब  दाखवतो आणि सावली ही आपली साथ कधीच सोडत नाही असं खूपदा एकलेल आहे, पण जर आरसा दोषपूर्ण निघाला तर आपल्याला जे प्रतिबिंब दिसते ते प्रत्यक्ष पेक्षा वेगळं असतं, म्हणजेच आरसा पण काहीवेळेस आपली साथ सोडतो. 

               सावली ही कायम आपल्यासोबत असते पण जेव्हा सूर्य अगदी आपल्या डोक्यावर असतो तेव्हा उभ्या असलेल्या वस्तूची सावली दिसत नाही याचाच अर्थ एक वेळेस सावली पण आपली साथ सोडते मग आपण माणसांकडून तरी काय अपेक्षा ठेवावी. नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे एक अशी व्यक्ति असते जी कायम खंबीर आधार देतात, प्रत्येक वेळी गरजेच्या वेळी उपलब्ध असतात आणि अश्या व्यक्तीना  जपलं पाहिजे, कायम आधार दिला पाहिजे. 

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...