प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा छंद जोपासायला आवडतो. छंद म्हणजे एक आपली काहीतरी वेगळ करण्याची आवड, आपल्या फावल्या वेळेत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचं त्यातून मिळणारा आनंद आहे.
विश्व कला दिवस किंवा जागतिक कला दिन हा दरवर्षी १५ एप्रिल ला साजरा केल्या जातो. महान कलाकार लिओनार्डो दा विंची यांचा हा जन्मदिवस, २०१२ साली हा दिवस सर्वप्रथम साजरा करण्यात आला. या दिवसाची विशेषता म्हणजे कलेला विविध क्षेत्रात प्रोत्साहन देणे, आजच्या काळात विविध कला क्षेत्रातील उपलब्धतेचा सन्मान करणे आहे. या २०२३ वर्षाची थीम ही Art is good for health ही आहे. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य समतोलात असणं गरजेच आहे.
सध्याच्या काळात अनेक कला क्षेत्र आहेत. संगीत, चित्राला, वाद्यकला, नृत्यकला,मूर्तीकला, फोटोग्राफी या व अश्या अनेक कलांमध्ये अनेक कलाकार आपलं नाव जगात प्रसिद्ध करत आहेत. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक तरी कला शिकणे महत्त्वाचे ठरते.
आपण समोरच्या व्यक्तीला ती कला उत्कृष्ट रीतीने सादर करताना पाहल्यास आपल्याला मोह येतो आणि यामध्ये आपल्यासमोर अनेक कला असतात पण विचार करतो नेमका आपण वेळ कसा काढावा, जेव्हा मनातून शिकण्याची आवड असते तेव्हा काहीतरी मार्गाने वेळ निघतोच. मला माझ्या कला जोपसायला आवडतात आणि त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने एक तरी कला अंगी जोपसायला हवी. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल पाहायला मिळतो.